निरोपसमारंभ - 3 - सर्वांचा लाडका सतीश
सर्वांचा लाडका सतीश
३१ मार्च २००१ तारीख जवळ येऊ लागली. यादिवशी सतीश शेणॉय हा स्वेच्छानिवृत्ती योजनेमध्ये कार्यमुक्त होणार. सतीश हा सर्वांचा लाडका. दोन दिवसापासून सतीशवर आपण आपले मनोगत लिहावे आणि कार्यमुक्ती समारंभावेळी सादर करावे असा बेत मी पाडव्यानिमित्य आखला.
मी ऑफिसर होऊन भद्रा अहमदाबाद शाखेत रुजू झाल्यावर तिथे मी association च्या भरीव कामगिरीबाबत सतीशबदल प्रथम ऐकले होते. विशेषतः ट्रान्सफर बाबत तेव्हा सतीश ही व्यक्ती कोण आहे? याबाबत उत्सुकता वाढली आणि एक दिवस Association कामामुळे सतीश अहमदाबाद आल्यावेळी शाखेत प्रत्यक्ष भेट घडली. इतर नेत्याप्रमाणंच हा पण एक असेल असे मला वाटले. नंतर Advances च्या कामामुळे फोनवर वारंवार बातचीत घडून मैत्रीचा श्रीगणेशा सुरु झाला. जुलै १९९८ मध्ये circle ऑफिस मध्ये प्रथम R & L Sec मध्ये हजर झालो आणि मे १९९९ मध्ये Adv Sec LBA मध्ये बदली झाली.एकाच विभागात काम करीत असलेमुळे ओळख वाढून सतीशच्या व्यक्तिमत्वाचे इतर पैलू बघायला मिळाले.
सतीशचे advances चे ज्ञान चांगले आहे. Forex - एक्सपोर्टस/इंपोर्टस विषयात तो एक्स्पर्ट आहेच. यामुळे advances section मध्ये त्याची मास्टरी आहे. त्याची कामगिरी बघून त्याची बदली रद्द करण्यात आली होती. सतीश बऱ्याच कॉम्प्लिकेटेड (कटकटी) आणि महत्वाच्या फाइल्स हॅन्डल करीत असे. काही operative पण फाइल्स होत्या. भरपूर काम असलेतरी त्याचे काम व्यवस्थित होते. कधीही शॉर्ट-कट नोट नसे. त्याला विभागातल्या इतर फाइल्स ची पण जानकारी असे.
सतीशला देवधरसाहेब "नेताजी" म्हणत. section चे काम सांभाळून सतीश Association चे काम तितकेच मन लावून करायचा. सभासदांच्या अडीअडचणीचे निवारण कोणतीही अपेक्षा न ठेवता करणे हा गुण सतीशच्या वाखाणण्यासारखा आहे. त्याचा स्वभाव व कामामुळे त्याचे Executives , Sr मॅनेजर, colleagues , ऑफिस पदाधिकारी यांचेबरोबरचे त्याचे Association खूपच चांगले आहे. सर्वांचा तो लाडका आहेच. Executive च्या बरोबरचे संबंध बघून देवधर साहेब सतीशला सेमी-Executive पदवी बहाल करीत. RSTC मध्ये ट्रैनिंग सुरु असताना इतर शाखेतील महिला कर्मचारी सतीशला भेटावयास येत. त्यावेळी देवधरसाहेब "सिएम - आज सतीशकडे हळदीकुंकू आहे असे वाटते" असे गमतीने म्हणत.
Association मध्ये एक उत्तम defence representative म्हणून सतीशचा लौकिक आहे. आपले ज्ञान व वैचारिक शक्ती यामुळेच त्याने charge sheet केसीसमध्ये काहींना सोडवून बऱ्याच जणांवर उपकार केले आहेत. DR ची कामगिरी निरपेक्षपणे पार पाडली आहे. असं Association चा प्रमुख नेता आणि तरीपण ऑफिसमध्ये आपले काम मन लावून पार पाडणे हे समीकरण आपल्याकडील नेतेमंडळींना लागू पडत नाही यात शंका नाही. आणि यास अपवाद म्हणजे सतीश - हा आगळा नेता. ऑफिस काम, section मध्ये इतरांना मार्गदर्शन, Association ची कामे, Charge Sheet मध्ये DR - या सर्व भूमिका सतीश उत्तम प्रकारे पार पाडत असे. यांचे मला आश्चर्य वाटे. मी नेहमी त्याला याचे रहस्य काय? अशी विचारणा करीत असे. एकूण त्याचा कामाचा व्याप खूप मोठा होता. या त्याचा कामाच्या पसाऱ्यामध्ये सतीश घरच्या authority समोर प्रत्येक केसमध्ये कसा काय डिफेन्ड करीत असेल? असे कोडे मला नेहमी पदे. घरच्या authority समोर डिफेन्ड करणे हि एक अवघड बाब असते हे आपण सर्वाना माहित आहेच. काहीवेळा घराच्या ऑथॉरिटी पुढे अपील नसते तेव्हा डिफेन्सचा प्रश्न नसतो. अश्या विषयात मी जास्त डिफेन्स लढवू इच्छित नाही. पण सतीशच्या यशाचे सारे श्रेय त्याच्या सौ.ना आहे. यात शंका नाही. शेवटी - Behind every successful man , there is a woman हेच खरे.
