प्राचार्य शिवाजीराव भोसले - व्याख्यानमाला
प्राचार्य शिवाजीराव भोसले - व्याख्यानमाला
प्राचार्य शिवाजीराव भोसले व्याख्यान याबाबत आपण सर्वाना माहीतच असेल. येथे वेगळे काही सांगण्यास नको. मीपण वर्तमानपत्रातून त्यांच्याबद्दल खूप वाचले होत, पण प्रत्यक्षात मी त्यांचे व्याख्यान ऐकले नव्हते. आमच्या ऑफिसमधील एका सहकारीबाईनी त्यांच्या व्याख्यानाच्या ख्यातीबद्दल मला सांगितले. एकदा त्यांचे "स्वामी विवेकानंद" यांच्यावर व्याख्यान होते पण काही कारणास्तव तिथे हजेरी लावणे जमले नाही. असो एक संधी गमावली. गणपतीचे दिवस आले. गणेश उत्सव पुण्यनगरीत नेहमीच जोरदार साजरा केला जातो. पुणे फेस्टिवल शताब्दी सोहळा जोमात साजरा झाला, श्री श्रीमंत दगडूशेट मंडळावतीने भरघोष कार्यक्रम आयोजित केले होते. या कार्यक्रमात दररोज प्रा, शिवाजीराव भोसले याचे थोर व्यक्तीच्या जीवनावर व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानमालेबाबत माहिती देऊन ही ३१ ऑगस्ट आहे. कार्यक्रमाचे स्थळ सारसबाग जवळ होते. ऑफिस सुटल्यावर स्वतःच्या दुचाकी गाडीवर बसून येण्याबाबत आमंत्रण दिले. एकदा व्याख्यान ऐकल्यानंतर पुढे एकही व्याख्यान चुकवणार नाही असे सांगितले. दुसरे दिवसापासून आम्ही ऑफिस सुटल्यावर कार्यक्रमास जाऊ लागलो. ऑफिस सुटल्यावर मी दररोज कार्यक्रम हजेरी लावून त्यांच्या व्याख्यानातील मुद्दे/सुंदर विचार यांची टिप्पणी करू लागलो. काही नोंदी करू शकलो नाही. नोंदवलेल्या नवीन गोष्टी बाबी आपल्यापुढे संक्षितपणे मंडळींच्या प्रयत्न करीत आहे.
माणसाने आत्मरूपाचा अभ्यास करावयास हवा, आत्मरुपात आनंद आहे. "देव अंतरी, परी न दिसे मजला..." Aspiration - Rejection- Surrnder(शरणागती) An idea which makes your mind weak please reject it.शरणागतीमध्ये माणसाजवळ बौद्धिक शरणागती (Intellectual Surrender ) ची भावना हवी. जेव्हा एक माणूस रोगी घरगुती उपाय वैद्य, साधू जादूटोणा उपाय करूनही बरा होत नाही शेवटी तो एका तज्ञ् डॉक्टरकडे जातो तेव्हा त्याला बौद्धिक शरणागती म्हणतात
माणूस हा जाणिवेचा प्रवाह आहे. Man is simply a bundle of impressions. You cannot step into same water twice. अकारण जाणिवेचा अपव्यय (उधळपट्टी) करू नये. जाणिवेचा प्रवाह विशिष्ट मार्गातून नेला पाहिजे. महर्षी अरविंदांचे लिखाण अवाढव्य आहे. त्यांनी इंग्रेजीतून दोन पुरुष उभे राहण्याएवढे पुस्तके/ग्रंथ लिहिले आहेत. त्यातील - Life Divine, Letters on Yoga, Mother,, वगैरे खूप प्रसिद्ध वाचनीय आहेत. All Life is Yog. मनाच्या किल्ला स्वतःच्या हातात नेहमी हव्यात.
सोवळे म्हणजे काय ? - स्वतःभोवती निर्माण केलेलं (वस्त्राचे) वलय - स्व वलय - माणूस देवाचे/इतर व्यक्तीचे पाय धरून नमस्कार करतो - तेव्हा पायच का? गुढघे, डोके का नाही? पायास एवढे महत्व का..? कारण आपले पाय हे नेहमी जमिनीवर असतात. स्थिती आणि गती दोन्ही पायात असतात. धरतीतून पायास प्रेरणा (स्थिती आणि गती) मिळते म्हणून माणूस पायास स्पर्श करून नमस्कार करतो. देव आहे का? त्यास पुरावा काय म्हणजे एखाद्याला गणित सुटत नसेल तर गणित सुटण्यास काय पुरावा आहे असं म्हणण्यासारखे आहे. श्री समर्थ रामदासांनी सुखकर्ता.. गणपतीची आरती, मारुतीची आरती लिहिली. त्यांनी मारुतीची मंदिरे स्थापन केली.
