माझे वाचन -2

 

"माझ्या खुणा माझ्या मला" - डॉ. सरोजिनी बाबर.

पूर्वी सह्याद्री दूरदर्शन केंद्रावर संध्याकाळी "रानजाई" हा कार्यक्रम आमची आई न चुकता पाहत असे. यात शांता शेळके आणि सरोजिनी बाबर यांच्यात लोकगीत जुनी खेडेगावातील विविध सणसमारंभ यावेळी गायली जाणारी गाणी आणि ओव्या यावर चर्चा .. मी पण हा कार्यक्रम बघत होतो. यातील ओव्या आणि गीत ऐकायला बरे वाटे. त्यावेळी सरोजिनी बाबर म्हणजे फक्त एक कवियत्री/लेखक एवढीच काय ते ज्ञान.  हे आत्मचरित्रपर पुस्तक वाचल्यावर लोकजीवन,कला, राजकारण, समाजकारण, साहित्य या क्षेत्रात केलेले कार्य याबाबत अधिक माहिती कळाली.   नामवंत राजकारणी आणि साहित्यिक मंडळी यांच्याशी डॉ सरोजिनी बाबर यांचा दांडगा संपर्क आणि मैत्रीचे नाते होते.  आपल्या प्रत्येक कामात त्यांना त्याच्या वडिलांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन लाभले. आपल्या उत्तम वर्क्तृत्व कलेमुळे अनेक सभा, विधानसभा आणि राज्यसभा गाजवून सोडली.  आणि मान्यवरांची वाहवाह मिळवली. भारतीय लोकसाहित्य यात अभ्यास करून लोकसंस्कृतीचा ओळख याबाबत प्रबन्धलेखन केले.  अनेक ललितलेख , कविता, गाणी लिहून मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. जीवनाला समृद्ध करणाऱ्या पाच गोष्टी असतात -  ज्ञानसाधना, समाजसाधना, मूल्यसाधना, साहित्यसाधना आणि आत्मसाधना - या पाचही बाबी सरोजिनी बाबर यांच्या जीवनात एकरूप झालेल्या होत्या असे डॉ. द.ता.भोसले म्हणतात. या पुस्तकास डॉ. द.ता. भोसले यांची सुंदर प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक जरूर वाचावे .🙏









Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा