श्री विजय बापट आणि सौ.नीला बापट - लग्नाचा ५० वा वाढदिवस
आदरणीय श्री विजय बापट आणि सौ.नीला बापट यांना, २३ मे- आपला लग्नाचा ५० वा वाढदिवस... विशेष वाढदिवस .. हार्दिक शुभेच्छा .. आपण उभयतांना सुआरोग्य लाभो हीच मनोकामना.. आपण दोघे सकाळी/संध्याकाळी फिरायला जाताना गाठ पडल्यावर खुशाली विचारपूस करून संवाद घडतो. बऱ्याच वेळा आम्ही .. "मामा - मामा" म्हणून आणि इतर पण चेष्टा मस्करी करतो पण आपण कधीच रागावले असे दिसले नाही. गप्पा मध्ये नेहमी आम्हाला .. नातेवाईक, मुले, संसार, मुलांची नोकरी, नवरा बायको.. याबाबत नेहमी उत्तम सल्ला देत असता आणि आपल्या जीवनातील गंमतशीर अनुभव सांगत असता..रस्त्यामध्ये आपण भेटला आणि आपल्याबरोबर ५-१० मिनिटे गप्पा होतातच... आपण खरच .. friend philosopher आणि guide आहात.. माझा मुलगा जपानहुन "बापट काकाचा" सल्ला घ्या असे आम्हास सांगत असतो. आपला बोलका आणि साधी राहणी, परखड स्वभाव आम्हास नेहमी भावून जातो. आपल्याशी मैत्री आणि स्नेह लाभणे .. आम्ही नशीबवान.. आपला दोघांचा उत्साह पाहून लग्नास ५० वर्षे झाली असे वाटत नाही. आपण दोघे चिरतरुण.. असेच नेहमी आनंदी...