"फॉरीन बॉडी" - एक नाजूक मामला
"फॉरीन बॉडी" - एक नाजूक मामला
आमच्या विभागाचे प्रमुख श्री देवधरसाहेब हे खूपच विनोदी स्वभावाचे आहेत. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, हजरजबाबीपणा , दणदणीत आवाज, परोपकारवृत्ती वगैरे गुण वाखाणण्यासारखे आहेत. सेकशनमध्ये काम करण्याऱ्या सहकाऱ्यांवर ते नेहमीच चेष्टामस्करी करत. कधीकधी ते मला प्रेमाने "माय डिअर सीएम" असे बोलावत तर कधी माझे चुकले तर ते "सीएम इकडे येरे - हे काय लिहितोस रे ? येन आप्पा ! असे रागावून हाका मारतील तेणेकरून आजूबाजूच्या विभागातील सहकारी माझ्याकडे बघत. साहेबांच्यामुळे सेकशनमधील वातावरण नेहमीच खेळीमेळीचं असे. साहेब जर गैरहजर असले तर आम्हालाच काय पण आसपासच्या सेकशनमधील सहकाऱ्यांना करमत नसायचे यात शंका नाही.
आमच्या विभागात काम करणारे श्री माधव आफळे हे आमच्या साहेबांचे लाडके सहकारी. आफळेंच्यापुढे मी "बुवा " लावत नाही कारण लगेच साहेब म्हणतील "बुवा तिथे बाया" पण माधवराव उत्तम प्रवचन कीर्तन करू शकले असते यात शंका नाही. कारण त्यांचा योगशास्त्र, अध्यात्म वगैरेचा अभ्यास खूपच चांगला आहे. साहेब त्यांना लाडाने "म्हाद्या" म्हणत. आम्ही मात्र "माधवराव" म्हणतो. माधवरावांचे कुटुंब पुण्यास असलेमुळे माधवराव दर शनिवार - शेमवर - मुंबई-पुणे-मुंबई प्रवास गेले तीन वर्ष करतात. शुक्रवार व सोमवार यादिवशी आम्ही माधवरावांना चिडवत असतो. शनिवारी सकाळी ऑफिसला आल्यावर "माधवराव मनाने पुण्यास पोचले" असे मी चिडवतो.
एका सोमवारी सुरुवातीस आमचे साहेब - आज म्हाद्या येणार नाही. त्याच्या नाजूक भागाला लागले आहे. त्याचा फोन आला होता.. झाले "नाजूक" भाग म्हटल्यावर आम्ही सर्वजण एकदम काळजीने साहेबांच्या टेबलाजवळ अधिक माहितीसाठी धावलो. तेव्हा - साहेब म्हणाले - सकाळी म्हाद्याचा फोन आला होता. मी मुलींना पोचण्यास स्टेशनवर गेलो होतो. फोन सौ.ने घेतला होता. तेव्हा माधवराव नाजूक भाग दुखावलामुळे १-२ दिवस येऊ शकणार नाहीत. नंतर नाजूक भाग म्हणजे "डोळा" दुखावलामूल्य येणार नाही असे सांगितले. इकडे काहींनी लगेच माधवरावांना दर आठवड्यास न पाठवता महिन्यातून एकदाच पुण्यास पाठवा अशी सूचना साहेबाना केली. इतरजण माधवराव न आल्याबाबत चौकशी करू लागले. तेव्हा नाजूक भाग बारा नसल्याबाबत ऐकून काहींना काळजी/आश्चर्य वाटले. एकूण "नाजूक" मामला आमच्या विभागापुरता न राहता इतरत्र वेगाने पसरला.
दुसरा दिवस मंगळवारी साहेबानी परत नवीन माहिती सांगितली. नेहमीप्रमाणे ते म्हणाले - आज सकाळी परत माधवरावांचा फोन आला होता. - डोळ्यात "फॉरीन बॉडी" गेली होती. ती फॉरीन बॉडी बाहेर काढली आहे. नाजूक भाग बरा आहे. कदाचित माधवराव बुधवारी ऑफिसला हजर राहू शकतील. सर्वानी "फॉरीन बॉडी" म्हटल्यावर परत आश्चर्य व्यक्त केले. फॉरीन बॉडी म्हटल्यावर आता माधवराव फॉरीन लोकांप्रमाणे पोशाख घालणार काय ? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. काहींनी फॉरीन बॉडी हा काय आगळाच मामला आहे बुवा असे उदगार काढले.
बुधवारी माधवराव बॅगेसह ऑफिसमध्ये हजर झाले. ते प्रथम श्री देवधारसाहेबाकडे गेले. फॉरीन बॉडी बाहेर काढल्यामुळे आता डोळा बरा आहे. तरीपण "सूज" आहेच असे साहेबाना सांगितले. तेव्हा लगेच साहेब नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणाले - म्हाद्या पण मला एक सांग तू फॉरीन बॉडीजवळ गेलास कसा? ती फॉरीन बॉडी नाजूक भागात गेलीच कशी? " हे एकूण माधवराव लाजतच जागेवर जाऊन बसले.. कामाला सुरुवात करणार तोच सेकशनमधल्या तिघी मैत्रिणी माधवरावांना गराडा घातला. बहुतेक फॉरीन बॉडी नाजूक भाग - हाच मामला असावा असा मी मनाशी अंदाज बांधला. चौकशी विचारपूस करून तिघी गेल्यावर "गोरेपान" असलेले माधवरावांचा चेहरा लाजेने लालसर झाला होता. (जणू जर्मन माणसासारखा) एकूण इंडियन बॉडी जरी बाहेर गेली तरी नाजूक भाग अजुनी दुखतो यामुळे माधवरावांना जास्त त्रास देऊ नका असे मी साहेबाना गमतीने म्हणालो. इतर मित्रमैत्रिणी यांनी माधवरावांची तब्येतीची विचारपूस केली. बाकी फॉरीन बॉडी - नाजूक मामला सगळीकडे पसरला आहे असे माधवराव म्हणाले.
