Posts

Showing posts from March, 2024

दीपक महाजन प्रस्तुत "द गोल्डन ईरा " हिंदी अजरामर गीतांचा अनोखा कार्यक्रम

Image
  दीपक महाजन प्रस्तुत "द गोल्डन ईरा " हिंदी अजरामर गीतांचा अनोखा कार्यक्रम दि.२५ मार्च २०२४ रोजी निवारा नवी पेठ पुणे येथे आयोजित केला होता.  यामध्ये सफर सिनेमा जो तुमको पसंद वही बात कहेंगे, रॉकी सिनेमा - दिलं कही लगता नहीं क्या, सोला बर्ष की, अमरप्रेम कुछ तो लोग कहेंगे..भूल गया सब कुछ याद...ntamhan सिनेमा  वो शाम आती मगर ऐसी नहीं थी..रोज रोज घटा..शागीर्द.. वही जरा खपा खपा... न बोल दू तो क्या करू, आराधना सिनेमा -रूप तेरा मस्ताना, आराधना...कोरा कागज था मन मेरा, गाईड पिया तो से नयना लागे जाने क्या लागे रे,मंझिलो अपने जगाह रस्ते अपानी जागाह..घर सिनेमा -  आपकी आखों मे मेहके,मेरे सनम...ये रश्मी  झुल्पे का अंधेरे ना घबरा,गझल... बाजार..झिडजीडी रात फुलोंकी दिल..फुले के हाथ,हाथकडी.. जवानी जानेमान.. डिस्को स्टेशन डिस्को..दो रास्ते ... छुप गये सारे..दीनमे रात हो,The Train... ये आयोना गले लगवो ना.. देखो सिनेमे हलचल मची..गुलाबी आखे .. शराबी ये दिल, झूटा काहिका.. जीवन के हर मोड पे मिल जायेगे हम सफर.  होळी निमित्य - कार्यक्रमाची सांगता सिलसिला सिनेमातील - रंग बरसे चुनरिया ...

मी काय वाचले - 9 - दुर्गा भागवत - व्यक्ती, विचार आणि कार्य - संपादन - अरुण ढेरे

Image
  दुर्गा भागवत - व्यक्ती, विचार आणि कार्य - संपादन - अरुण ढेरे  दुर्गा भागवत विदुषी यांनी आपल्या ९२ वर्ष जीवन कालखंडात विविध विषयावर विपुल लेखन केले.  याबाबत एक चर्चासत्र आयोजित केले गेले.  हे पुस्तक -यातील सत्राचे फलित म्हणून लेखसंग्रह. दुर्गाबाईंचे ललित गद्य, लोकसाहित्यविषयक लेखन, महाभारतविषयी विचार, बौद्ध साहित्य आणि दुर्गाबाई अश्या अनेक पैलूंना स्पर्श करणारे लेखन या पुस्तकात आहे. यातील मला प्रतिभा रानडे यांचा लेख आवडला. या पुस्तकाचे प्रास्ताविक अरुण ढेरे यांनी केले आहे. दुर्गाबाई भागवत यांचे कार्य, विचार आणि लेखन अफाट. त्या थोर विदुषीस मानाचा मुजरा.. पुस्तक वाचनीय आहे. 

