Posts

Showing posts from February, 2026

कर्नल्स क्यूब संस्थेने " MEMS - १०८

Image
  14 फेब्रुवारी २०२६ -  कर्नल्स क्यूब संस्थेने " MEMS  -  १०८"  या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. एम इ एम एस 108 ची टीम आली होती. त्यांनी महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्विस (Maharashtra Emergency Medical Services  हा प्रोजेक्ट आरोग्य खात्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्री हॉस्पिटल हेल्थ सर्विस - लाइफ सपोर्ट ॲम्बुलन्स च्या माध्यमातून पेशंटला दिली जाते. यामध्ये रस्त्यावरील अपघात मधील पेशंट्स,  क्रिटिकल प्रेग्नेंट वूमन, नैसर्गिक आपत्ती आणि  विषबाधा, भूकंप, वीज पडून दुखापत, जंगली प्राणी यांच्यामुळे दुखापत आणि इतर आजार -.. पेशंटना प्राथमिक उपचार ॲम्बुलन्स सर्विस माध्यमातून दिली जाते. 365 दिवस आणि 24 तास ही सेवा मोफत पेशंटला दिली जाते. टोल फ्री नंबर 108 हा एम इ एम एस साठी आहे. या फोनवर घटना आणि पेशंट बाबत प्राथमिक माहिती   MEMS  सेंटरला  द्यावयाची आणि त्यानंतर त्या घटनास्थळी त्वरित (१५ मिनिटात)  ॲम्बुलन्स सर्विस उपलब्ध केली जाते. घटनास्थळी घाबरून न जाता, patience ठेवून योग्य ती माहिती तपशील...

वाचनकट्टा - 5 - "कशीर" - लेखिका सहना विजयकुमार अनुवाद उमा कुलकर्णी

Image
   "कशीर" - लेखिका सहना विजयकुमार अनुवाद उमा कुलकर्णी. कशीर  म्हणजे  कशूर भाषेत "काश्मीर". काश्मीर समस्या, 370 कलम त्याचा गैरवापर राजकारण, काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड, या सर्वांचे  परखड  चित्रण लेखिकेने कादंबरीमध्ये केले आहे. लेखिकेने काश्मीरमध्ये धोकादायक प्रदेशात तिथल्या गल्लीबोळात फिरून मोजक्या हिंदूंचा संपर्क साधून भयभीत हिंदू वृदांची, तरुण-तरुणीची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. रक्तपात घडलेल्या स्थळांना भेटी देऊन ही कादंबरी साकारली.  2018  साली  प्रकाशित झालेली ही कादंबरी.  याच्या आतापर्यंत सहा  आवृत्या निघाल्यात. या कादंबरीस डॉ. एस एल   ल भैरप्पा यांची प्रस्तावना लावली आहे. उमा कुलकर्णी अनुवादित ही कादंबरी वाचनीय आहे.

वाचनकट्टा - 4 -"चंद्रप्रकाशाचे दूध " - ले. यशवंत गोपाळ जोशी.

  "चंद्रप्रकाशाचे दूध "  - ले. यशवंत गोपाळ जोशी.  य गो जोशी यांच्या निवडक कथांचा हा संग्रह. या कथासंग्रहास  प्रा. रा. ना.  गद्रे यांची लेखकांबाबत  प्रदीर्घ प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकातील कथांपैकी पारिजातकाची फुले, सुपारी, सखाराम, प्रामाणिकपणा, धर्म ही अफू आहे, अंगारा, आरसा, केवळ पावसामुळे, सोन्याचा पिंपळ या कथा विशेष वाचनीय.  १९६१ चा हा कथासंग्रह वाचनीय आहे.

वाचनकट्टा - 3 - "द सर्कल ऑफ लाईफ"

Image
  यशाचा अर्थ दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून लावणे फार अवघड असते. ती चार अंध माणसे आणि एक हत्ती यांची गोष्ट आहे ना तसे.. हे सर्वजण यशाची आपापल्या परीने व्याख्या करतात, यशाच मोजमाप करायला  तीच  मोजपट्टी वापरतात. खरंतर आयुष्यात पूर्णपणे यशस्वी किंवा पूर्णपणे अपयशी असे कोणीच नसते.  तर आपल्याला जे करण्यात आनंद मिळतो ते आपले यश असते आणि ते आपण आपल्या स्वतःपुरत्या मोजपट्टीनेच मोजायचे असते.. सुधा मूर्ती यांच्या  "द सर्कल ऑफ लाईफ"  या पुस्तकातून (अनुवाद लीना  सोहोनी)  बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स येथे शिकत असणाऱ्या उत्तरा, जानकी, अरविंद,  सुब्बू  आणि सुमित्रा या पाच विद्यार्थी -  त्यांची कथा लेखिकेने या पुस्तकात दिली आहे ही कथा त्यांच्या यशाची अपयशाची आनंदाची आणि दुःखाची आणि त्यांच्या नशिबाची आहे. सुधा मूर्ती यांची पुस्तके प्रेरणादायी आणि वाचनीय असतात. पुस्तक जरूर वाचावे.

