पाटील आणि कणवीकर कुटुंबातील लाडके व्यक्तिमत्व
पाटील आणि कणवीकर कुटुंबातील लाडके व्यक्तिमत्व
श्रीकृष्णाला बासरी खूप आवडते बासरीतून सारेगम सप्त स्वर उमटतात. एका बासरीतून समाधान, प्रसन्नता, सहनशीलता, स्वयंपाककला, नम्रता, साधेपणा आणि आदरातिथ्य.. वगैरे असे सात स्वर प्रगट होतात आणि ती बासरी म्हणजे श्रीकृष्णामाईतील मंजुमामी
माझ्या लग्नानंतर मे महिना आल्यावर झुक झुक गाडी मामाच्या गावाला जाऊया मामी मोठी सुगरण वगैरे गाण्याप्रमाणे श्रीकृष्णामाई येथे सुट्टी कशी घालवली याबाबत सांगते. मामीचे आदरातिथ्य आणि स्वयंपाकपाणी व मनापासून सर्वांना खाऊ घालणे याबाबत खरंच कौतुक करावे तेवढे कमीच ..साखरेचे खाणार त्याला देव देणार असे म्हणतात.माझातर साखरपुडा धारवाड येथेच 1995 साली झाला त्यानंतर मला पण मामीच्या हातचे स्वयंपाक व इतर खाद्यपदार्थाचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली आमचे कुलदैवत श्री बनशंकरी बदामी जेव्हा मी बदामी जातो तेव्हा जवळच अन्नपूर्णा देवी राहते तिचे दर्शन व प्रसाद घेत जा असे मला देवी सांगते बदामी दौरा असताना एक दिवस मुक्काम श्रीकृष्णमाईत असे. स्वयंपाक पाण्याबाबत भगवान ओशो म्हणतात खाण्याचा संबंध प्रेमाशी आहे जीवनाशी जेवढे भोजन आवश्यक तेवढे प्रेमही आवश्यक आहे जर अगदीच यंत्रवत भोजन तयार केले गेले तर त्यात सुख मिळू शकत नाही. स्त्रीने जर स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला तर तो तिच्यासाठी अत्यंत आनंददायी असते कारण या जवळे कुटुंबासाठी ती प्रेम प्रगट करीत असते आणि त्यामुळे घरच्या लोकांनी फक्त जेवणाची नाही त्याचबरोबर स्नेहाची प्राप्ती होत असते. रुचकर स्वयंपाक बनवणे ही एक कला देवाने मामीस दिली आहे.
रमेश मामांना कॅन्सर उपचारासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते ऑपरेशन वेळेस सलाईन व इतर औषधउपचार सुरू होते.एकदा तब्येत बिघडली होती तेव्हा मामांनी थोडे घाबरे केले होते तेव्हा मामी न घाबरता त्वरित नर्स डॉक्टरला बोलवून उपचार केले.शेवटच्या आजारपणात मामाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मामींनी न कंटाळता न चिडचिड करता सेवा दिली याला तोडच नाही. मी हॉस्पिटल आणि अणुशक्ती नगर या ठिकाणी पाच सहा वेळा जाऊन मामाला भेटलो हॉस्पिटल आणि अणुशक्ती नगर येथे भेटून मी बेस्टच्या बसने प्रवास करून घाटकोपर येथे घरी जात असे हॉस्पिटलमध्ये वातावरण तब्येत बघून मी काही वेळा घाबरलो असायचो.बसमध्ये बसल्यावर मी माझ्या मनाच्या चित्रपटगृहात प्रवेश करीत असे तेव्हा प्रथम दुर्गादेवी भेटे आणि म्हणे काय घाबरलास का मी खरच घाबरलो असायचो.मी तरी अर्धा तास . मामी तर संपूर्ण दिवस रात्र हॉस्पिटलमध्ये कशी काय राहत असेल नाही का तेव्हा मंजु मामीच्या अंगी असलेल्या सहनशीलता खंबीरपणा गुणांपैकी फक्त दहा टक्के शक्ती मला दे असे मी देवाकडे याचना करे शक्ती बाबत सोडून बोल तू फक्त मामीच्या मनाचा खंबीरपणा सहनशीलता यांचे सदैव स्मरण ठेव असे मला दुर्गा देवी सांगत असे. जे जे होईल ते पहावे चित्ती असो द्यावे समाधान.. मामीच्या अंगी असलेले समाधान, स्थितप्रज्ञता, मनाची प्रसन्नता.. वगैरे गुणांचे स्मरण करून कौतुकाचे अश्रू येऊन डोळे पाणावले जात. तुकोबा म्हणतात आपलाच वाद आपणास याप्रमाणे मी मनातल्या मनात हे गुण माझ्यात का नाहीत मी कोठे कमी पडतो यावर वाद घालत असे करता करता घाटकोपरचा श्रेयस सिनेमा स्टॉप कधी यायचा कळत नसे. मुंबईची बेस्ट प्रवास एकदम बेस्ट आहे. श्रेयस सिनेमा आल्यावर मी माझ्या मनाच्या चित्रपटातगृहातून बाहेर पडून माझ्या घरी जात असे कारण घरी "श्रेयस" वाट पाहत असे.