दिलीप कुमार -देव आनंद आणि वैजयंती आणि वहिदा रहमान

Image
  स्वरसाज व पृथ्वीराज थिएटर प्रस्तुती - दिलीप कुमार -देव आनंद आणि वैजयंती आणि वहिदा रहमान यांच्यावर चित्रित सुमधुर गीतांचे द्रुकश्राव्य सादरीकरण कार्यक्रम निवारा येथे १६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. बैराग, १२ O - क्लॉक, नागीन, वॉरंट, सुरज, गाईड, दिल दिया दर्द लिया, काला बाजार, गॅम्बलर, असली नकली. ज्वेल थीफ, चीड, प्रेम पुजारी,लीडर, आम्रपाली, जॉनी मेरा नाम, जब प्यार किसी से होता है, जोशीला, तेरे घर के सामने अश्या जवळजवळ चित्रपटातील २५ गाणी सुरेल आवाजात गायली गेली.   अनुजा पंडित, कल्पना नारायण, अश्विनी भुजबळ, केतकी जाधव, सतीश इंगळे, अभिजित भिडे, नारायण रामलिंगाम, मा.पृथ्वीराज या गायकांनी सुरेल आवाजात गीते गायली. सर्व गीते जरी १९५०-६० सालाची असली तरी खूप गाजलेली आणि श्रवणीय होती.वहिदा आणि वैजयंतीमाला भूमिका उत्तम. मी दोघींचा फॅन त्यामुळे कार्यक्रमास मजा आली

“ संयुक्ता “ कार्यक्रम जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन

Image
  “ अरुणिमा “ प्रस्तुत कार्यक्रम ( कथा , कविता , नाट्यवाचन , गप्पा आणि गाण्यांनी युक्त …“ संयुक्ता “ कार्यक्रम जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन पुणे येथे १८ मार्च २०२४ रोजी  आयोजित केला होता. गांधारी आणि द्रौपदी संवाद, संत सोयरबाई,संत कान्होपात्रा.. झाशीची राणी... अहिल्या... जिजामाता..सीड मदर - राहीबाई पोरे, बहिणाबाई चौधरी.यांच्यासारख्या महान कर्तृत्वान महिला यांची माहिती आणि कार्य ..सावरकर कुटुंबियातील ३ महान महिला - येसूबाई, माई आणि लक्ष्मी यांचा स्वर्गातील संवाद, आदर्श पतिपत्नी - आनंदी गोपाळ, साधना आमटे, राणी बंग, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे..यांचा उल्लेख, साधना आमटे यांच्याशी गप्पा,The Road  of Lost Innocence या पुस्तकाचा अनुवाद - यातील कंबोडिया येथील जंगलातील खेडेगावात जन्मलेल्या - सोमाली माम यांच्या जीवनाबाबत संघर्ष कथावाचन झाले.सरस्वती, लक्ष्मी आणि गौरी - यांचा त्रिवेणी संगम एकवटलेल्या - सौ. सुधा मूर्थी - यांचा कार्य आणि जीवनाबाबत माहिती  ऍसिड अटॅक मधून वाचलेली आणि जिद्दी आणि इतर मुलींना जगण्याची प्रेरणा देणारी शलाका हीच कहाणी कथन केली. १९७१ सालच्या युद्धातील ...

14 मार्च - दादा कोंडके यांचा स्मृतिदिन.

  14 मार्च - आज दादा कोंडके यांचा स्मृतिदिन.. यानिमित्त पुणे आकाशवाणी केंद्राने सकाळी ९ वाजता चित्रपट संगीत कार्यक्रमामध्ये दादा कोंडके यांची गाणी ऐकवली.  चिकोडी येथे बालपणी दादा कोंडके यांचे - सोंगाड्या, तुमचं आमचं जमलं, पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव.. असे बरेच चित्रपट  पाहिले होते. शाळेत गायन स्पर्धा असताना एक मुलाने - "ढगाला लागली कळ ... हे गाणे म्हटले होते.  दुर्दैवाने स्टेजवर परीक्षक म्हणून एक बाई आसनस्थ होत्या. आम्हाला हसावे पंचायत...आम्हा मुलांची परिस्थिती लई अवघड झाली होती. शेवटी हे गाणे अर्ध्यावर बंद करायला सांगितले गेले. हा शालेय जीवनातील गंमतशीर प्रसंग आठवला. मुले खरंच वात्रट आणि आगाऊ नाही का .. ?  (मी सोडून बरं का ....)  दादांची बरीच गाणी गुदगुल्या करणारी, रोमँटिक,चटकदार असली तरी "तुमचं आमचं जमलं" या सिनेमातील - चल रे वाघ्या रडू नको .. या गाण्यावेळी मी रडलो होतो. "दादा"  हे ग्रामीण भागातील रसिकांचे हिरो होते. दादा कोंडके यांचे ९ सिनेमे प्रत्येकी सलग २५ आठवडे चालले होते म्हणून त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे.  हे लई भारीच न...

