गाऊ कथा तुकोबाची - डॉ. सलील लाटे

 




१२ एप्रिल २०२५ - कर्नल्स क्यूब संस्थेने - गाऊ कथा तुकोबाची -या विषयावर - डॉ. सलील लाटे यांचा व्होकल सोनाटा कार्यक्रम आयोजित केला होता.   १६०८ ते १६५० या कालखंडातील तुकाराम महाराज यांच्या जीवनाबाबत श्री सतीश काळे यांनी भावगीत लिहिली आहेत.  गीतांची सुरुवात देहू गावी पालखी, बालपणी कनक आई पोटी जन्म, भंडारा डोंगरावर तुकोबांच्या तोंडी एकामागून एक अभंग - तुकोबा शिखरावर एकटे ही गाणी सुरेल आवाजात श्री लाटे यांनी गायली. डोंगरावर काट्याकुट्यातून वाट काढत तुकोबांच्या पत्नी अवली जेवण घेऊन जाताना एक गुराखी बाळाची भेट आणि तिथेच पांडुरंग दर्शन, तुकाराम महाराज यांच्या कीर्तनावेळी शिवाजी महाराज यांची उपस्थिती आणि विठ्ठलाचा धावा.. याबाबत अनुभूती सांगून त्यावर गीते सादर केले. श्री शिवाजी महाराज यांनी पाठवलेली भेट तुकाराम महाराज यांनी नम्रपणे परत केली, अभंग इंद्रायणी नदीत बुडवले, पांडुरंगाचे सगुणरूप दर्शन हाक, शेवटी विठ्ठलाच्या गावा जाण्यासाठी वैकुंठ गमन, यावरची गीते सादर केली. श्री सलील लाटे यांनी सारी भावगीते सुरेल आवाजात सादर करून साऱ्या श्रोतुवर्गास मंत्रमुग्ध केले.गीते गाताना स्वतः उत्तम पियानो वाजवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सारे श्रोते गीत गायन आणि पियानो वादनाने तल्लीन झाले होते.   "गाऊ कथा तुकोबाची" या कार्यक्रमाबाबत माहिती सांगितली. प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर साक्षात उभा केला असे गौरव उदगार कॅप्टन फुले यांनी आभार प्रदर्शनात व्यक्त केले.  तुकाराम महाराज यांच्या जीवनातील अनुभवाच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाल्याचे समाधान आणि आनंद साऱ्या रसिक श्रोत्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या अत्यंत श्रवणीय आणि हृदयस्पर्शी  कार्यक्रमाबाबत कर्नल क्यूब संस्थेचे आभार आणि मनापासून धन्यवाद 




Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा