हाकोने ट्रिप - 15.11.2025
हाकोने ट्रिपसाठी आम्ही सकाळीं ६.३० वाजता घर सोडले. हाकोने हे एक प्रसिद्ध जपानमधील टुरिस्ट ठिकाण.. हाकोने हे फुजी-हाकोने इझु नॅशनल पार्क चा भाग. हे गरम पाण्याचे झरे, निसर्ग सौंदर्य आणि अशिनोको लेक यासाठी प्रसिद्ध.
Owakudani - येथे आम्ही सकाळी ११ वाजता पोचलो. ३००० वर्षांपूर्वी येथे ज्वालामुखी प्रगट झाला होता. येथे अजूनही सल्फर चे धूर जमिनीतून निघतात आणि हे धूर पाहायला मिळतात. येथील नदीचे पाणी पण गरम आहे. उंचावरून फुजी पर्वताचे दर्शन घडते. येथील गरम पाण्यात अंडे ठेवले तर उकडून ते काळे पडते. हे अंडे जर वरचे कवच काढून आतील भाग भक्षण केले तर आयुष्य ७ वर्षे वाढते असा समज आहे. सारे प्रवासी येथील अंडी विकत घेऊन खातात. हे एक विशेष.
Lake Ashino - ओवाकुडानी येथून आम्ही रोपेवे ने टोगेनडाई (Togendai ) येथे गेलो. रोपेवे मधून जाताना काही जापनीज प्रवासी यांच्याबरोबर थोडाफार संवाद झाला. त्यांना आम्ही तिघे एकत्र प्रवास आणि आमचा पोशाख आणि इतर गोष्टी आवडल्या. त्यांनी आमच्याबरोबर फोटोस काढून घेतले. आम्हास बरे वाटले..(थोडी कॉलर..) टोगेनडाई येथून बोटीने लेक अशिनो येथे जावे लागते. बोट दर ४० मिनिटांनी असते आणि फेरी ४० मिनटे. बोटीच्या डेकवरून प्रवास रमणीय झाला.
बोटीवरून लेक अशिनो येथे उतरल्यावर आम्ही हाकोने पर्वत पायथ्यशी असलेले हाकोने shrine पाहून आलो. या shrine च्या आजूबाजूस घनदाट जंगल आहे. पण रस्ता चांगला आहे. येथील लेकवरून बोट फेरी सोय आहे. येथून सूर्यास्त छान दिसतो. डोंगर, ढग आणि सूर्यास्त आणि आजूबाजूस निसर्ग - सारे रमणीय..संघ्याकाळी साडे चार वाजता सूर्यास्त आणि लगेच अर्ध्या तासात काळोख अंधार पडतो.
या हाकोने ट्रीपसाठी एक अगर दोन दिवसाचा पास मिळतो. या पासमध्ये - हाकोने टोझन ट्रेन, केबल कार, रोपवे, बोट फेरी, आणि odayaku highway बस प्रवास समाविष्ट असतो. एकदा पास तिकीट काढले की झाले. पास हा माणशी ७००० येन. प्रवासात टॉय ट्रेन आणि केबल कार, बोट फेरी हे सुखदायी प्रवास - येथून भरपूर निसर्गाचे दर्शन आणि उंचावरून - सल्फरचे धूर, आजूबाजूचे डोंगर, जंगल, झाडी, भोगदे हे पाहून मन तृप्त होते. हे सारे कसे काय बांधले, याचा देखपाल व्यवस्था, स्वच्छता.. इतर सेवा .. याचे आश्चर्य आणि कौतुक वाटते.. ही एक दिवसाची हाकोने ट्रिप करून आम्ही रात्री ९ वाजता मजेत घरी सुखरूप पोचलो. या ट्रिपचे नियोजन आणि मार्गदर्शन श्रेयसने आणि पोटोबाची सोय वर्षांनी उत्तम पार पाडली..निसर्गदेवतेस मनापासून धन्यवाद आणि आभार...

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)

.jpeg)


.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

Comments
Post a Comment