माझे वाचन -4

 


गोष्ट  पैशापाण्याची "-   ले. प्रफुल्ल वानखेडे  


सकाळ' च्या "अवतरण" पुरवणीमधली प्रफुल्ल वानखेडे यांची गोष्ट पैशापाण्याची ही लेखमालिका गाजली होती. त्या लेखाचे पुस्तक सकाळ प्रकाशनाने घेतला. पैश्याचे नियोजन, खर्च, बचत, गुंतवणूक, कर्ज,जोखीम,  या आणि अनेक आर्थिक बाबीबाबत आपले विचार उत्तम प्रकारे मांडले आहेत.  व्यावसायिक मंडळींना आपल्या व्यवसाय सांभाळताना आलेले बरेवाईट अनुभव आणि त्यातून काय शिकावे याबाबत विस्तृत लेखन पुस्तकात आहे. जवळजवळ ३१ लेखांचा समावेश पुस्तकात आहे. श्रीमंतीचा दिखाऊपणा, पुस्तकवाचनातून अर्थसाक्षरतेकडे, माणुसकीतील गुंतवणूक, डाउन टू अर्थ, माणुसकीची श्रीमंती, प्रवास करा जगभर, व्यवहार लॉक - अनलॉक, जाणितो महत्व वेळेचे... हे लेख मनास भावून जातात. माझ्या निवृत्तीनंतर  साहित्यिक आणि वाचनप्रेमी मैत्रीण सौ. माधुरी देशमुख यांनी मला हे पुस्तक भेट म्हणून दिले. ही "मौल्यवान" भेट संग्रही ठेवण्याजोगी आहे. सर्वानी हे  Best Seller - पुस्तक जरूर वाचावे. 




Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा