Posts

Showing posts from May, 2025

जपान -7

  इंपिरियल गार्डन - ०५.१०.२०२४ इंपिरियल गार्डन ही जपानमधील सर्वात मोठी बाग.  पूर्वी येथे Edo किल्ला होता. नंतर आगीत किल्ला भस्मसाथ झाला आणि १९६८ साली ही बाग निर्माण केली गेली. अजुनी बागेत किल्लाचे अवशेष आहेत. बाजूनी सुमीदा नदी आहे. बागेचा भाग २१०००० sq.mt मध्ये ३ मेन भाग - Honmaru , Ninomaru  Cannomaru  या बागेत मोठी lawns , बांबू, rose  गार्डन , tea .. यांची झाडे आहेत. बागे भोवती ५ km चा परिसर आहे. समोर मोठा पूल आहे. दुसऱ्या बाजूस टोलेजंग हॉटेल आणि इतर ऑफिस यांच्या इमारती आहेत.   टोकियो स्टेशन - ०५.१०.२०२४ इंपिरियल गार्डन वरून आम्ही टोकियो भागात फेरफटका मारून टोकियो रेल्वे स्टेशन येथे पोचलो.  या भागातील रस्ते, शिस्तबद्ध वाहतूक, टोलेजंग हॉटेल आणि इतर इमारती पाहण्याजोगी आहेत.  टोकियो स्टेशन हे एक महत्वाचे आणि मोठे जपानमधील स्टेशन आहे.  येथें अतिवेगवान रेल्वे - त्यांना शिंकासेन म्हणतात त्या येथून सुटतात तशी ३२० km वेग.  या स्टेशनातून शहरी इतर भागात मेट्रोचे जाळे आहे. जवळजवळ ४००० ट्रेन्स आणि ५००००० प्रवासी यांची वर्दळ या स्टेशनवर होते....

जपान -6

  पार्लिमेंट हाऊस जपान इंटरनेटवर पार्लिमेंट हाऊस जपान बाबत शोध घेतला.   १ ऑक्टोबर २४ रोजी पार्लिमेंट हाऊस टूर बाबत अर्ज केला. आणि लगेच २ ऑक्टोबर रोजी २.४५ वाजता टूर ठरली. नागाताचो भागात पार्लिमेंट हाऊस आहे. श्रेयसने आम्हाला जाणे येणे बाबत रेल बाबत माहिती दिली. आम्ही २.३० वाजता टूर ऑफिस साठी जवळजवळ ३० लोक जमा झालो.  प्रत्येकाचे पासपोर्ट चेक आणि security चेकअप झाल्यावर टूर गाईड बरोबर पार्लमेंट भेट सुरु झाली.  सेंट्रल हॉल, सेंट्रल एंट्रन्स, Emperor Room चेंबर ऑफ हाऊस ऑफ representatives  Attendance  Board committee rooms , याठिकाणी भेटी दिल्या प्रत्येक भागाची माहिती गाईडने सांगितली.काही भागात रेड कार्पेट, आजूबाजूस बाग, प्रशस्त आवार, इतर ठिकाणी टोलेजंग इमारती .. हे पाहण्याजोगे आहे. आपल्यासारखे लोकसभा (house of representative -४६५ मेंबर्स) आणि राज्यसभा (house of Councillors  - २४८ मेंबर्स), लोकसभांची निवडणूक ४ वर्ष आणि राज्यसभा ३ वर्षेतून एकदा होते. १८ वर्षपुढील मतदारास २ मते द्यायची - १ त्या भागातील उमेदवारास आणि दुसरे पार्टी लिस्ट उमेदवारास. वयोमर्याद...