माधवरावांची एक ऑफिस नोट साहेबांच्याजवळ गेल्यावर साहेब म्हणाले - हे काय - दोन पानी नोट - फॉरीन बॉडी सारखी बनवली आहे. बाकी इतर सविस्तर माहिती नमूद करण्याबाबत सांगून साहेबानी ती फॉरीन बॉडी सारखी वाटणारी नोट माधवरावांना परत केली. त्यादिवशी माधवराव साहेबाना नाजूक भाग दाखवून अजुनी मला त्रास होतो मी परत पुण्यास जाऊन आराम करू का ? डोळा नाजूक भाग असल्यामुळे रिस्क वाटते तेव्हा मी परत सोमवारी येऊ का ? वगैरे सांगून साहेबांची परवानगीबाबत विचारणा करू लागले. नेहमीप्रमाणे साहेबानी परवानगी न देता उलट आता डोळा ठीक वाटतो, आता कामाला लाग असे म्हणाले. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी माधवराव हजर राहू शकले नाहीत. तेव्हा - फॉरीन बॉडी परत पुण्यास गेली वाटते" असे साहेब म्हणाले. माधवरावांच्या रूम पार्टनर यांनी माधव पुण्यास सकाळी गेला असा निरोप दिला. सेकशनमध्ये माधवराव गैरहजर व परत पुण्यास गेल्याचे ऐकुन - फॉरीन बॉडी - नाजूक भाग - परत खळभळ माजली. इतराणीपण " गेला माधव कोणीकडे" अशी विचारणा केली.
सोमवारी माधवराव परत नेहमीप्रमाणे ऑफिसला हजर झाले. इतरांनी माधवरावांनी नाजूक भाग कसा काय? शेवटी सर्व बरे आहे. असे माधवरावांनी सांगितले. finally - फॉरीन बॉडी - नाजूक भाग - Matter is allowed to rest ! अश्या ऑर्डर्स देवधारसाहेबानी दिली. यावर तत्वनिष्ठय श्री पिंगळे व मेत्री यांनी GM यांच्या clear ऑर्डर्स हव्या तरच मॅटर close होईल असा वाद साहेबांशी घातला. तेव्हा नोटवर GM यांच्या written ऑर्डर्स आणतो असे आश्वासन दोघांना दिले. दिसेल त्याची झेरॉक्स काढण्याऱ्या मेत्रीस साहेबानी या नोटची झेरॉक्स एवढी काढू नकोस असे स्पष्ट बजावून पेपर्स व्यवस्थित फाईल करण्याबाबत मेत्रीस सूचना दिल्या.या घटनेवेळी सतीश हा गैरहजर होता. त्याची उपस्थिती हवी होती म्हणजे मामला आणखीन रंगतदार झाला असता. तसेच या नोटमध्ये बरेच value addition सतीशने केले असते.
फायलिंगरूमचा किल्ला एका हाती लढवणारे आमचे सेकशनचे सैनिक गजाभाऊ साहेबांच्या भाषेत "जय महाराष्ट " यांनी ही फाईल व्यवस्थित बांधून फायलिंगरूममध्ये ठेवली. आपले काम मन लावून व्यवस्थित करण्याबाबत गजाभाऊ यांची ख्याती आहेच. नंतर ते मला म्हणाले - माधवरावांची मामला फाईल फायलिंगरूममध्ये व्यवस्थित ठेवली आहे. तुम्ही येऊन बघा. मी रूममध्ये जाऊन बघितले तर - गजाभाऊंनी ती फाईल एका रॅकमध्ये कोपऱ्यात बांधून ठेवली होती. फाईलखाली "फॉरीन बॉडी - नाजूक मामला (माधवरावांचा) - ले. सी एम कुलकर्णी - नावाची पट्टी रॅकवर चिकटवलेली होती. गजाभाऊंचे काम पाहून आनंद झाला.
शेवटी ८-१० दिवस गाजलेला नाजूक भाग मामला प्रकरणावर एकदाच पडदा पडला. विभागातील सहकार्यांनी हा विषय स्मरणीय आहे यात शंका नाही असे उद्गार काढले. हा विषय आपण लिहून ठेवावा असे एक मन मला सांगत होते. पण दुसरे मन म्हणत होते कि मामला खूपच नाजूक आहे. तेव्हा कसा लिहावा - इतर सहकारी काय म्हणतील ? विशेषतः माधवराव. अखेरीस मन घट्ट करून हा मामला आपणासमोर मांडला आहे. आपणास आवडेल या अपेक्षेने..
Comments
Post a Comment