वक्तृत्व कसे असावे? याबाबत विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा "वक्तृत्व" ग्रंथाचे वाचन जरूर करावे. वक्तृत्वासाठी शब्दाची आराधना हवी. सभाधैर्य, भाषाप्रभुत्व आणि दीर्घ श्वसन या गोष्टीची जोड संभाषणकलेस जरूर आहे. वक्तृत्वाबाबत सावरकरांचा हातखंडा होता. सावरकर म्हणजे ज्यांचे कर देशाचा संसार सावरण्यासाठी आहेत असे म्हटले जाते. शिवरामपंत परांजपे यांचा "काळ" या वर्तमानपत्राचा प्रभाव सावरकरांवर झाला. सावरकरांनी एकदा भाषण स्पर्धेत बक्षिस म्हणून वर्षभर "काळ" पेपर वाचावयास मिळो अशी इच्छा व्यक्त केली होती. सावरकर लंडन येथे शिकत असताना खूप लिखाण केले. इतर देश्याच्या क्रांतिकारकांच्या भेटी घेऊन मैत्री जमवली आणि बॉम्ब विषयी अभ्यास केला. जोसेफ मेझेनि चरित्राचा मराठीत अनुवाद केला. जोसेफ मेझेनि हा इटलीचा रामदास म्हणून ओळखले जाते. १८५७ बंडावरील ग्रंथ हा हॉलंडमध्ये प्रथम छापला गेला. (भारतात परवानगी मिळाली नाही). स्वतंत्र ते भगवती हे संग्राम गीत सावरकरांनी इंटरच्या वर्गात शिकत असताना लिहिले. बोटीतून पलायनाचा योजनाबद्ध कट मर्सिलिस बंदराकडे समुद्रापार करून घेतलेली झेप. "ने मजसी ने परत मायभूमीला" लिहिलेले गीत या सर्व गोष्टी खरोखरीच अंगावर रोमांच उभे करतात नाही का ?
अंदमानात काळ्यापाण्याची शिक्षा भोगत असताना त्यांना खूप शारीरिक मानसिक यातना सहन कराव्या लागल्या याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला. तरी न डगमगता त्यांनी तिथे बेडीच्या आवाजाची लिपी तयार केली आणि बेड्याच्या आवाजातून त्यांनी इतर कैद्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. सावरकरांनी तुरुंगात भिंतीवर गारगोटी काचेच्या तुकड्यानी "कमला" काव्य केले, शब्दांच्या स्फुर्तीची देणगी अलौकिक होती. खरोखरी बुद्धीची कमाल आहे नाही का ? बुद्धिमान माणसाची बुद्धी कोणी कैद करू शकत नाही हे सावरकरांच्याबाबत खरंच होत म्हणायचं. सावरकरांचे हिंदुत्व, बुद्धिनिष्ठ विज्ञाननिष्ठाबाबतचे तत्वज्ञान, समाजसुधारणाबाबत विचार आणि त्यांच्या कार्याबाबत व्याखान्यात उल्लेख केला गेला. सावरकरांना तीन गोष्टी प्रिय - १) एकांत (२) फुलांचा सुगंध (३) नेटकेपणा (गबाळेपणा चुकून नाही). एकांताविषयी सावरकर म्हणत - "मी दररोज माझ्या मनाच्या पार्लिमेंटमध्ये जातो. तेथे वादविवाद, चर्चा करतो. तिथे गेल्याशिवाय मला चैन पडत नाही".
५ सप्टेंबर दिवशी श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावरील विचार ऐकले. राधाकृष्णन यांचे - Hindu Philosophy, Philosophy of Tagore, Eastern Religion & Western Thoughts, Ethics of Vedanta लिखाण प्रसिद्ध आहे. आत्माचे मोठेपणा महत्वाचा - Greatness of SOUL is the sole of all greatness.आत्माची श्रीमंतीसाठी धर्माची जरुरी आहे आणि ती विज्ञान देऊ शकत नाही असे राधाकृष्णन म्हणत.
माणसाने मिळवलेला प्रत्येक रुपयात १/२ भाग धान्यासाठी आणि १/२ भाग फुलांसाठी राखून ठेवावा. गांधीजींबाबत त्यांच्या प्रार्थनेचा उल्लेख केला - त्यांची प्रार्थना निर्मल होती. उपासनेला दिशा हवी. निरपेक्षपणा निर्मला पाहिजे. गांधींची सात तत्वे आजही प्रसिद्ध आहे. ती अशी -
1) Science without humanity is curse - माणसासाठी विज्ञान हवे. विज्ञानातून मानवतेचा विकास घडायला हवा. 2) Knowledge without character is curse - ज्ञानाला चारित्र्याची जोड हवी. जेथे चारित्र नाही तिथे भगवान प्रकट होत नाही. 3) Pleasure without conscience is curse -विवेकरहित आनंद नको. आचार, विचार, उचार याना विवेकाची जोड हवी. (4) Politics without principle is curse (5) Commerce without morality is curse (6) Wealth without work is curse - श्रमातूनच संपत्ती आली पाहिजे (7) Worship without sacrifice is curse - उपासनेस त्यागाची जोड हवी. प्रयत्नपर जीवनात त्यागाचा अंश हवा. जगण्याचा अर्थ तत्वाशी ( मोक्ष) आहे.
टिळकांवर बोलताना टिळकांनी महाराष्ट्रात गणपती उत्सव सुरु करण्याचा उद्देश समजावून सांगितला, टिळकांच्या हुश्यारीबाबत - टिळक शालेय जीवनात नेहमी प्रश्न करत की - मराठी एकवीस (२१) वेळी एक प्रथम नंतर वीस पण इंग्रजीत twenty one म्हणजे वीस प्रथम आणि नंतर एक का..? या प्रश्नाचे उत्तर त्यांचे शिक्षक देऊ शकत नसत. गणित संस्कृत आवडते विषय - "गीतारहस्य" हा टिळकांचा ग्रंथ खूपच प्रसिद्ध आहे. प्रत्येकाने तो विकत घेऊन जरूर वाचावा. गीतारहस्य - हा ग्रंथ ब्रिटिश राजवटीवेळी छापण्यासाठी टिळकांनी सरकारकडे मूळ प्रत दिली होती. बरेच दिवस परवानगी मिळत नव्हती. त्या दरम्यान लोकांनी हा ग्रंथ छापला नाहीतर काय? मूळ प्रत मिळाली नाही तर काय? असे प्रश्न टिळकांना विचारले- तेव्हा ते म्हणतात - हा ग्रंथ आहे तसा माझ्या मस्तकात आहे तेव्हा परत मी जसा आहे तसा सांगेन. टिळकांची बुद्धी अफाट होती. टिळकांच्या बुद्धीची तुलना हिमालयाशी महात्मा गांधी यांनी केली होती. टिळकांच्या मृत्यूनंतर इंग्लंडमधील एक प्रख्यात शाश्त्रज्ञांनी अभ्यासासाठी टिळकांचा मेंदूसाठी वाटेल ती किंमत मोजण्याची तयारी दर्शवली होती. अर्थात ती टिळकांच्या कुटुंबीयांनी नाकारली.
अश्याप्रकारे ८ सप्टेंबर १९९२ रोजी व्याख्यानमालेच्या सांगता झाली. दररोज महर्षी अरविंद,श्री शिवाजी महाराज, संभाजी महाराज, श्री समर्थ रामदास, तुकाराम, सावरकर, महात्मा गांधी, राधाकृष्णन, टिळक या महान व्यक्तीबाबत नवनवीन माहिती ऐकण्याची संधी मिळाली. ती एक पर्वणीच होती म्हणा ना.. त्यांची व्याख्यानमाला ही जणू एक मोत्याची मौल्यवान माळ होती. त्या माळेतील प्रत्येक मणी खूप तेजस्वी, किमतीवान होता असे वाटले. प्रा. शिवाजीराव भोसले यांची ओघवती वाणी आणि प्रसादत्मक भाषा, अफाट स्मरणशक्ती, शब्दांची सांगड, विनोदबुद्धी कौतुकास्पद आहेच. ४ ऑक्टोबर १९९२ लोकसत्ता पेपरमधे "झलक पुण्याची" या सदरात "वाककौशल्य" मथळ्यात बातमी वाचावयास मिळाली - त्यात सभेस जमलेल्या चार आठ लोकांची संख्या प्रा. शिवाजीरावनी क्षणातच आपल्या वाककौशल्याने चारशेंवर नेली. त्यांचा ५५ दिवसाच्या व्याख्यानमालेत तास ते दीड तास व्याख्यानात मला एकही जांभई आली नाही. हे एक विशेष आहे नाही का ..?
आता वाचकाच्या मनात प्रश्न पडेल की मी हा खटाटोप का केला? - प्रा.भोसले यांचे मत ग्रंथाच्या वाचनाची गोडी खूपच कमी होतेय. टीव्ही आणि इतर करमणुकीच्या साधनेमुळे ग्रंथ वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. ग्रंथाची व्याख्या भरपूर पाने असणारा तसाच भरमसाठ किमतवान अशी चुकीची केली जाते. पण ग्रंथ वाचणेवेळी माणसाची देहबुद्धी तुटली पाहिजे. माणसातील विवेक जागा होऊन भासाचे निरसन व्हायला पाहिजे. श्री समर्थ रामदास म्हणत - "ग्रंथाला आत्मा असतो- शब्दाला चैतन्य असते - अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतर झाकोनि जावे.." तेव्हा ग्रंथाबद्दल ओढीची भावना जागृत व्हायला नको का ? नक्कीच ती काळाची गरज आहे. तरुण पिढीने ग्रंथ वाचून शब्दाचा अभ्यास करायला पाहिजे. निदान प्रयत्न करून त्याच्यावर योग्य ते संस्काराची खरंच गरज आहे. प्रा. शिवजीरावांनी आपल्या भाषणात "संस्कार" विद्यापीठपण हवे असे म्हणतात.. हे खरंच आहे.
प्रत्येकाला नवनवीन असं हवे असत.. नवलाई जर नष्ट झाली तर माणसाच्या जगण्यातील आनंद जातो. प्रा. शिवाजीरावांनी सांगितलं की त्या गोष्टी विनामूल्य मिळतात आणि ज्यांचे मोल पैश्यात करता येत नाही त्यांचे स्वागत करायला पाहिजे निदान ती स्वागत करण्याची बुद्धी हवी. प्रा. शिवाजीरावांनी प्रत्येकाच्या जीवनाबद्दल बोलताना सांगितलं की प्रत्येक थोर व्यक्तीतील चांगल्या गुणाचे कौतुक करावे. त्यापासून आपण काहीतरी शिकावे. त्याच्या दुर्गुणांचा उदोउदो करून त्या व्यक्तीला नावे ठेवून कमी लेखू नये. माणूस म्हटले तर चुकणारच/दोष असणार.माणसाने नेहमी दुसऱ्या व्यक्तीतील चांगलं गुणांचा स्वीकार करावा. भले त्याची विचारसरणी भिन्न असो. प्रा. शिवाजीरावांनी सांगितलेल्या जीवनविषयक मार्गदर्शक तत्व, विचार गोष्टी श्रोत्यांनी श्रवण केल्या असतील. वाचकांनी या लेखातून वाचल्या असतील. या गोष्टी नुसत्या वाचून/श्रवण करून भागणार नाही तर यावर मंथन करून आपल्या व्यवहारात आचरणात आणून इतरांपण प्रवाहात सामील करून घ्यायला नको का ..? निदान तसा प्रामाणिक प्रयत्न मनापासून करायला पाहिजे.
मी रोज व्याख्यानास हजेरी लावून त्यातील मजेशीर माहिती माझ्या ऑफिसमधील इतर सहकार्यांना सांगू लागलो. याबाबत मला उलटसुलट प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या - "जप,साधना योग वगैरे गोष्टी लग्नापूर्वी नकोत त्यामुळे मनावर परिणाम होईल- "कीर्तनास (बाबा महाराज) पण हजेरी लावता का..? - आम्हाला वेळ नाही संसार आहे.. आताच कार्यक्रमास जा नाहीतर लग्नानंतर जमणार नाही ..मी हसून या साऱ्या प्रतिक्रियाकडे दुर्लक्ष केले मनाशी ठरवले - ऐकावे जनाचे... असो ऐकून या व्याख्यानमाला श्रवण करण्याचे भाग्य मला लाभले.. मी खरंच नशीबवान..
Comments
Post a Comment