Posts

Showing posts from July, 2024

श्रीगुरुचरात्रीतील गुरुभक्ती - प.पू. श्री सद्गुरुदास महाराज

Image
  श्री गुरुपुर्णिमा सत्संग या कार्यक्रमामध्ये दत्त संप्रदायातील थोर सत्पुरुष धर्मभास्कर प.पू. श्री सद्गुरुदास महाराज (श्री विजयराव देशमुख) यांचे श्रीगुरुचरात्रीतील गुरुभक्ती याविषयावर प्रवचन आबासाहेब गरवारे सभागृह येथे शनिवार दि. २७ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित केले होते. सुरुवातीस श्री रघुनंद पणशीकर यांनी गुरुभक्तीवर गाणे गायले.  गुरुचरित्र कसे लिहिले हे सांगितले. प्रारंभी देवांनी अनुसूया परीक्षाबाबत कथा सांगितली. अनुसूयाचे पतिव्रता अतिशय कडक होते. आपल्या पती/गुरुचे स्मरण करून परीक्षा पार पाडली.  गुरुचरित्र हा मंत्रग्रंथ आहे. गुरुभक्ती मध्ये नारदभक्ती यात ८४ सूत्र सांगितली आहेत. श्री गुरुचरित्रात अध्याय - २,९, १४,२०, ४१ आणि ४८ यातील गुरुभक्ती बाबत कथा सांगितल्या. सुख-दुःख देव अगर गुरु कोणीही देत नाही. आपल्या कर्माचे सुख/दुःख  भोग आपल्यालाच भोगावे लागतात. मात्र आपले गुरु आपले भोग कमी करतात.  गुरुचरित्र हा ट्रान्स मध्ये घेऊन जाणारा ग्रंथ आहे. स्तुती पेक्षा स्तवन महत्वाचे- स्तवनामध्ये भाव असतो. स्तवन करावे, गुरुभजनी रमावे, नम्र राहावे... याने आर्त वाढतो.. व...

मी काय वाचले -22 मौन होई बोलके - रोहिणी लिमये

Image
  मौन होई बोलके - रोहिणी लिमये  लेखिकेने समाज सेवा म्हणून छोटेसे कर्णबधिर मुलामुलींसाठी शाळा सुरु केली.  पुढे कष्ठाने जानकी विकास विद्यालय शिक्षण संस्था स्थापन केली. कर्णबधिर मुलासाठी अभ्यासक्रम, श्रवण आणि वाचा याबाबत विविध साधनांची निर्मिती केली.  मुलांचा विकास घडवून आणला.  त्यांनी केलेली प्रगती आणि अथक परिश्रम यामुळे त्यांच्या संस्थेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला.  त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांना कुटुंबीयांची साथ कौतुकास्पद आहे.  संस्थेच्या जडण घडणीत आलेले बरे वाईट अनुभव उत्तम प्रक्रारे व्यक्त केले आहेत. पुस्तक वाचनीय आहे.

मी काय वाचले - 21 साथ सोबत - सिंधू (उषा) वसंत कानेटकर

Image
  साथ सोबत  - सिंधू (उषा) वसंत कानेटकर  सिंधू कानेटकर यांनी त्यांच्या जीवनातील भेटलेल्या व्यक्ती यांच्याबाबत आपली भावना सुंदर शब्दात व्यक्त केल्या आहेत.  यामध्ये आपले सासरे, वि स खांडेकर, सी डी देशमुख, कुसुमाग्रज - यांच्या कुटुंबियाबाबत, आपली मैत्रीण, आपले पती - भेटलेल्या माणसांचे गुणदोष याबाबत पण लिहिले आहे. यातील - निखळ आईपण, अमृतवेल, ती भेटायला नको होती हे लेख मनाला भावून जातात.  हे छोटेखानी पुस्तक वाचनीय आहे.

मी काय वाचले - 20 माझे पुराण - ले. सौ. आनंदीबाई कर्वे

Image
  माझे पुराण - ले. सौ. आनंदीबाई कर्वे  हे सौ. आनंदीबाई कर्वे (महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पत्नी) यांचे आत्मचरित्र.  त्यांना बाया म्हणत.  त्यांनी आपल्या उतारवयात आपल्या जीवनातील आठवणी लिहून काढल्या.  हे पुस्तक प्रथम १९४४ साली प्रकाशित केले गेले.  या पुस्तकात आपले बालपण, वैवाहिक जीवन, त्या कालच्या समाज रूढी, सती, केशवपन, यावर आपल्या आठवणी सुंदर शब्दात लिहिल्या आहेत. आयुष्यात कष्ट सोसून, आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून अनेक विधवा बाया, अनाथ मुली, रोगग्रस्त  लहान मुली - यांचे संगोपन - प्लेगच्या दिवसात केले.  आपल्या पतिदेवांना त्यांच्या सामाजिक कार्यात मनापासून मदत केली.  आपल्यास एक सुदृढ मुलं सांभाळणे कठीण..  असो बाबी पुरातन असल्यामुळे कालबाह्य झाल्या असतील पण सौ. आनंदीबाई कष्टातून सामाजिक कार्याचा वास सांभाळून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन उत्तम नोकरी आणि संसार केला याचे कौतुक करावे तितके कमीच... महर्षी सारख्या व्यक्तीस सांभाळ .. कठीण काम..पुस्तकास डॉ. हे.वि इनामदार यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक जरूर वाचावे.

