निरोपसमारंभ - 4 - श्री विलास चित्रे - एक रमणीय स्थानक

 


                                                     श्री विलास चित्रे - एक रमणीय स्थानक 


मुंबईतून CST  दादर, चर्चगेट, मुंबई सेंट्रल वगैरे स्थानकातून वेगवेगळ्या गावी जाण्यासाठी बऱ्याच गाड्या धावत असतात. गाड्यामध्ये आकर्षक वातानूकुलीन "गीतांजली" अहमदाबादला जाणारी सुखदायी "शताब्दी" दिल्लीकडे वेगाने जाणारी " राजधानी" पुण्याकडे प्रस्थान करणारी लाडकी "दखनची राणी" कोकणात जाणारी "कोकण कन्या" वगैरे..लोकल विभागामध्ये ९ डब्यांची, १२ डब्यांची, सुपरफास्ट, सेमीफास्ट,धीमी गाड्या, सेंट्रल वेस्टर्न. हार्बर रुळावरून दररोज धावतात.  लोकल गाड्यांचा रंग सुंदर निळा,लाल पिवळा आहे. या सर्व गाड्या वेगवेगळ्या स्थानकावरून सुटल्यातरी त्या सर्व गाड्या एक स्थानकावर १-२ मिनटासाठी थांबून पुढे प्रयाण करतात. गाडी कितीही वेगात असली तरी काही मिनटे एक विशिष्ट स्थानकावर विसावा घेऊनच पुढे धावत. त्या रमणीय पण साध्या स्थानकाचे नाव म्हणजेच "विलास चित्रे"


ट्रैनिंग सुरु असताना चित्र्यांच्या टेबलपुढील गाड्यांची गर्दी पाहून श्री देवधर साहेब चित्र्याना काय हो तुमचे नाव "श्रीकृष्ण चित्रे आहे का?" असे गमतीने म्हणत.  सेन्ट्रलच्या सर्व महिला स्टाफ चित्र्याना भेटल्याशिवाय जात नाहीत  असे श्री देवधारसाहेब मला नेहमी म्हणत.  हे खरे असे म्हणा ! ट्रैनिंगसमयी परिसर विभागात काम करण्याऱ्या चित्र्यांच्या अंगणात फुलांचा सडा पडत असे.  त्यांचे दार शोभून दिसे.  चित्र्यांच्या स्थानकात बऱ्याच गाड्या जरी थांबत असल्यातरी त्यांनी आपले स्थानक साधेच ठेवले होते.  कधीच सजावट - झगमगाट नव्हता.  नाव जरी विलास असले तरी त्यांचे राहणीमान कधीच "विलासी" नव्हते.  हे विशेष आहे. इतरांशी आपुलकीने वागत.  म्हणूनच की काय बऱ्याच गाड्या भेटून पुढे जात असत.  असो. गाडीपुराण येथेच थांबवतो नाहीतर तुम्ही म्हणाल सी एम ची गाडी रुळावरून घसरत आहे.


चित्रे यांनी काही काळ परिसर विभागाच्या गादीवर बसून विभागाचा कारभार चांगल्याप्रकारे चालवला.  Adv Sec  - LBA  विभागात काम करणाऱ्या श्री मैत्री यांचेशी चित्रेंचे खास मैत्रीचे संबध होते.  सर्कल ऑफिस परिसरात दोघांची बसायची जागा शेजारीपाजारी असे. एकमेकांची दारासमोर चिखल असे. चित्रे प्रथम शाब्दिक दगड चिखलात टाकत तेणेकरून मैत्रीच्या अंगावर भरपूर राड उडवत.  लगेच मैत्रीपण शाब्दिक दगड भिरकावून चित्र्यांच्या  अंगावर चिखल उडवत असत.  दोघांच्या शाब्दिक जुगुलबंदीचा आनंद आम्ही मात्र भरपूर लुटत असे.  एकूण तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना ... असो 


श्री चित्रे यांनी Association च्या President  पदावरून Association  च्या कामकाजात सक्रिय मदत केली आहे.  चित्रे हातात राजुरी शाखेत मॅनेजर म्हणून प्रमोशनवर जात आहेत.  मित्रानो चित्र्यांच्या अंगणाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय एकही सोमवार आपला जाणार नाही.. गाडयांना आपले आपुलकीचे "स्थानक" दूरवर गेल्यामुळे चुकल्यासारखे होणार.  मैत्री ना पण  करमणार नाही.  राजुरी गावाकडे प्रयाण करणाऱ्या चित्र्यांच्या गाडीस  हिरवा कंदील थकवून जड अंतःकरणपूर्वक आपण निरोप देऊ या.  राजूर शाखेची भरभराट होण्याबाबत चित्रे याना भरपूर यश मिळो.  नव्या जबाबदारीच्या कामात त्यांना सुख समाधान आणि आरोग्य आणि आनंद मिळो.  हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करून मी माझा शब्दांचा छोटासा प्रवास येथेच संपवतो.. धन्यवाद .. गुड बाय ..


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा