निरोपसमारंभ - 5 - श्री अनिल देवधर - एक सुखद वारा
श्री अनिल देवधर - एक सुखद वारा
एखाद्या गवताळ भागात आपण उभे असतो. त्या ठिकाणी वाऱ्याची सुखद झुळूक येते. तेव्हा आपणास बरे वाटते. अश्या वातावरणात फिरायला बरे वाटते. आपण बरेच चाललो तरी शरीरास थकवा वाटत नाही. पण कधीकधी तोच वारा सुसाट वेगाने वाहू लागतो तेव्हा त्याच्या आवाजाने आणि वेगाने आपण हैराण होतो. वेग कमी झाल्यावर परत नेहमीप्रमाणे तो सुखद वाहून मनास आल्हाद देऊन जातो. आपल्यापासून दूर अंतरावर असणाऱ्या सर्वांपर्यंत तो वारा वाहत जाऊन मनास भिडतो. कधीकधी तोच वारा शीळ देत मंजुळ स्वरात वाहतो. आणि त्या वाऱ्याचे नाव म्हणजे " अनिल देवधर".
कॅप्टन देवधरांनी मला मे-१९९९ मध्ये R & L बोटीवरून ADVANCES Sec - LBA बोटीवर आणले. देवधरसाहेब तसे फिल्डिंग लावण्यात पटाईत आहेत. section मध्ये कोणाची बदली झालेतर ते त्या जागी योग्य ती निवड आधीच करून ठेवत असत. आणि त्याप्रमाणे कारवाई करीत असत. देवधरसाहेबांचे विनोदी स्वभावाचे वारे विभागामध्ये नेहमीच वाहत असत. त्यामुळेच विभागामध्ये खेळीमेळीचे आनंददायी वातावरण असते. त्यांचा हजरजबाबीपणा विनोदी स्वभाव कौतुकास्पद आहे. दोन-तीन दाखले आपणासमोर सादर करतो.
ज्यावेळी RSTC येथे ट्रैनिंग असे त्यावेळी इतर शाखांतून काही महिला कर्मचारी - premises विभागातील श्री विलास चित्रे याना भेटायला येत. तेव्हा चित्रांच्या टेबलाजवळ घोळका दिसे तेव्हा नक्कीच वरती ट्रैनिंग सुरु असणार असे कळे. तेव्हा देवधर चित्रेंना गमतीने म्हणत - का हो - तुमचे नाव श्रीकृष्ण चित्रे आहे का ? त्यांचे "घोडा टू घोडा " हे तत्व मला खूपच आवडले. HO च्या पत्रावर कोणाची सही/पद लिहायचे - उदा; - सिनियर मॅनेजर, AGM , DGM , GM - वगैरे - त्यावर साहेब म्हणत - उनका घोडा तो हमारा घोडा - उदा ल - जर HO चे पत्र AGM सहीचे असेल तर आपण पण AGM सहीचे पत्र पाठवायचे. थोडक्यात घोडा टू घोडा.. एक शाखेतून एका ऑफिसरचा एका proposal निर्णयाबाबत फोन आला होता. पलीकडून तो ऑफिसर साहेबाना म्हणत होता - तुमचा decision लवकर कळवा - कारण कस्टमर आमच्या डोक्यावर बसला आहे. तेव्हा इकडून साहेब पटकन फोनवर म्हणाले त्या कस्टमर डोक्यावरून थोडे सोफ्यावर बसायला सांगा..मध्यंतरी - फॉरीन बॉडी - एक नाजूक मामला - अर्थात माधवरावांचा - या घटनेबाबत माझेकडून लिखाण झाले ते निव्वळ देवधर यांच्या विनोदी स्वभावामुळेच - त्यांच्या विनोदी स्वभावाबाबत जितके लिहावे तितके थोडकेच आहे.
एक तीळ सात जणात वाटून .. या म्हणीप्रमाणे देवधर एखादा खाण्याचा पदार्थ तिघा चार जणात वाटून खात असत. त्यात घरून आणलेला चिवडा, फळफळे, कॅन्टीनची भजी, भडंग .. चिक्कूपण वाटून खात - तथापि साहेब कधीच "चिक्कू" नव्हते. कधीकधी काही खायला नसले तेव्हा ते "गोवा" खात.. "गोवा" खाण्यावेळी मात्र sole बँकिंग असे तिथे consortium अगर multiple नसे.
इतरांच्या अडीअडचणीत मदत करून त्यांना दिलासा देण्याबाबत साहेबाचा हातकंडा होता. त्यात ट्रान्सफर, LFC / Ta बिल, हौसिंग लोन, charge शीट ..वगैरे .. मनासारखी बदली आणि हौसिंग लोन मंजुरी विषयात देवधर - अगदी "देवा" सारखे धावून गरजूना मदत करीत. बऱ्याच जणांना बदलीबाबत मदत करून एक प्रकारे - Association चे काम सुलभ करत. त्यांची परोपकारवृत्ती खरंच वाखाणण्याजोगी आहे. इतर शाखेतून कित्येकांचे मदतीसाठी फोन येत. सर्वाना आपापल्यापरीने ते मदत करत ते सुद्धा - कोणतीही अपेक्षा न बाळगता.. गीतेत सांगितल्याप्रमाणे - कर्मण्ये वाधिकारस्ते..