मी काय वाचले - 19 "सत्य-कथा "- ले. नीला सत्यनारायण

Image
  "सत्य-कथा "- ले. नीला सत्यनारायण  लेखिकेचे पती सत्यनारायण यांची यशस्वी उद्योजक बाबत अनुभव उत्तम प्रकारे व्यक्त केले आहेत.  सत्य यांच्या घराण्यात कोणीही व्यवसाय केला नाही.  आपल्या कष्टाने आपला व्यवसाय देशात आणि परदेशी पण वाढवला. आपल्या हाताखाली काम करण्याऱ्या सहकारी मंडळींना प्रोत्साहन देऊन त्यांना मदत करून कंपनीत टिकवून ठेवले. त्यांच्या कंपनीचे नाव नावाजले होते, तरी सत्य स्वतः अत्यंत साधेपणाने राहत.  ते अतिशय अबोल स्वभावाचे होते असे लेखिकेने लिहिले आहे. कमी बोलण्यावरून पत्नी खूप रागावत असे.  पैसा हा सर्वस्व मानले नाही.  व्यवसाय सांभाळत आपल्या मतिमंद मुलाचे उत्तम संगोपन करायचे.  पुस्तक तरुण मंडळींनी जरूर वाचावे.

भीमाशंकर

  २३ जून - आम्ही सकाळी सात वाजता टुरिस्ट गाडीने भीमाशंकर येथे प्रवासास सुरुवात केली. वाटेत नास्ता करत आम्ही भीमाशंकर डोंगरावर पार्किंग नंबर ३ येथे पोचलो प्रचंड गाड्याची गर्दी होती, ट्रॅफिक जाम होते. पार्किंग ३ येथून एसटी बस सोय होती. आम्ही १.३० वाजता मंदिर दर्शन रांगेत उभे होतो. अंदाजे ३ तास लागतील असे वाटले. गर्दीमुळे आम्हास ५.३० वाजले आणि एकदाचे गाभाऱ्यात दर्शनाचा लाभ मिळाला. दर्शनाने सारा शीण नाहीसा होऊन मनास बरे वाटते.  दर्शनावेळी जोरात पाऊसाचा अभिषेक झाला. पण छत बंद असल्यामुळे पाऊसात भिजलो नाही.  दर्शन रांगेत असताना गाडी ड्रायव्हरला फोन करून कल्पना दिली. दर्शन करून आम्ही चहा घेऊन परत ST स्टॅन्ड येथे बससाठी आलो आणि बसने  गर्दीमुळे आम्हास फक्त पार्किंग २ येथेच सोडले. तेथे ड्रायव्हरला फोन करण्यासाठी रेंज नव्हती. देवळात प्रवेशद्वार येथे रेंज होती.. काय देवाची कृपा... पार्किंग येथे आपली गाडी शोध मोहीम सुरु.. शेवटी गाडीजवळ ड्राइवर नव्हता.. तरी जवळपास  होता.  शेवटी चाकण येथील ट्रॅफिक जॅम पाऊस, करत आम्ही घरी रात्री १०.३० वाजता सुखरूप पोचलो.बम बम बोले.. ओम नमः ...

मी काय वाचले - 18 गेले लिहायचे राहून - मृदुला भाटकर

Image
  गेले लिहायचे राहून  -  मृदुला भाटकर  लेखिकेने लोकसत्ता चतुरंग पुरवणीमध्ये लिहिलेले लेखमालेचे हे पुस्तक.. लेखिका न्यायाधीश होत्या. न्यायालयातील कामकाजातील आपले अनुभव, कायदा आणि प्रत्यक्ष परिस्थिती, घटस्फोट, पोलीस तपास, कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्न.. या अनेक विषयावर लेखन केले आहे.  सर्व लेख वाचनीय आहेत.  लेखिकेने पती-पत्नी यांच्या संबंधावर आपले विचार उत्तम प्रकारे व्यक्त केले आहेत. पुस्तक जरूर वाचावे.

मी काय वाचले - १७ तिची कहाणीच वेगळी - ले. स्मिता कुलकर्णी

Image
  तिची कहाणीच वेगळी - ले. स्मिता कुलकर्णी  लेखिकेची मुलगी - मनाली ही Spina Bifida (spinal cord disease  - मणक्याचा एक आजार) या रोगांनी आजारी लहानपणापासून असते. वयाच्या पंधरा वर्षात दहा ते बारा शस्त्रक्रियाना सामोरे जाते. मनाली ही अपंग, गतिमंद आणि कायमस्वरूपी व्हीलचेअरमध्ये बंदिस्त असते. मनालीच्या आई सौ.स्मिता कुलकर्णी या मुलीचे आजारपण, वारंवार हॉस्पिटल, औषधपाणी, संगोपन, घरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, मनालीची शाळा हे सांभाळून तिला चित्रकला आणि इतर वेशभूषा, पाठांतर, नाट्याविष्कार या स्पर्धेत भाग घेऊन मनालीने पारितोषिके मिळवली आहेत. आपले माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. जन्मापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या मनालीच्या प्रवास, स्वतःचा संसार, पतीचे सहकार्य, नोकरी आणि कुटुंबातील माणसांचे आजारपण..जिद्द..सहनशीलपणा.. या सर्वांची कहाणी या पुस्तकात लेखिकेने उत्तम प्रकारे व्यक्त केली आहे. याबाबत लेखिकेचे कौतुक करावे तेवढे कमीच..लेखिकेस  आदर्श माता आणि अनेक पुरस्कार लाभले आहेत.. आमच्या सोसायटीतील मैत्रिणीने हे आपल्याकडील...

मी काय वाचले -16 रिगेटा - भा. द.खेर

Image
  रिगेटा - भा. द.खेर  हा एक कथासंग्रह आहे.  यातील - घाणेरीच्या फुल, जखम, कर्ज फिटले ऋणको गमावला,अंतरीच्या कळा, सांत्वन, या कथा मनास भावून जातात. हा कथासंग्रह वाचनीय आहे.