कामाच्या व्यापामुळे कधी कधी संतोषच्या ऑफिसकामात थोडा विलंब होई. त्यावेळी सतीश म्हणजे - "भगवान की घर मे देर है, अंधेर नही असे देवधरसाहेब म्हणत. इतरांना उत्तम मार्गदर्शन, मदत करून सतीशने काहींच्या मनातला अंधार दूर करून प्रकाश देण्याची कामगिरी पार पाडली आहे यात शंका नाहीं. कामाचा ताण असला तरी सतीश हा नेहमी आनंद असायचा. कधीच चिडलेला रागावलेला नसायचा. सतीशचा स्वभाव विनोदी होता. अधूनमधून जोक्स सांगायचा. त्याचे कंमेंट्स/जोक्स मजेशीर असत. कामाच्या ताणामुळे विभागातील आम्हा सहकाऱ्यांची स्थिती मरगळलेली म्हणजे HC -3 - sick but viable अशी असताना सतीश जोक्स सांगून सर्वाना हसवत तेणेकरून HC - 3 चे HC - १ मध्ये upgradation घडत असे. या त्याच्या विनोदप्रिय स्वभावामुळे तो सर्वांचा लाडका आहेच.
सतीशचा Bus -मिस चा किस्सा मला आपणासमोर नमूद करावा वाटतो. त्याचे असे झाले - एकदा एक शाखेच्या चीफ मॅनेजर साहेबांचा एक proposal बाबत सतीशला फोन येतो - तिकडून मॅनेजर साहेब proposal पाठवलेले मिळाले का? ताबडतोब हेड ऑफिस ला पाठवा. ते मॅनेजर म्हणत होते -
“Satish – There are so many other banks in the race. We will have to hurry up otherwise, we will miss the Bus. Satish hurry up..!”
ज्यादिवशी फोन आला होता त्याच दिवशी नेमका मुंबईत एक पक्षाच्या बंदमुळे मुंबईतील वाहतूक बस सेवा बंद होती. तेव्हा सतीश गमतीने म्हणाला -
“Sir, I will try my level best and I will also see that we will not miss the bus. But today no buses are plying here. I do not have any bus to go home.”
नंतर ते साहेब circle office मध्ये आल्यावर आम्ही बस मिस आला रे ! असे गमतीने म्हणत.. यापुढे विभागाच्या बस प्रवासात सतीशची कंपनी आपण सर्वजण नक्कीच मिस करणार यात शंका नाहीं. सतीशच्या बस मिस आणि इतर जोक्स/कंमेंट्स ची आठवण सदैव राहील.
सतीशला मी अहो जावो न म्हणता - अरे तुरे म्हणत असे. वास्तविक सतीश हा माझ्यापेक्षा वयाने, ज्ञानाने, कर्तृत्वाने खूपच थोर आहे. विभागामध्ये कामाच्या संवाद आणि त्याचा प्रेमळ स्नेहभाव यामुळे दोघात औपचारिकता दूर राहून संवाद एकेरीत घडत असे. थोडक्यात सतीश म्हणजे -
S = Social worker
A = Association Leader
T = Thinker
I = Intellectual
S = Smiling
H = Heatily Nice.
वर नमूद शब्दरूपी फुलांचा गुच्छ मी मनापासून सतीशला अर्पण करत आहे. त्यातील फुलांचा सुगंध त्याच्या जीवनात सदैव दरवळत राहो .. हीच प्रार्थना आगामी रामनवमीनिमित्य श्रीरामाकडे व्यक्त करतो.. धन्यवाद
Comments
Post a Comment