"आरोग्यम धनसंपदा" - डॉ कल्याणी बडवे

 




स्वास्थ, सात्विक आहार, संवाद-सत्संग, संगीत आणि सहल या पंचसूत्री आपल्या जीवनात आचरणात आणली तर आपले आरोग्य उत्तम राहते असे मत डॉ कल्याणी बडवे यांनी "आरोग्यम धनसंपदा" या कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. आज विनायक चतुर्दशी निमित्य कार्यक्रमाची सुरुवात गजाजनांस वंदन करून जागतिक आरोग्य संस्था (WHO ) यांनी केलेली आरोग्याच्या व्याख्या यांनी केली. शारीरिक, सामाजिक, अध्यात्मिक, मानसिक या स्थरावर स्वास्थ असणे हे महत्वाचे. स्वास्थ कसे राहावे यामध्ये पहाटे ब्राह्मीमुहूर्तावर उठून शांत बसून ध्यान करणे - व्यायाम करणे प्राणायाम..सात्विक आहाराबाबत भगवदगीतेत उल्लेख आहे. घराचे अन्न, फळे खाणे जरुरीचे.  सध्याच्या BP , डायबेटीस, ऍसिडिटी, ताप, गुडघेदुखी  या रोगावर काही नैसर्गिक उपचारांबाबत माहिती सांगितली. आपले शरीर नेहमी आपणास सूचना देत असते. त्याचे आपण ऐकले पाहिजे.  आपली जीवनशैली निसर्गाशी अनुरूप हवी.  आपले मन निरपेक्ष,स्वच्छ हवे हळवे नको - नामस्मरण नियमित करावे. अहंकार बाबत गोष्ट सांगून आपल्यातील इगो नाहीसा होणे गरजेचे.


अहमदाबाद येथे काही कार्यक्रमानिमित्य गेलेल्या वेळी त्यावेळचे मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदी यांची अविस्मरणीय भेट आणि त्यांच्यासमवेत घडलेला संवादाचा अदभूत अनुभव श्रोत्यांना कथन केला. कल्पवृक्ष निसर्ग उपचार केंद्राबाबत माहिती दिली.  संगीत, भजन स्तोत्र पठण, सहनशीलता अंगी बाळगली पाहिजे. संगीतामध्ये गायन, सतार, बासरी वादन श्रवण केल्याने आपली तब्येत उत्तम राहते. सत्संग यात चांगल्या माणसांची संगत, भगवदगीता, तुकोबांची गाथा, रामायण या सारख्या ग्रंथांचे वाचन करावे. सहलीस जाऊन प्रेक्षणीय स्थळ तेथील निसर्ग, तेथील लोकांचे राहणीमान .. याचा अनुभव घेऊन आनंद घ्या.


योग, निसर्गोपचार, संगीत आणि अध्यात्म यावर उपयुक्त टिप्स देत कृष्णाच्या भजन, विठ्ठल विठ्ठल नामगजराने, श्लोक आणि शांतीमंत्राने आपल्या रसाळ भाषणाची सांगता झाली.  या अत्यंत श्रवणीय व्याख्यानास बऱ्याच रसिक श्रोत्यांनी हजेरी लावून उत्तम प्रतिसाद दिला.  सदा सर्वदा ताईंचे व्याख्यान ऐकायला मिळो हीच मनोकामना व्यक्त करीत आभार मानले. जून महिना योग दिन, सध्या सुरु असलेली  विठ्ठल पालखी वारी, आणि कृष्ण सखी कल्याणी बडवे यांचे व्याख्यान .. हा त्रिवेणी संगम मनास भावून गेला यात शंका नाही. या आनंदी क्षणी बरीच धनसंपदा कमावली याचे समाधान लाभले. कर्नल्स क्यूब संस्थेचे मनापासून आभार आणि धन्यवाद.


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा