श्रेयसचे यश
जूनमध्ये श्रेयसने IIT प्रवेशसाठी मुलाखती दिल्या. निकालाची वाट पाहत होता. निवडीबाबत मनात शंका आणि श्रेयसला आणि वर्षाला दडपण होते. प्रथम ५ जुलै रोजी IIT रुरकी Ph D बाबत निवड झाल्याचा ई-मेल आला आणि घरी आनंदीआनंद होता.आमचे श्रेयससर लगेच डॉक्टर झाले.प्रोफेसर होण्याचे स्वप्न आता साकार होणार म्हणून खुश होता.IIT कानपुर काही मिळणार नाही म्हणून रुरकीची तयारी मनात सुरु केली. रविवारी वर्षाच्या मैत्रिणीने रुरकी प्रवेश बाबत आनंद सोहळा साठी चहापान कार्यक्रम झाला.हा एक जणू केळवण प्रकार पण खरे म्हणजे .. लेक चालली सासरला ...१२ जुलै रोजी संध्याकाळी IIT कानपुर येथे निवड झाल्याचा ई-मेल आला. आणि श्रेयसच्या आनंद गगनात मावेना. श्रेयसला IIT कानपुर चा निवडीचा ई-मेल आल्यावर त्या रात्री आनंदाने त्याला अजिबात झोप लागली नाही. ९ मुलांपैकी तो एक होता.आता श्रेयस आणि वर्षा IIT च्या विशेष विमानाने हवेत उडत होते. मी मात्र घरी इंडियन रोड मॅप ऍटलास पुस्तक काढून रुरर्की आणि कानपुर कोणत्या राज्यात येतात (माझे भौगोलिक ज्ञान महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेपर्यंतच), आजूबाजूला कोणती प्र...