विभागामध्ये साहेबाना बरेच फोन येत असत. कधीकधी इंटरकॉम पण असे. बऱ्याचवेळी दोन्ही कानाला फोन लावून संभाषण करीत असत. आपल्या टेबलावरील इंटरकॉम जरी ३-४ वेळा वाजला तरी आपण थोडे नाराज होतो चिडतो पण साहेबाना भरपूर फोन आले तरी ते कधीच चिडत नसत. उलट हजारजबाबीपणे फोनवर संवाद साधत. पेंडिंग कामाबाबत शाखा अधिकारी अगर कंपनीच्या अधिकारी याना जरूर चौकशी करत. विभागात आवाज शेवटपर्यंत पोचत असे त्यामुळे क्वचितच इंटरकॉमचा वापर करीत असत.
विभागाच्या कामात ऑफिस नोट कशी असावी. हेड ऑफिसच्या पत्रांना उत्तर कसे पाठवावे. प्रत्येक बाबतीत सकारात्मक दृष्टीकोन.. याबाबत उत्तम मार्गदर्शन देवधरांनी आम्हास केले. प्रत्येकाकडून काम करवून घेण्यात ते तरबेज आहेत. इतर सवलती सहकाऱ्यांना जरूर देत पण कामाच्यावेळी काम झालेच पाहिजे.. जर एखादी गोष्ट कामात चुकली तर त्यावर ते जरूर रागवत पण तो राग कधीच मनात ठेवत नसत. राग मनातून काढून लगेच मन मोकळे करीत. परत प्रेमाने चेष्टामस्करी करत. देवधरसाहेब एखादा दिवस जरी रजेवर असत तेव्हा आम्हालाच काय पण आसपासच्या विभागातील मंडळीपण करमत नसे. लगेच बाजूचे लोक आज " हेडमास्तर" रजेवर का ? असं म्हणत. खरोखरी त्यांनी हेडमास्तरची भूमिका व्यवस्थित पार पाडली आहे. आम्हास वेळोवेळी मीटिंगमध्ये बोलण्याची आणि वरिष्ठ executive बरोबर चर्चा करण्याची संधी देऊन आम्हास नेहमीच प्रोत्चाहन दिले आहे. साहेबांच्या हाताखाली काम करताना कोणालाच कोणते टेन्शन नसे. प्रत्येकाना वेळप्रसंगी ते सांभाळून घेत असत.
श्री देवधरांना प्रमोशन मिळण्यास एक वर्ष उशीर झालाय खरा.. वास्तविक गेल्या वर्षीच ते SM चे CM व्हायला हवे होते. असे CM ला (मला) वाटले. असो. समयसे पहले और भाग्यसे अधिक किसी को कुछ नही मिळता हेच खरे.. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे IF पुणे येथे पोस्टिंग मिळणे म्हणजे .. घी मे शक्कर ..आहे.
साहेबांच्या टेबलवरील फोन व इंटरकॉम याना एकाचवेळी मायेने जवळ घेणारे साहेब नसल्यामुळे थोडे दिवस करमणार नाही, पत्र लिहिताना yours faithfully नंतर घोडा टू घोडा - चेष्टामस्करी यामुळे विभागातील प्रत्येकाना देवधर साहेबांची आठवण होणार यात शंका नाही. काही दिवस गजाभाउंच्या खिश्यात "गोवा" छाप पुडी तशीच राहून जाईल. हेडमास्तर नाहीत म्हणून आसपासच्या मंडळींना पण चुकल्यासारखे होणार..जीवनाच्या शाळेत कित्येक मास्टर येतात आणि दुसऱ्या शाळेत बदली होऊन जातात.. हे सदैव घडतच असते. नाहीतर श्री RT नायकसाहेब देवधरांना - "गुरुजी" म्हणत असत. शेवटी हे हेडमास्तर शाळा सोडून दुसरी शाळेत जात आहेत. तेव्हा संपूर्ण शाळाच भावनाविवश झाली आहे. .. parting is sad हेच खरे.. साहेब IF पुणे शाखेत प्रमोशनवर जातात. मुंबईहून पुण्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा भविष्यकाळ सदैव उज्ज्वल भरभराटीचा सुखसमाधानाचा राहो हीच निसरदेवतेकडे प्रार्थना! त्या सुखद वाऱ्यास सलाम आणि अंतःकरणपूर्व निरोप .. गुड बाय
Comments
Post a Comment