Posts

Showing posts from December, 2023

2023 वर्षाला कृतज्ञपूरक नमस्कार

Image
  2023 साल संपत येत आहे.  या वर्षाचा आढावा... 2023 मध्ये वाचलेली पुस्तके, घडलेला प्रवास, मनोरंजनपर कार्यक्रम हजेरी याबाबत नमूद करत आहे.  पुस्तकाबाबत, प्रवासाबाबत, आणि कार्यक्रम आणि इतर प्रसंग/आठवणी याबाबत  ब्लॉग मधून लिखाण केले आणि आनंद इतरांना वाटला. दररोज सकाळी श्री दासबोध (एक समास), आणि मनाचे श्लोक, आणि रात्री श्री गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने यांचे वाचन केले.  मनास आनंद आणि समाधान मिळाले. पुणे आकाशवाणी वर काही उत्तम कार्यक्रम ऐकण्याची संधी लाभली.डिसेंबर मध्ये माझ्या मुलांनी  टोकियो जपान येथे नोकरीनिमित्त प्रयाण केले. ही सारी देवाची कृपा आणि पूर्वजांची पुण्याई आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा  साऱ्या रसिकांचा भरभरून प्रतिसाद आणि प्रेम लाभले .लेखनातून नकळत कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर मनापासून क्षमस्व...झाले गेले विसरून जाऊ ..आपल्यास आपुलकी, प्रेम आणि प्रतिसाबाबत मनापासून धन्यवाद आणि आभार...2023 वर्षाला कृतज्ञपूरक नमस्कार आणि धन्यवाद 

"छंद स्वाक्षरीचा

Image
  श्री सुरेश उर्फ देविदास परांजपे यांना, सा. न. वि.वि   श्री अनिल भाटेकडे गेलो असताना श्री अनिलने "छंद स्वाक्षरीचा" - आपले पुस्तक मला दिले.  मी पुस्तक पूर्ण वाचले.  आपण विविध क्ष्रेत्रातील  नामवंत मंडळींची स्वाक्षरी जमवून त्या व्यक्तीबाबत थोडक्यात माहिती लिहिली आहे. स्वाक्षरी सोबत - व्यक्तीचे वैशिष्ट्य,सही कोठे, कधी आणि किती वाजता घेतली हे थोडक्यात नमूद केले आहे.मला १० ते १०.३० वाजता पेंग येथे पण आपण रात्री पहाटे - २  पर्यंत जागून काही स्वाक्षऱ्या मिळवल्या आहेत. स्टेजच्या मागे ताटकळत राहून सही मिळवणे हे सोपे काम नाही. कारण व्यक्तीचे स्टेजवर एक आणि स्टेजच्या मागे वागणे दुसरे असते. ती कशी वागेल ही मनात शंका... काही गाजलेल्या व्यक्तींची पत्रे पण छापली आहेत. याबाबत आपल्या कष्टाबाबत आपले कौतुक तेव्हढे कमीच .. पुस्तक उत्तम झाले आहे.  पुस्तकातील सिनेमा नट ओमप्रकाश यांची सही मजेशीर - आवडली.   प्रत्येक यशस्वी पुरुषमागे... या उक्तीप्रमाणे आपल्या छंदात आपल्या पत्नीने आपणास मोलाची साथ दिली आहे. त्यांचेपण कौतुक वाटते. स्वाक्षरीच्या निमित्याने आपणास व...

मी काय वाचले - 23

Image
  "शाश्वताची शिदोरी "-  डॉ. अरुण ढेरे  या पुस्तकात विविध ललितलेख आहेत.  याची निवड आणि प्रस्तावना डॉ. वीणा देव यांची आहे.  सर्वच ललितलेख वाचनीय आहेत. यातील - बुद्धिपूर्वक नमस्कार, श्रावणसरी, मायलेकी, प्रेम, Harta - (रणांगण),  तेव्हाचे ते दिवस - हे ललितलेख मला आवडले. पुस्तक वाचनीय आहे.

गणपतीपुळे प्रवास - 5

Image
  गणपती पुळे येथे "प्राचीन कोकण" संग्रहालय - यात कोकण भाग येथील संस्कृती, जीवनशैली, शंख शिंपले, आजूबाजूस गर्द झाडी.. कोकणी खाद्यपदार्थ... आरे वारे समुद्र, खाडी परिसर उत्तम आहे.  रत्नागिरीस पतित पावन मंदिर - या ठिकाणी वीर सावरकरांनी समाजातील दलितांसाठी मंदिर प्रवेश घडवून आणला. लोकमान्य टिळक जन्म ठिकाण -  हे सोमवारी बंद होते.  टिळक जिथे जन्मले ती वस्तू स्मारक...थिबा पॅलेस - हा राजवाडा ब्रिटिशांनी १९१० साली बर्मा देशाचा राजा थिबा यास नजरकैदीत ठेवण्यासाठी बांधला. सोमवार बंद असलेमुळे पाहता आला नाही. राजा भोज यांनी १२०५ मध्ये भगवती किल्ला बांधला याला रतनगड, रत्नदुर्ग या नावाने ओळखले जाते. किल्ल्यात श्री भगवती देवीचे सुंदर मंदिर आहे. देवीच्या समोर दीपमाळे जवळ सरखेल दर्या सारंग कान्होजी आंग्रे यांचा अर्धकृती पुतळा आहे.  तटबंधावरून समुद्र दिसतो. रत्नदुर्ग या किल्ल्यावरून "रत्नागिरी" हे नाव पडले.  हे ठिकाण पाहण्याजोगे आहे.  बाजूला समुद्राच्या खाडीत एक गुहा पाहायला मिळते. रत्नागिरी येथे मत्स्यालय मध्ये अनेक प्रकारचे मासे (जिवंत) पाहायला मिळतात त्यांची माहिती पण न...

गणपतीपुळे प्रवास - 4

Image
  जयगड येथे प्रथम विनायक मंदिर पहिले. हे मंदिर जिंदाल स्टील कंपनी यांनी बांधले आहे. मंदिराच्या आसपास परिसर स्वच्छ, सुंदर आणि रमणीय आहे.  येथून पुढे जयगड किल्ला पाहिला.  किल्यात गणपती मंदिर आहे. बाकी तटबंधी सोडले तर काही नाही.  गणपती पुळ्याहून हेदवीस खाडीतून जावे लागते. बोट फेरीतुन कार, आणि इतर वाहनेपण जातात.  हेदवी गणपतीस दशभुजा गणपती म्हणतात. गणपतीस दहा हात आणि मांडीवर लक्ष्मी वसली आहे. हे पेशवेकालीन मंदिर डोंगरावर आहे.  वेळणेश्वर येथे शिवाचे मंदिर सुंदर आहे. हे ५०० वर्षापूर्वीचे पुरातन आहे.  या मंदिराच्या आवारात कालभैरव, विष्णू, गणपती मंदिर पण आहे. हे मंदिर गाडगीळ यांनी बांधले. गुहागर येथे व्याडेश्वर मंदिर - ऋषी व्याडी यांनी ईश्वराचे लिंग स्थापन केले म्हणून यास व्याडेश्वर असे नाव.श्री दुर्गादेवी मंदिर पाहिले.  येथे भक्त निवासाची सोय आहे. मंदिर परिसर उत्तम. नवरात्रीत येथे उत्सव असतो.कऱ्हाटेश्वर मंदिर  हे लाकडी बांधकामातील  जयगड भागात समुद्रालगत आहे.  येथील शिवलिंग स्वयंभू आहे.  पायऱ्या उतरून जावे लागते. सर्वात शेवटी गोमुखातून ...