डॉ. दिलीप देवधर लिखित - दैनंदिन जीवन व गीता या पुस्तकाचे प्रकाशन

Image
  १०.०३.२०२४ - डॉ. दिलीप देवधर लिखित - दैनंदिन जीवन व गीता या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम केशव सभागृह पुणे मराठी ग्रंथालय पुणे येथे संप्पन झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री मकरंद वझे आणि सौ. विनय मेहेंदळे होत्या. लेखक डॉ.दिलीप देवधर यांनी पुस्तक लिहिण्यामागची पूर्वपीठिका सांगितली. विनोबा भावे यांचे "गीता प्रवचने'" हे पुस्तक वाचनानंतर लेखक भारावून गेले.  करोना काळात "भगवदगीता" खूप कामाची आली. आपण शिकलेला - ज्ञान योग आणि कर्म योग हे दोन्ही खूप कामी आले. करोना दिवसात डॉक्टरांनी प्रत्येक करोना रुग्णास हात लावून तपासले असे श्रोत्यांपुढे सांगितले.  रुग्णांना बरे करण्यात समाधान - फळ मिळाले. पण गीतेने सांगितल्याप्रमाणे हे फळ ईश्वरास अर्पण केले.  डॉक्टरांनी प्रत्येकानी आपला स्वधर्म आचरून कर्म केले पाहिजे आणि फळ ईश्वरासमपर्ण करावे. जीवनात मोजकेपणा हवा. कोणाविषयी पूर्वदूषित दृष्टिकोन नसावा.  माणसास मृत्यूची भीती असते. याबाबत आपल्या वैयक्तिक जीवनातले मृत्यूबाबतचे अनुभव श्रोत्यांना कथन केले.  आपल्या आई आणि भावाच्या मृत्यूनंतर लगेच रुग्ण सेवा दिली. शेवटी गीत...

सिल्व्हरक्रेस्ट सोसायटीमध्ये महिला दिन

  आज सिल्व्हरक्रेस्ट सोसायटीमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि  भाग्यदा लक्ष्मी .. या गीताने झाली. सोसायटीच्या योगशिक्षिका सौ. पल्लवी गुरव हिने फेसिअल योग बाबत माहिती  देऊन तो कसा करायचा या योगामुळे आपण नेहमी ताजेतवाने आणि तरुण दिसतो याबाबत अधिक माहिती सगळ्या महिलांना सांगितली.  प्राणायाम  योगबाबत पण माहिती सांगितली.   सौ. सुवर्णा हरदास हिने "पिरॅमिड ध्यान" या ध्यानाच्या बाबत माहिती दिली. पिरॅमिड ध्यान कसे करावे दिवस कधी करावे,  त्याचे दैनिंदिन जीवनात फायदे याबाबत विस्तृत माहिती दिली.  आपल्या सोसायटीमध्ये राहणारी कु. शमिका यतीन जोशी हीने राष्ट्रीय तालबद्ध जिम्नॅस्टिकस  वयोगट १२ वर्ष स्पर्धेमध्ये  प्रथम क्रमांक पटकावला. अभिनव विद्यालय इंग्लिश शाळा पुणे येथे शिकणाऱ्या कु. शमिका यतीन जोशी हीने १ रौप्य, १ रजत आणि ४ सुवर्ण पदके महाराष्ट्र राज्यकरीता पटकावून पहिला क्रमांक मिळवला. कु. शमिकाचा सत्कार करण्यात आला.  शमिकाची नेत्रदीपक कामगिरी आणि यश याचे कौतुक तितके थोडकेच. " शमिका" म्हणजे सिल्व्...

