Posts

Showing posts from September, 2021

मी काय वाचले - 12

Image
  विश्वास ग्रंथालयातून "रुजवाई" - ले. प्रतिमा कुलकर्णी यांचे पुस्तक वाचले. हा एक कथासंग्रह आहे. कथेमध्ये  नातिचरामी, रुजवाई, कायापालट, शुष्का, ऋणानुबंध, मंगळसूत्र, स्वयंसिध्दा, नकुशी, रांगोळी .. या कथा आवडल्या.  या कथा संग्रहात  मानवी भावभावनांचा वेध घेतला आहे. आपल्या मनोगतात लेखिका म्हणते - या कथेत वयाच्या प्रत्येक वळणावरच्या स्त्रीमनाचा मागोवा घेतला आहे. प्रत्येक कथेतून काही संदेश मिळतो. "रांगोळी" या कथेचा शेवटचा भाग मला आवडला .जीवनाची रांगोळी विश्वासाचे बिंदू आणि तडजोडीच्या रेघांनी रेखाटावी लागते.  समाधानाच्या फुलांनी सजवावी लागते. कथासंग्रह वाचनीय आहे. 

मी काय वाचले -११

Image
  विश्वास ग्रंथालयातून हे पुस्तक वाचले. हे पुस्तक म्हणजे  IPS अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांचे आत्मकथनाचा दुसरा टप्पा.  "मन मे है विश्वास " हे त्यांचे पहिले पुस्तक   IPS अधिकारी नंतर प्रशिक्षण - हैद्राबाद आणि मसुरी येथील प्रशिक्षण काळातील अनुभव खूप  छान व्यक्त केले आहे.  जीवनाचा ताळेबंद - वेळेचे व्ययस्थापन - ३ फास (Family Friends , Faith ) , 3Hs  (Health , Hygiene , hobby ) , 3Ss  (Soul , Service  Smile ) याबाबत रोजचा ताळेबंद कसा असावा याचे विचार आवडले.  पुस्तकात काही श्लोक, वचने, सुभाषित, काही निवडक वाचनात आलेली पत्रे, कविता, संदेश यांचा समावेश केला आहे. आजच्या मोबाईल, whatsappa यामध्ये सदा गुंग असणाऱ्या मुलामुलींना उत्तमपर बोध आहे,  तरूण वर्गास आपले करियर, जीवनाचे ध्येय, संधी, आरोग्य - शारीरिक आणि मानसिक -मनाचे आरोग्य - याबाबत काही महत्वाच्या बाबी नमूद केल्या आहेत.  सर्व तरुण मुलामुलींनी आणि इतरांनी हे पुस्तक वेळ काढून जरूर वाचावे.  मला आवडले.