मस्त बिनधास २४ तास " - डॉ. संजय उपाध्ये
२९ जुलै २९२५ - डॉ. संजय उपाध्ये यांचा "मस्त बिनधास २४ तास " हा कार्यक्रम पुणे सकाळ, सह्याद्री कवच आणि स्वस्तिश्री सोसायटी यांनी स्वस्तिश्री सभागृह गणेशनगर पुणे येथे आयोजित केला होता. आपले गुरु ग. दि. मा. याना वंदनपर गीत सादर करून मस्त बिनधास २४ तास यासाठी नेहमी हसतखेळत राहावे. आजोबा नातू - कुत्र्याची शेपूट - याचे उदाहरण देत सुख मागून येत असते -" मागून" मिळत नाही. आयुष्य sincerely घ्या seriously नको. दुसऱ्याचे कौतुक करा -देण्यात आणि कौतुक करण्यात कंजुषी नको साठीनंतर विचारले तर सल्ला द्या नाहीतर मौन पाळा. आपल्या जीवनसाथी, मुलेमुली, सून, नातवंडे आणि इतरांशी - सर्वांशी प्रेमाने वागा. शांतिमय आणि निरपेक्ष बुद्धीने जगा. appreciation होते. आपला देह "Asset " म्हणून नको तर "Trustee " म्हणून माना. Appreciation हवे नाहीतर "Asset " म्हटले तर depreciation येते. निवृत्तिपर जीवन स्वीकारा.. Accept the fact and act rationally .. स्वतःला बदला.. मी पणा गळू दे अहंकार नको..सोडून द्या - Art of Leaving and not living ..हवे. म्हातारपणी धरून ठेवण्यामध्ये काही गंमत नाही. मुंबई लोकल प्रवास माणसास खूप काही शिकवतो - Trained in Train ...adjust - बदला - add just पाहिजे. जवळजवळ सव्वा तास कसा हसतखेळत गेला कळले नाही. डॉ संजय उपाध्ये यांचे आधी मी काही कार्यक्रम आणि यूटुबवर ऐकले आहेत. तरी प्रत्येक कार्यक्रम त्यांच्या सादरीकरण शैलीमुळे आनंददायी आणि खळखळून हसवून सोडतो. मनास बरे वाटले.. मला झालेला आनंद आपणाशी शेयर करावा चला तर मस्त बिनधास २४ तास ...धन्यवाद
Comments
Post a Comment