निरोपसमारंभ - 6 - RT नायकसाहेब - लोकप्रिय सागर
RT नायकसाहेब - लोकप्रिय सागर
सागरास अनेक नद्या येऊन विलीन होतात. नाडयांमध्ये काही लहान काही मोठ्या असतात. त्या नद्या विविध भागातून येऊन सागरात विलीन होतात. नद्यांचे पाण्याचे लोंढे लोंढे सागरास येऊन मिळतात. सागर कोठेही तक्रार करीत नाही. उलट सर्वाना बरोबर घेऊन पुढे जातो. माणसांनी समुद्रापासून बरेच काही शिकण्यासारखे आहे. माणसाचे मन समुद्रासारखे अथांग असावे असे म्हणतात. माणसाने टाकाऊ वस्तू सागरात टाकली तरी सागर नको असलेली वस्तू आपल्या पोटात कधीच ठेवत नाही. सागर ती वस्तू नेहमी किनाऱ्याकडे फेकून देतो. थोडक्यात सागराविषयी प्रत्येकास आदर, अभिमान, प्रेम असतेच. सर्वाना सामावून सांभाळून घेऊन पुढे जाणारा लोकप्रिय सागर म्हणजेच श्री RT नायकसाहेब. थोडक्यात RT .
श्री नायकसाहेब हे Advances Section चे पालकमंत्री असल्यामुळे RT च्या केबिनमध्ये advances विभागाचे लोंढे वारंवार असे. आमच्या विभागास त्यांनी उत्तमप्रकारे मार्गदर्शन केले आहे. advances विषयात RT चा हातखंडा विशेष प्राविण्य आहेच. HO च्या ४० ते ५० पानी ऑफिस नोट्स साहेब न कंटाळता संपूर्ण वाचून योग्य ठिकाणी दुरुस्ती वजा सूचना आम्हास करीत असत. साहेबांची स्मरणशक्ती कौतुकास्पद आहे. एखादी बाब आमच्याकडून राहून गेली तरी साहेबांच्या नजरेतून सुटत नसे. प्रत्येक बाबतीत साहेबांचे लक्ष असे. कोणतेही काम व्यवस्थित अधिक चांगले कसे होईल याकडे साहेब अधिक जोर देत असत. ऑफिस कामकाजात RT कधीकधी RTO inpsector ची भूमिका बजावत. ऑफिस पत्रव्यहारात, नोट्समध्ये आम्ही आमची गाडी जोरात पळवली तर RT - RTO inspector प्रमाणे शिट्टी मारून आम्हास बोलावून थोडी दुरुस्ती हवी वगैरे सूचना करीत असत. काहीवेळा साहेब आमचा चुकांबाबत आम्हास शाल जोडीतून .. टोला हाणत. कधीकधी शाब्दिक zadampatti पण करत असत. " RT ची झाडंपट्टी म्हणजे वस्तरा न लागता आमची गुळगुळीत दाढी" असे देवधरसाहेब माझ्यापुढे सांगत असत. RT दाढीवरच काय पण श्री देवधारसाहेबांच्या मिश्यावरपण गंमतशीर comments करून आम्हास हसवत असत.
कामकाजात साहेबांचा स्टॅमिना दांडगा होता. VRS नंतर उद्भवलेल्या परिस्थितीत साहेबानी Circle ऑफिसमधील जवळजवळ सर्व विभागाचा कामाबरोबर RO ठाणे चा कारभार उत्तमप्रकारे सांभाळला होता. त्यांच्या केबिनमध्ये एकाचवेळी ३-४ विभागाचे अधिकारी, कर्मचारी मार्गदर्शनासाठी जमत. अश्यावेळी ते कधीच रागावले, चिडलेले दिसले नाहीत. उलट नेहमी वातावरण हसतखेळत ठेऊन सर्वाना योग्य ते मार्गदर्शन करून पाठवत. त्यांच्या केबिनमध्ये सदैव्य गर्दी असे. त्यांच्या स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके आहेत. त्यांचा दाखला Circle ऑफिस send off कार्यक्रमी जमलेल्या पुष्पगुच्छांनी दिला आहेच. एखादा संघनायक संघातील सर्व खेळाडूंना प्रोत्सहान देऊन संघास विजयश्री मिळवून देतो. साहेंबांच्या अंगी उत्तम संघनायक नेतृत्वाचे गुण आहेतच . काय योगायोग पाहा त्यांचे आडनाव पण "नायक" आहे.
साहेब Section मधील काही सहकार्यांना गंमतशीर नावाने हाका मारून बोलावत असत. त्यांच्या केबिनमध्ये फोन करण्यासाठी गेल्यावर आम्ही फोन नंबरसाठी टेलिफोन लिस्ट साहेबांकडे मागत असे. तेव्हा साहेब - AGM नी फोनपण द्यायचा आणि टेलिफोन नंबरपण द्यायचा का ? असे गमतीने म्हणत. यावर उपाय म्हणून आमच्या विभागातील शिस्तबद्ध पिंगळेंनी सर्व शाखांचे फोन नंबर एका डायरीत नमूद करून ठेवले आणि ज्यावेळी फोन करायचा असेल तेव्हा डायरी घेऊन RT च्या केबिनमध्ये जात असत आणि फोन लावत असत. यावर साहेब पिंगळ्यांना "सेल्फ हेल्प ग्रुप" म्हणत. एकदा इंटरकॉमवर मला ते म्हणाले - सेल्फ हेल्प ग्रुप ना पाठवा. मला प्रथम काही कळेचना. तेव्हा मी श्री गणेशन - ये सेल्फ हेल्प ग्रुप कौन है ? असे विचारल्यावर त्यांनी खुलासा केल्यानंतर मला मात्र हसू आवरेना. मैत्रीचे initial SGM मुळे त्यांना - Section General Manager " श्री लघाटेना - प्रोफेसर- आफळेंना - नटसम्राट , मला स्वतःला - सेकशन चे - पु ल देशपांडे असे गमतीने म्हणत असत. अर्थात माझी लायकी नसताना साहेबानी मला पु ल ही पदवी बहाल केल्यामुळे माझ्यातील पु ल मला म्हणाले - साहेबांविषयी दोन चार ओळी तरी खरड .. म्हणून हा प्रपंच आपणासमोर सादर करीत आहे.
साहेबांचे वास्तविक प्रमोशन व्हायला हवे होते. मुंबई सिटी सरकली येथे पोस्टिंग मिळणे हे एक प्रकारचे प्रमोशन असते असो. बदलीच्या ठिकाणी नव्या कामात भरपूर यश मिळून साहेबाना पुढचे प्रमोशन लवकरच मिळो .. त्यांना सुखसमाधान, आरोग्य मिळून जीवन आनंदमयी राहो हीच प्रार्थना मी व्यक्तिशः आणि आपणासर्वांच्या वतीने नारळीपूर्णिमेनिमित्य समुद्रदेवतेस व्यक्त करतो. RT चा आपण जड अंतःकरणाने निरोप घेऊ या. आपल्या लाडक्या सागरास विनम्र अभिवादन... गुड बाय धन्यवाद ..
27.08.2002
Comments
Post a Comment