कर्नल्स क्यूब संस्थेचा वर्धापन दिन

Image
  कर्नल्स क्यूब संस्थेचा आज वर्धापन दिन .. संस्थेस हार्दिक शुभेच्छा... चार पाच वर्षांपूर्वी साधना डांगी यांनी एक कार्यक्रमास आम्हा दोघांना हजर राहण्याबाबत फोनवरून आमंत्रण दिले. त्याप्रमाणे आम्ही सर्व प्रथम संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमास हजर राहिलो. कार्यक्रम आवडला. नंतर माझ्या सवयीनुसार मी त्या कार्यक्रमाबत थोडक्यात तपशील लिहून पाठवला.  तो आवडला.  नंतर संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाबत व्हाट्सअप वरून आमंत्रण येऊ लागले. कार्यक्रमानंतर तपशील निमित्य थोडेफार वृत्तांत लिखाण घडले. याबाबत साधना डांगी आणि विनिता फुले यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.  Bedside care taking याचे प्रशिक्षण संस्था देते.  तुरुंगात कैद्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम कौतुकास्पद होता. याला संस्थेस चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्र  शासनाने दखल घेतली. वाचनालय सुरु केले. सभासदांना मोबाईल,संगणक प्रशिक्षण दिले. गरजू महिला आणि मुलींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याबाबत काही उपक्रम राबवले. संस्थेने अनेक करमणूक, आहारशास्त्र, आजार, संगीत, वरिष्ठांचे जीवनमान आणि समस्या, अध्यात्म, व्यायाम, आनंद...

माझे वाचन - 8 -"स्मृतियात्रा "- भा.द. खेर

Image
  "स्मृतियात्रा "- भा.द. खेर  लेखकाच्या जीवनात थोर साहित्यिक, राजकारणी, लेखक यांच्या गाठी पडल्या आणि त्यांचा सहवास, मैत्री लाभली.   या पुस्तकात - ना सी फडके, स्वातंत्रवीर सावरकर, प्र. के. अत्रे, तात्यासाहेब केळकर, राष्ट्रीय स्वयंक संघ यांचे श्री गोलविलकर गुरुजी, ग.दि.मा., यशवंतराव चव्हाण, पी.व्ही नरसिहराव, यांच्याबरोबर सहवासातील आठवणी लेखकाने उत्तम प्रकारे व्यक्त केल्या आहेत.  पुस्तक वाचनीय आहे.

माझे वाचन - 7 -"गांधींचे गारुड " - संजीवनी खेर

Image
  "गांधींचे गारुड " -  संजीवनी खेर  या पुस्तकात लेखिकेने गांधींच्या सहवासात आलेल्या २० स्त्रियाबाबत विस्तृत लेख लिहिले आहेत काही स्त्रिया या उच्च श्रीमंत कुटुंबातील काही परदेशी आपल्या सुखवस्तू कुटुंबाचा त्याग करून अत्यंत साधी राहणी पत्करून गांधींच्या आश्रमात वास्तवास आल्या  काही समाजसेवा रोमा रोला यांनी गांधींच्या जीवनावरील पुस्तक वाचून भारतात गांधींना भेटायला आणि त्यांचे शिष्यत्व पत्करण्यासाठी आल्या आणि आश्रमात मुक्काम केला गांधींनी या सर्वाना आपल्या कुटुंबातील सदस्य काहींना सखी मानून आपलेसे केले  सर्वांची काळजी घेतली सगळ्यांना वेळोवेळी शेकडो पत्रे पाठवून खुशाली विचारून समाजसेवेबाबत मार्गदर्शन केले  हे सर्व करताना आपल्या सहवासात संवाद साधला आणि कोठेही मनाचा ताल जाऊन पाय घसरू दिला नाही असे लेखिकेने नमूद केले याबाबत गांधींचे कौतुक करावे तेव्हडे कमीच  पुढे काहींच्याबाबत मतभेद झाले तरी गांधींनी कटुता व्यक्त केली नाही   गांधीप्रेमी लोकांनी हे पुस्तक जरूर वाचावे. "गांधी" नावाचे गारुड.. हे एक अजब रसायन ..