Posts

Showing posts from March, 2023

चंद्र आणि शुक्र ग्रह यांची युती

Image
  24.03.2023 आज संध्याकाळी तृतीयेचा चंद्र आणि शुक्र ग्रह यांची युती पाहीली.  हे एक दुर्मिळ खगोलीय घटना.  मराठमोळ्या स्त्रिया आपल्या सौभाग्याचे कुंकू म्हणून कपाळावर ज्याप्रमाणे चंद्रकोर लावतात त्याप्रमाणे हे दृश्य होते.   खूप सुंदर …

पुस्तक वाचन - 4

Image
  डेझर्टर - विजय देवधर माझ्या मित्राच्या सांगण्यावरून "विश्वास" ग्रंथालयातून "डेझर्टर " हे विजय देवधर यांचे पुस्तक वाचले. मूळ लेखक गंथर बांहमान. अनुवाद - विजय देवधर. युद्धकाळात सैन्यातून - विशेषतः आघाडी फळीतून पळून जाणे आणि पुढे आपला जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करणे .. अशी अतिशय रोमहर्षक आणि चित्तथरारक साहसकथा  असे हे पुस्तक आहे. नेहमी पुढे काय होते याचे कुतूहल राहते... मला अतिशय आवडले.  अनुवाद उत्तम केला आहे.  यात सर्वात शेवट लेखक म्हणतो - जर्मन युद्धआघाडीवर पळालेला कुरेयर गंथर बान्हमान् याला ब्रिटिशांच्या एका गस्ती पथकानं बीर-अल्-हशीम किल्ल्यात आपल्या ताब्यात घेतलं, नि नंतर त्याची रवानगी ब्रिटनमधल्या युद्धकैदी तळावर केली. गंथर बान्हमान् तिथं आठ वर्ष राहिला. तिथल्या वास्तव्यात त्यानं इंग्लिश भाषा शिकून घेतली, आणि नंतर आपल्या धाडसी पलायनाची रोमहर्षक हकीगत त्यानं इंग्लिश भाषेमधून लिहून काढली. त्याच्या या अजोड साहसकथेला इंग्लंडमध्येच पुस्तकरूपानं प्रसिद्धी मिळाली.. हे पुस्तक बरेच गाजले.  यात वाचकांच्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. सवड काढून हे पुस्तक जरूर वाचावे.

मानसी पांडे यांच्या मातोश्री वाढदिवस

Image
  आज आपल्या मातोश्रींचा वाढदिवस.. मला वाटते ७५ मध्ये पदार्पण.. वाढदिवसानिमित्य हार्दिक शुभेच्छा  अत्यंत साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, स्वयंपाकपाणी, पुस्तक वाचन, कष्टाळू, समाधानीवृत्ती .. हे त्यांचे गुण मला भावले. मार्च २०१९ साली  आईचा वाढदिवस आमच्याकडे साजरा झाला होता. याची आठवण झाली. निकिता आणि महिता यांच्यामुळे आपल्या थोर माउलीचे पाय आमच्या वास्तूस लाभले होते.  माझ्या आईचे आणि आपल्या मातोश्रींचे विचार मिळतेजुळते होते. हा एक योगायोग. ही सारी दिगंबरांची कृपा... आपल्या मातोश्रींचे भावी आयुष्य सुखसमाधान आणि आरोग्यदायी जावो हीच श्री गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना...या प्रसंगी आम्हा सर्वांचा आदरपुर्ण साष्टांग नमस्कार त्यांना जरूर कळवा.. जीवेत शरदः शतं...दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...

पुणे आकाशवाणी "चिंतन"

  आज सकाळी ६.३० वाजता पुणे आकाशवाणीवर "चिंतन" सदरात मंगला गोडबोले यांचे  बोलू का नको या विषयावर विचार ऐकले.  माणसाला नेहमी प्रश्न पडतो हे बोलू का नको , हे लिहू का नको .. हे सांगू का नको .. हे बोलले तर पुढच्यास काय वाटेल.. पुढच्या माणसाच्या भावना दुखावल्या जातील का ... बोलण्या आधी दहादा विचार करावा म्हणतात..नाहीतर बोलून पश्चाताप ..लिहिण्याचे तसे नाही.. आधी वाटते हे लिहू का नको.. पण लिहिल्याने मनातील उबळ व्यक्त होऊन मन हलके होते. लिहायचाआधी माणूस विचार करतो.  लिहून झाल्यावर पण विचार करता येतो.  तेव्हा माणसाने लिहून मोकळे व्हावे..जेव्हा हे बोलू का नको.. तेव्हा बोलू नका... पण लिहावे की नको तेव्हा जरूर लिहा.. तेव्हा सर्वप्रथम पेन हाती घ्या... चिंतन खूप चिंतनशील होते.  मला पण हे कधी लिहून आपणास कळवतो असे झाले म्हणून हे लिखाण घडले.. आपण पेन हाती घेऊन मला जरूर प्रतिसाद द्याल..

श्री सुभाष सरांचा वाढदिवस

Image
  आज 8 मार्च श्री सुभाष सरांचा वाढदिवस..88 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा 💐💐 आपल्या तब्येतीमुळे सध्या घरीच विश्रांती घेतात. संध्याकाळी ऑफिस मध्ये आपल्या पत्नीसह सर आले.  सर्व स्टाफला आनंद झाला. वाढदिवसानिमित्त केक कापून साजरा झाला. वयोमानाप्रमाणे तब्येत चढ उतार होतो. देवीच्या कृपेने सर ऑफिसला येऊन साऱ्या स्टाफ यांची आवर्जून विचारपूस केली.. याचे कौतुक वाटले.   आज महिला दिनानिमित्त साऱ्या महिलांना चॉकलेट देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या. सरांना आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना..🙏🙏 88 वा वाढदिवस छान साजरा झाला.. जीवेत शरद शतं ..🙏🙏

शिवथरघळ, मांढरदेवी

Image
  शिवथरघळ प्रवासासाठी सकाळी ६.३० वाजता पुणे  सोडले.  भोर येथे नास्ता करून वरंधा घाटातून सकाळी ९.४५ वाजता शिवथरघळ येथे सुखरूप पोचलो.  वाटेत मोठे डोंगर, धरणाचे पाणी, रमणीय निसर्ग पाहायला मिळाले.  शिवथरघळ याठिकाणी श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोध ग्रंथ आपले शिष्य श्री कल्याण स्वामी यांच्याकडून लिहून घेतला.  घळीमध्ये निरव शांतता, आजूबाजूस निसर्गाची साथ  आहेच.  घळीमध्ये थोडावेळ ध्यान करायला उत्तम वातावरण. १९३० साली श्री शंकर देव यांनी हे स्थान शोधून काढले.  याठिकाणी दुपारी प्रसाद हा मिळतो. येथे समर्थ यांचे साहित्य आणि इतर पुस्तके मिळू शकतात. बाजूला चहापानासाठी छोटे हॉटेल आहे.  या स्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणतंच नेट वर्क कव्हरेज मिळू शकत नाही.  अमेरिकन संस्था NASA यांनी पण प्रयोग करून पाहिले. जगात असे एकमेव ठिकाण . येथून आम्ही मांढरदेवी साठी भोरमार्गे प्रयाण केले.  मांढरदेवीस जाताना गाडी नागमोळी रस्त्यावरुन जाते. येथील घाट उंचच्या उंच आहे.  सह्यांद्रीचे डोंगर पाहण्याजोगे आहेत. मांढरदेवी मंदिर उंच डोंगरावर आहे. डोंगऱ्य...