निरोपसमारंभ -8 - उत्कृष्ट अष्टपैलू - मनीष गोहाड..
उत्कृष्ट अष्टपैलू - मनीष गोहाड..
क्रिकेट खेळात अष्टपैलू खेळाडूचे स्थान महत्त्वाचे आणि मोलाचे असते संघास धावांची अपेक्षा असते तेव्हा तो भरपूर फटकेबाजी करून धावा काढतो ज्यावेळी विकेट हवे असतात त्यावेळी गोलंदाजी करून विकेट्स काढतो. क्षेत्ररक्षणाबाबत तो कोणत्याही ठिकाणी क्षेत्ररक्षण करून झेल पकडून अथवा धावा अडवून संघास विजय मिळवून देत. आपल्या कामगिरीमुळे संघाच्या आणि प्रेक्षकांच्या मनात आदराचे स्थान पटकावून मनात घर करून राहतो. शिरूर संघातील उत्कृष्ट अष्टपैलू म्हणजेच मनीष गोहाड..
दर सहामाही शाखेचा ताळेबंद, इन्कम टॅक्स, अग्रीम स्टेटमेंट, रिटर्न्स, बँक ऑफिस, सिबिल, कॉम्प्युटर आणि इतर कामाच्या वेगवेगळ्या मैदानावर मनीषने चौफेर अष्टपैलू खेळ करून संघास विजय मिळवून दिला आहे. सांघिक कामगिरीमध्ये मनीषचा सिंहाचा वाटा आहे यात शंका नाहीच. संघातील इतर खेळाडू तंबूत परतल्या असताना सुद्धा मनीषा एकटा एका हाताने मैदानावर खेळ करून कामाचा किल्ला सर करूनच घरी जायचा. इतर खेळाडू तंबूत गेल्यावर मीच का एकटा खेळ करायचा काय? हा विचार त्यांनी कधीच केला नसेल का? मी माझ्या वीस वर्षाच्या कालखंडात असा अष्टपैलू खेळाडू सहकारी पाहिला नाही. त्याची चिकाटी सहनशीलता कामावरचा व्यवस्थितपणा तळमळ ही खरच कौतुकास्पद आहे. याबाबत मी खरच धन्य झालो हॅट्स ऑफ टू मनीष...
3 जुलै 1999 रोजी मनीष कसोटीत पदार्पण केले काही काळानंतर त्याचे शिरूर टीम मध्ये आगमन झाले. खेळामध्ये मनीषला मनीषाची साथ लाभली. दोघांनी एकमेकांच्या साथीने धावाचा डोंगर रचला. नंतर मनीषने मनीषा भोवती टाईट फील्डिंग लावली आणि मे 2004 मध्ये आपल्या फिरकीने गुगलीने मनीषाला क्लीन बोल्ड केले. मनीषच्या विवाह नंतर साडेपाच वाजता बँक सुटल्यावर पुण्याला गाडीने थेट घरी येण्याबाबत इच्छुक ऑर्डर्स बाबत आम्ही मनुष्य चेष्टा करीत. असो पण मनीष आपले काम संपून मगच घरी जात असे. लग्नानंतर आणि मनीषाच्या बदलीनंतर ऑफिस कामकाजाबाबत मनीषचा दृष्टिकोन बदलेल असा माझा जो भ्रम होता त्याचे सुद्धा मनीषने दांडी उडवली. मित्र हो, मनीष कधीच घड्याळाकडे बघून काम करत नसे. कॅशियरच्या गैरहजरीत मनीषने कॅश विभाग उत्तम प्रकारे एका हाती सांभाळला. एका हाताने पटपट नोटा मोजण्याबाबत कौशल्याच्या कौतुकाची पावती बरेच ग्राहक मला मुद्दाम भेटून देऊन जात. मित्रहो, मी कधीच कॅश मध्ये काम केले नाही. माझ्याबाबत शंभर नोटा वेगाने एका दमात त्या शंभर निघतीलच अशी शंभर टक्के खात्री नाही.
साहित्य संगीत गायन या कलेच्या क्षेत्रात पण मनीषने बरीच प्रगती केली आहे. तो निसर्ग सौंदर्याचा चाहता आहेच. सर्कल ऑफिसमध्ये हिंदी स्पर्धेत भाग घेऊन दुसरा नंबर पटकावून मनीषने शिरूर शाखेचे शान वाढवली. शाखेच्या ट्रिप मध्ये मनीषने स्वरचित कविता म्हणून सर्वांचे करमणूक केली अलिबागची ट्रिप खूपच छान झाली होती. मनीषला वाचनाची आवड आहेच प्रवासामध्ये एखाद्या पुस्तक बॅगेत असे. आपले दुःख कवटाळत न बसता मनीष सदैव आनंदी हसतमुख असे. यावरून मनीषने आपल्या व्यक्तिगत जीवनातील पैलूंचे वाचन करून त्यावर चिंतन मनन केलेले आहे दिसते, यावर मला सुद्धा एका गाण्याची आठवण येते - " जीवन गाणे गातच राहावे.. झाले गेले विसरून जावे...
आधीच नमूद केल्याप्रमाणे मनीषा आपले काम व्यवस्थित उरकून मगच घरी जात असे. काही वेळेस शनिवार हा हाफ डे असून सुद्धा कामामुळे घरी पोहोचण्यास उशीर होत असे. बँकेचा कामाचा मक्ता एकट्यानेच घेतला आहे का? शनिवार सुद्धा घरी येण्याची हीच वेळ का शनिवार.. हाफ डे चा काय उपयोग वगैरे वगैरे यासारखे कुटुंबाचे (बे) सूर मनीषच्या कानी पडत नसतील काय...? पण मनीषने एक दिवस पण माझ्याजवळ या तक्रारीची टेप वाजवली नाही अगर नाराजी व्यक्त केली नाही. याबाबत मी व्यक्तिशः मनीषचे आणि त्याच्या कुटुंबाची माफी मागतो क्षमस्व. आज निरोप समारंभ प्रसंगी मनीषचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. माझ्या मनात आठवणीचा पाऊस कोसळून पूर आला आहे. शब्दात पकडून आपणास समोर सादर करावे म्हणून हा पंक्ती प्रपंच केला.. असो मनीषच्या भावी जीवन सुखासमाधानचे, आरोग्यदायी, भरभराटीचे आणि समृद्धीचा पाऊस सदैव पडत राहो.. हीच "मनीषा" निसर्ग देतेसमोर व्यक्त करून मी थांबतो.. धन्यवाद .. हार्दिक शुभेच्छा गॉड ब्लेस यु गुड बाय धन्यवाद
Comments
Post a Comment