पु.ल. ची प्रार्थना

  गेल्या आठवड्यात मी माझा ६० वा वाढदिवस साजरा केला.  वरिष्ठ क्लबात प्रवेश मिळाला म्हणून मी जपानच्या  धरतीवर हवेत तरंगत होतो. आणि अचानक  तेव्हा मला माझे लाडके पु.ल. ची प्रार्थना वाचनात आली ती अशी - हे परमेश्वरा...मला माझ्या वाढत्या वयाची जाणीव दे. बडबडण्याची माझी सवय कमी करआणि प्रत्येक प्रसंगी मी बोललच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य इच्छा कमी कर. दुसर्‍यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व  त्यांच्या खाजगी प्रश्नांची  दखल घेउन ते मीच  सोडवले पाहिजेत अशी  प्रामाणिक समजूत माझी  होऊ देऊ नकोस.   टाळता येणारा फाफटपसारा  व जरुर नसलेल्या तपशिलाचा  पाल्हाळ न लावता शक्य तितक्या लवकर मूळ  मुद्यावर येण्याची माझ्यात  सवय कर.   इतरांची दुःख व वेदना  शांतपणे ऐकण्यास मला  मदत करच पण त्यावेळी  माझ तोंड शिवल्यासारखे  बंद राहु दे. अशा प्रसंगी  माझ्याच निराशा, वैफल्यांचे  रडगाणे ऐकवण्याची माझी  सवय कमी कर.   केंव्हा तरी माझीही चूक  होउ शकते, कधीतरी माझाही  घोटाळा होऊ ...

जपान -5

  Meiji Jingu - २९.०९.२०२४ हे एक शिन्तो shrine  शिन्तो म्हणजे जपानचा पुरातन आणि मूळ धर्म.  शिन्तो - जपानची जीवनशैली. यामध्ये कोणी संस्थापक नाही, धर्मग्रंथ नाही. शिन्तो म्हणजे निसर्गाशी संतुलन आणि सदगुण..सम्राट मेईजी १९१२ साली निधन झाले आणि राणी शोकेन हिचे निधन १९१४ साली झाले. या दोघांच्या सदगुण आणि स्मरणार्थ जपानी लोकांनी जंगले परिसरात स्थूप १९२० साली बांधले. त्याकाळी जवळजवळ एक लाख झाडे लावली. १७० एकरी परिसरात दोन गेट, museum बागा, रेस्टॉरंट, लग्नविधी हॉल, कॅफे, टेनिंग हॉल वॉशरूम यांचा समावेश आहे. अत्यंत रमणीय, शांत, निसर्गाचे वरदान लाभलेले ठिकाण.  मेन गेटपाशी स्मरण आणि नमस्कार याची एक विशिष्ट पद्धत आहे. अंदाजे तीन किलोमीटर चालावे लागते. पण  येथील निसर्ग आणि सुंदर परिसरातील ऊर्जा  यामुळे अजिबात थकवा जाणवत नाही. मनास आत्मिक समाधान देते. मेईजी जिनगू स्मारकास जरूर भेट द्यावी  श्रेयस जपानला आल्यावर मी पुण्यात NHK चॅनेल पाहत होतो. मेईजी जिनगू स्मारक नजीक NHK दूरदर्शन हेड ऑफिस आहे. त्यासमोर स्टेडियम आहे. स्टेडियमचा आकार बोटीसारखा सुंदर आहे. नमस्ते इंडिया - आ...

जपान -4

  Funabori Tower  - Funabori  Edogava भागात Funabori  स्टेशनपासून दोन मिनिटे अंतरावर Funabori Tower आहे. हा ३ मुख्य टॉवरपैकी एक.  ११५ मीटर उंच टॉवर वरून ३६० डिग्री चोहोबाजूने उंच इमारती, सुमुद्र आणि इतर भागाचे दर्शन घडते.  हा टॉवर पाहण्याजोगा आहे. येथे अजिबात तिकीट नाही.  या भागात इस्कॉन मंदिर आहे. हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे  Shibuya  शिबुया स्टेशन हे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन टोकियो मधील आहे. ६ रेल्वे लाईन्स चे टर्मिनल याठिकाणी आहेत. सर्वात जास्त रेल प्रवासी प्रवास करतात.  या रेल्वे स्टेशनला ६ मोठी exit गेट आहेत.  शिबुया स्टेशन भव्य आणि दिव्य स्टेशन आहे. जपान रेल सेवा सुंदर आणि तंत्रज्ञान उत्तम.. शिबुया स्टेशनमधून बाहेर आल्यावर टोलेजंग इमारती शॉपिंग मॉल्स पाहावयास मिळतात. शिबुया scramble square इमारत ४७ मजली आहे. त्यात हॉटेल्स, restuarant शॉपिंग मॉल्स यांचा झगमगाट, विद्युत रोषणाई आणि इतर सजावट .. संध्याकाळी सुंदर दिसतात.  शिबुया scramble square येथे चौकात हजारो लोक सिग्नल मिळाल्यावर रस्ते क्रॉस करतात.  जगात एव...

