Posts

Showing posts from August, 2023

शेगाव ट्रिप

  ६ ऑगस्ट रोजी संध्याकाळी नागपूर एक्सप्रेस गाडीने आम्ही शेगाव यात्रेसाठी आम्ही भावंडे आपल्या कुटुंबियांसमवेत प्रयाण केले. सोमवारी सकाळी भक्त निवास येथे पहाटे पोचलो. दोन तासानंतर भक्त निवास येथे खोल्या मिळाल्या. आपले स्नान आवरून आम्ही श्री गजानन महाराज समाधी मंदिर येथे समाधीचे दर्शन घेतले. श्री राम मंदिर, आवारातून प्रदक्षिणा, पारायण मंदिर, येथे भेट दिली. मंदिरातील दर्शन रांग, पादत्राण सेवा, प्रसाधन, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, महाप्रसाद, देणगी विभाग, या सर्वांचे उत्तम नियोजन मंदिर संस्थान यांनी  केले आहे. दर्शनानंतर आम्ही मंदिर आसपास - श्री गजानन महाराज चरित्रातील प्रसंगाची स्थळे पाहून आलो.  यात पाटील मळा - ज्याठिकाणी जळत्या पलंगावर महाराज बसले होते. श्री शंकर मंदिर (येथे घोड्यास शांत केले), श्री हनुमान मंदिर (येथे पाटलाच्या मुलांनी महाराजांना ऊसानी मारले.. पण एकही अंगावर वळ उठला नव्हता), श्री गजानन महाराज यांचे प्रकट स्थान - श्री बंकटनिवास,  ही ठिकाणे पाहिली.  दुपारी आनंद सागर या भागास भेट दिली.  येथील अध्यात्मिक केंद्र, साक्षी गणपती मंदिर, श्री शिव ...

दिल्ली हरिद्वार ऋषिकेश प्रवास

  आम्ही दिल्ली प्रवासासाठी पुण्यातून प्रगती एक्सप्रेस गाडीने CST  मुबईस प्रयाण केले. दुपारी ४ वाजता राजधानी एक्सप्रेस गाडीने दिल्लीस जायचे होते. सर्वेप्रथम राजधानी मध्ये प्रथमच प्रवास म्हणून थोडं उत्सुकता होती. राजधानी म्हणजे शताब्दी, वंदे भारत या गाड्यांचं सुधारित गाडी... राजधानीमध्ये चहा पान, रात्रीचे जेवण, ice cream ,झोपण्यासाठी ब्लॅंकेट आणि उशी बेडशीट देतात.. या गाडीचा वेग, सेवा यामुळे ही गाडी विशेष ..सकाळी  १०.३० वाजता आम्ही हजरत निजामुद्दीन दिल्ली स्टेशनवर सुखरूप पोचलो. दिल्लीमध्ये आम्ही - रामकृष्ण आश्रम, अक्षरधाम मंदिर, नवीन पार्लमेंट इमारत, दिल्ली, मुंबई गेट, लाल किल्ला, जैन मंदिर, जामा मस्जिद, चांदणी चौक या भागास भेटी दिल्या.  दिल्लीची मेट्रो ट्रेन उत्तम आहे. काही वेळेस मेट्रोतून प्रवास केला. दिल्लीचे रस्ते रुंद आणि स्वच्छ आहेत. हरिद्वार येथून ऋषिकेशला जाण्यासाठी टॅक्सी केली. ऋषिकेशला जाताना घाट विभाग आहे. आसपास झाडे आणि जंगल आहे. ऋषिकेशला परमार्थ निकेतन येथे मुक्काम उतरलो होतो.  परमार्थ निकेतन हे रिसॉर्ट आहे.  येथे राहण्याची (AC ) सोय माफक दरात उत...

मी काय वाचले -12

Image
  "स्मरण जी ए चे "- संपादन - अप्पा परचुरे  या पुस्तकात जी ए याना वाहिलेली श्रद्धांजली याचा समावेश आहे.  प्रथम - सप्रेम नमस्कार - या लेखात सुनीता देशपांडे याचे पत्र याचा समावेश आहे. हे पत्र अत्यंत वाचनीय आहे.   जी ए यांच्या कथा, साहित्य, स्वभाव व्यक्ती याबाबत अनेक साहित्यिकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  काही जी ए ची पत्रे यांचा समावेश आहे. जी ए खूप सुंदर आणि प्रदीर्घ पत्रे लिहीत असत.  ही सर्व पत्रे वाचनीय आहेत.  त्यांची काही पुस्तके मी वाचली आहेत.जी ए यांची काही पुस्तके माझ्याकडे आहेत. या महान लेखकांबाबत मी अधिक काय लिहिणार म्हणा.  पुस्तक जरूर वाचावे.