वाचनकट्टा - २ - "गदिमांच्या सहवासात" ले

Image
  "गदिमांच्या सहवासात"   लेखक मधुकर गोपाळ पाठक. लेखकाने गदिमांच्या सहवासातील लाभलेल्या काही क्षण टिपण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. आपल्या प्रस्तावनात लेखक म्हणतात - गदिमा म्हणजे सरस्वतीच्या गळ्यातील एक मौल्यवान  सुवर्णालंकार.  सुवर्ण कधी निस्तेज होत नाही.  त्याचे तेज त्रिकालाबाधित असते. ललित मासिकात पु ल देशपांडे यांनी या पुस्तकाचे रसग्रहण करून लेखनाचे कौतुक केले आहे. हे रसग्रहण पुस्तकात छापले आहेत. पुस्तक खूप वाचनीय आहे. पुस्तक जरूर वाचावे

स्मरण भैरप्पांचे"

Image
  7 फेब्रुवारी २०२६ -  सरस्वती सन्मान प्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार डॉ. एस एल भैरप्पा यांच्या साहित्यावर आधारित द्वैभाषिक चर्चासत्र "स्मरण भैरप्पांचे"  आयोजित करण्यात आले होते. भैरप्पा :  नव्या पिढीचे आकलन -  या पहिल्या सत्रामध्ये १) श्रीमती वैशाली पुरंदरे - " उत्तराखंड"  मधील सीता (२) श्रीमती सविता शिंदे -  "पारखा" -  एक आकलन (३) श्री  स्वानंद बेदरकर -  भैरप्पांच्या साहित्यातले तत्त्वचर्चेचे स्वरूप  (४)  डॉ. ऋत्विक गजेंद्रगडकर  - Mandra - असं या (Post  ) Modernist  Novel  (५)  डॉ. प्रसन्न देशपांडे - भैरप्पा यांची कादंबरी सांस्कृतिक मूल्याच्या संघर्षातून उपजणारी  जीवनदृष्टी या विषयावर आपले पेपर सादर केले. डॉक्टर भैरप्पा यांचे साहित्य नोबल पुरस्कार योग्यतेच आहे  असे डॉ. सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांनी आपल्या  अध्यक्षीय भाषणात सांगितले. भैरप्पांच्या पुस्तकांचे इतर भारतीय भाषेत अनुवाद झाले आहेत.  त्यांचे साहित्य हे Ph . D साठी प्रबंधासाठी अभ्यासासाठी मोलाचे आहे. भैरप्पा : तत्वचिंतक कादंबरीकार...

"मनाचे श्लोक व मनाचे आरोग्य - डॉ. राम साठ्ये

  श्रीदासनवमी शताब्दी महोत्सव व्याख्यान अंतर्गत "मनाचे श्लोक व मनाचे आरोग्य"  या विषयावर डॉ. राम साठ्ये यांचे व्याख्यान आनंदाश्रम, अप्पा बळवंत चौक पुणे येथे आयोजित केले होते. आपला स्वतःचा आत्म्याचा, मनाचा शोध हा खरा अभ्यास. आपल्या अंत:करण शांत निर्मळ हवे. अंतःकरणातील काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, दंभ यांचे धोंडे आपल्याला ओळखता आले पाहिजेत. संकल्प व विकल्प यांचे हिंदोळे म्हणजे मन. सतत न कंटाळता अभ्यास करून मनावर ताबा मिळवता येतो. आपल्या उत्पन्नाच्या वाट[पैकी 80 टक्के हा समाजाचा असतो. कलियुगात दानाचे महत्त्व खूप आहे दान हा सत्यसंकल्प आहे.  ऐपतीनुसार दान करावे. आहे ते वाटून संपवावे. दान सातत्याने व्हायला हवे. जीवन कसे जगावे मृत्यू आणि सेवा, दासभक्ती गुरु, शिष्य आणि अनेक विषयावर विवेचन मनाच्या श्लोकात केले. मी म्हणजे देह नाही तत्वाचे चिंतन करतो तो संत. आपल्या जगण्याचे प्रयोजन काय देहातून परमात्म्याकडे जाणे. आज-काल कलियुगात कलियुगात माणूस माणसासारखा वागेल याची खात्री नाही माणसाला कशातच समाधान नाही. हनुमंतासारखी दास्यभक्ती हवी. दासबोध हा ग्रंथ ग्रंथामध्ये गुरु शिष्याचा संवाद आणि ...

"इएनटी अँड वर्टिगो" -डॉ. स्वानंद घोलप

Image
  कर्नल क्यूब संस्थेने "इएनटी अँड वर्टिगो"  या विषयावर डॉ. स्वानंद घोलप यांचे भाषण आयोजित केले होते. कान, नाक, घसा आणि व्हर्टिगो याबाबत  ज्येष्ठानी घ्यायची  काळजी आणि निगा  यासंबंधी माहिती सांगितली. शरीराचा तोल सांभाळणे हे कानाचे महत्वाचे काम आहे असे सांगत कानाची रचना, कानाचे कार्य, समस्या, कानाची निगा आणि काळजी यावर अधिक माहिती दिली. डीजेमुळे ध्वनी प्रदूषण होते आणि कानास बहिरेपणा येण्याचा संभव असतो. कानातील मळ हा आपोआप बाहेर येत असतो त्यामुळे कानात  काडी अगर बर्ड घालून कान साफ करू नयेत.  इयरफोनचा सुद्धा जास्त वापर टाळावा. बहिरेपणामुळे होणारे मानसिक आजार, बदल माहिती देताना आपला समतोलपणा बिघडला तर व्हर्टिगोचा त्रास होतो.  व्हर्टिगोची लक्षणे, मानसिक आजार, तेव्हा घ्यायची काळजी यासंबंधी आपले मत व्यक्त केले. नाक, घसा बाबत संबंधित आजार, रोग, लक्षण आणि त्यावर घ्यायची काळजी. स्वरयंत्र, सायनस, हवा प्रदूषण, घोरणे, निद्रानाश याबाबत दृकश्राव्य माध्यमातून  श्रोत्यांना अधिक माहिती दिली. ध्वनी प्रदूषणा बाबत कानात कापसाचे बोळे, वाहन चालवताना हेल्मेटचा वापर, ...