जपान -3

  कांगितेन - Kangiten  येथे बुद्ध मंदिर आहे. पूर्वी घनदाट जंगलात हे मंदिर होते. येथे गणेश अष्टविनायक मूर्ती आहे.  बुद्ध आणि हिंदू देव देवता यांच्या पुरातन मूर्ती येथे आहेत.  येथील "काया" झाड ७०० वर्षापूर्वीचे आहे. या झाडाच्या फांद्या खालून वाढतात.  लोक आपल्या इच्छा आणि सर्वाना शांती आणि सुख यासाठी या मंदिरात भेट देतात.  हे मंदिर सॅटायगॉ भागात आहे. 

माझा वाढदिवस - चिंतन

  २४ सप्टेंबर २०२४ -  आज माझा वाढदिवस... मला ६० वर्षे पूर्ण झाली. माणसाच्या आयुष्यात साठीला अधिक  महत्व..आज मला प्रथम स्मरण होते ते माझ्या आई-दादांचे - त्यांच्यामुळे मी हे जग पाहू शकलो.आपण आपल्या आई-वडील यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. आपल्या कुटुंबातील सख्खी आणि चुलत भावंडे, नातलग, शाळा आणि कॉलेज मधील वर्गमित्र आणि मैत्रिणी, नोकरीनिमित्त विविध ठिकाणी आपले वरिष्ठ आणि सहकारीमंडळी, बदली ठिकाणी शेजारी आणि इतर जोडलेले नाती  यांचे भरपूर  प्रेम आणि आपुलकी लाभली. हे पैश्यात मोजता येत नाही. याबाबत मी अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. ही सारी ईश्वराचीच कृपा.. आयुष्यात साठी म्हणजे एक प्रमोशन - "वरिष्ठ" ..संत तुकाराम महाराज म्हणतात - लहानपण देगा देवा.. तेव्हा मला "वरिष्ठ" पद नको .. देवा मला लहानच राहू दे.. जीवनाच्या प्रवासात मला भेटलेल्या व्यक्तीकडून मला खूप काही  शिकायला मिळाले.  त्यांच्याकडून लाभलेला स्नेह, आपुलकी आणि प्रेम .. यांची FD यांनी मी श्रीमंत आहे. सर्वात शेवटचे पण महत्वाचे -  माझ्या जीवनात सावली प्रमाणे असणारी माझी पत्नी  सौ. वर्षा आणि जीवनाच...

जपान -2

  २4 सप्टेंबर २४ - योकोहामा  योकोहामा  भागास भेट दिली.  आमच्या घराजवळील मियाझाकीडाई स्टेशन वरून आम्ही मिरॅटॉमीरायी या स्टेशन साठी ट्रेन पकडली. येथे योकोहामा कॉसमॉस वर्ल्ड या ठिकाणी टोलेजंग इमारती - Queens टॉवर, काही हॉटेल्स, वॉशिंग्टन टॉवर, अश्या भव्य इमारती आहेत. येथे  Amusement  पार्क आहे - लहान मुलांसाठी आणि मोठ्या साठी - adventure game rides , हाउंटेड हाऊस  स्पिननिंग कोअस्टर, ice  वर्ल्ड, मेरि गो राऊंड, पोट्रेट स्टुडिओ, बोट फेरी, ropeway आणि असंख्य करमणुकीचे खेळ आणि साधने आहेत. आम्ही बोट फेरीमधून एक फेरफटका मारला.  सर्व कॉसमॉस वर्ल्ड चे दर्शन घडले. यात योकोहामा बंदर, cruz समुद्रावरील पूल, आजूबाजूच्या इमारती आणि हॉटेल कॉसमॉस क्लॉक २१ - चे सुंदर इलेक्ट्रिकल lighting सीगल पक्षी, बोट सफारी मध्ये मी जीवनाच्या सफारीतील ६०वे स्टेशन गाठले त्यामुळे केक कापून वाढदिवस जोरात साजरा केला गेला. वर्षा आणि श्रेयस यांनी याचे नियोजन केले होते. मनास खूप आनंद झाला. हा अविस्मरणीय क्षण मी विसरू शकत नाही.  नंतर रोपेवे मधून प्रवास केले. जमीन, समुद्र आणि आकाश...