मध्यंतरी एक सुविचार वाचण्यात आला तो - What you keep to yourself, you lose. What you give away, you keep forever .. हे लेखन म्हणजे खाल्ल्या मीठाला जागणे याचाच एक प्रयत्न आहे.खरंच मामींनी खूप प्रेम दिले आणि खाद्यपदार्थ ताटभरून खाऊ घातले त्याची परतफेड म्हणूनच वाटीभराचा हा शब्दांचा प्रपंच केला त्या गोड मानून घेतीलच
मला बीकॉम ला सेकंड रँक मिळाला होता त्यावेळी प्रशस्तीपत्रक समारंभासाठी 1986 मध्ये धारवाड युनिव्हर्सिटी कडून निमंत्रण आले होते तेव्हा वीकेआरव्ही राव यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र पदवीदान समारंभ फेब्रुवारी 1986 मध्ये पार पडला मी प्रथमच धारवाडला आलो होतो त्यावेळी युनिव्हर्सिटी धारवाड परिसर खूप आवडला होता. समारंभावेळी मलापण चीफ गेस्ट म्हणून इतरांना प्रशस्तीपत्र देण्याची संधी भविष्यात मिळावी असे मनापासून वाटत होते नाहीतर माझी लायकी नसताना मी मामीची परीक्षा घेतली आहे तेव्हा माझेच दुसरे मन मला म्हणाले तूच एक चांगले प्रशस्तीपत्रक बनव म्हणूनच हा लेखनाचा व्याप. श्रीच्या लग्नसमारंभप्रसंगी मामींना प्रशस्तीपत्र प्रदान करण्याची संधी हीच "श्रींची इच्छा असेल नाही का ? मी खरच भाग्यवान समजतो याबाबत मी माझ्या सौ वर्षा राणीच्या ऋणी आहे. तिच्या योगायोग यामुळे हे साध्य झाले. यावेळी श्रीकृष्णामाईतील " श्रीकृष्ण" पण हजर हवे होते कौतुकास्पद प्रशस्तीपत्र .. त्यांच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू नक्कीच आले असते असो.
बरेच दिवसापासून मंजुमामीबाबत काहीतरी भरभरून लिहावे असे मनात वाटत होते पण माझ्या बँकेच्या व्यस्तकामामुळे लेखन लांबत होते. रसिको मी जर एवढे भरभरून मामीचे गुणगान केले असले तरी मंजुमामीचे पाय नक्कीच जमिनीवर असणार यात शंका नाहीच. त्या थोर माऊलीच्या पावलांना माझा आदरपूरक साष्टांग नमस्कार समाधानी अन्नपूर्णे देवीचा वरदहस्त लाभलेल्या मामीस सुआरोग्य लाभो हीच श्री बनशंकरी देवीस प्रार्थना व्यक्त करून थांबतो जीवेत शरदः शतम धन्यवाद..
Comments
Post a Comment