निरोपसमारंभ - 2 सौ. साधना डांगी आणि सौ. शैला कर्वे
सौ. साधना डांगी आणि सौ. शैला कर्वे
माननीय AGM साहेब, DM साहेब, वरिष्ठ अधिकारी आणि माझ्या सहकारी बंधू भगिनींनो,
सौ. साधना डांगी आणि सौ. शैला कर्वे याना आज बदलीनिमित्य आपण निरोप देत आहोत. यावेळी मी जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा मला १९८८ नंतरची बरीच चित्रे डोळ्यासमोर येतात. आता या चित्रपटाची अखेरची घंटा वाजली आहे. आता या चित्रपटाचा थोडक्यात वृत्तांत आपल्यासमोर सादर करीत आहे. प्रथम साधना यांच्याविषयी नंतर मध्यांतर कर्वे यांच्याबाबत,,
साधना डांगी या अष्टपैलू आहेतच, हे सर्वाना माहित असेलच. मी त्यांना "डायन्यामिक डांगी" म्हणत असे. कामातील व्यवस्थितपणा, तळमळ, गती, हस्ताक्षर.. बाबत कौतुक करावे तेवढे थोडेच.. याशिवाय शब्दकोडी, छंद आणि विशेषतः पाककला - यांची आवड त्यांना अधिक आहे. याची चव मला मिळाली आहे. नुसतीच त्या "रेसिपी" लिहून घेत नसत तर प्रत्यक्ष कृती करत.
त्या जेव्हा Agriculture section मध्ये रुजू झाल्या तेव्हापासून त्यांचा माझा संपर्क अधिक आला. section मधील कामकाजाबाबत मला नेहमी त्या रिपोर्टींग करत - आज काय केले, काय पेंडिंग आहे. काहीवेळा मदतीबाबत विचारणा करत. मी काही त्यांच्या section चा supervisor नव्हतो. तरीपण मला त्या सांगत. काहीवेळा मीपण अधिकारशाहीने हे का पेंडिंग? स्पीड वाढावा सांगत असे.. मित्र हो .. त्यांच्यापेक्षा मी जुनिअर असलो तरी त्या कधीच उलट बोलून चिडत नसत.. उलट मदतीसाठी केव्हा येता? असे विचारीत असत.
खरोखर एकमेकातील आपुलकी मैत्री/स्नेह यामुळे दोघात एक प्रकारचा आदरभाव निर्माण झाला होता. याबाबत त्या थोर आहेतच. कामकाजाबत मला एक गोष्ट नमूद करावी वाटते एक दिवशी आम्ही दोघांनी १७ शाखांच्या फाइल्स चे review केले यात - follow up लेटर्स, मास्टर कार्ड बनवणे यांचा समावेश होता. त्यांच्या branch indexing बाबत व्यव्यस्थितपणा, स्पीड, कामाबाबत तळमळ यांचे दर्शन झाले. याबाबत section हेड श्री साहूसाहेब जास्त सांगतीलच.
शैला कर्वे आणि मला काहीजण २४ म्हणून चिडवत. दोघांच्याबाबत विचारात, स्वभावात एकमत साम्य होते. आम्हा दोघांचा जन्म २४ सप्टेंबर म्हणून असावे वाटते. काय योगायोग - २४ बाबतीत काही सद्गुणाबरोबर थोडा(?) हट्टीपणा,, एखादी गोष्ट मनाला पातळी तरच होकार.. वादविवाद, स्पष्टवक्तेपणा.. लक्षणे.. कृपया याकडे साधना डांगी योनीपण ध्यान द्यावे कारण त्यांचा कन्येचा जन्म पण २४ सप्टेंबर.. हो .. पण कृपया यात आणखीन काही गोष्टी वाढवू नका ह.. हे गंमत म्हणून सांगतो. शैला कर्वे यांनी R & L आणि Advances विभागात भरीव कामगिरी केली आहे. विशेषतः R & L मधील कामगिरी उल्लेखनीय होती. त्यावेळी त्यांना अंजु जोशी यांची साथ होतीच. मी आज R & L विभागाला जी थोडीफार मदत/मार्गदर्शन करतो त्याचे श्रेय शैला कर्वे याना आहे. त्यांच्याकडून मी R & L बाबत बरीच माहिती/ज्ञान मिळवले आहे. R & L आणि Advances section मध्ये काम करताना आमची बऱ्याच मुद्द्यावर कामाबाबत चर्चा, वादविवाद चाले. विचारांची देवाणघेवाण घडे.. याचा फायदा मलातरी झाला.
ऑफिसकामासोबत शैला कर्वे यांना साहित्य, वाचन नाट्य-चित्रपट, राजकारण, खेळ, चालू घडामोडीबाबत माहिती .. आवड आणि रुची अवर्णीय आहे. याचा मला प्रत्यय व लाभ संवादातून मिळाला आहे. या आमच्यातील संवादास "बासरीची" उपमा द्यावी असे मला वाटते. बासरीतून जसे .. सा,, रे.. ग सात सूर उमटत .. त्याप्रमाणे.. एक सूर वाचनाचा, एक राजकारण, एक खेळ.. कधीकधी जुगलबंदी होत असे. तरीपण बऱ्याचवेळा सूर जमत असे.. थोडावेळच आमचे बासरी वादन बंद असे. हे मी चांगल्या हेतूने नमूद करू इच्छितो..कृपया गैरसमज नसावा.. एकूण काय .. एखादी चांगले वाचले,श्रवण केलेतर एकमेकांना द्यावे... याची दोघांना आवड आहे.
मी दोघीपेक्षा लहान असूनसुद्धा त्यांना रागावून, चेष्टेने, टीकात्मक बोलले असेन.. याबाबत R & L मध्ये जसे - simplified NF - 724 सादर जरून - Dues write off आणि unapplied interest waive केलं जाते.. तसा माझा कॉमन simplified NF - 724 दोघीना सादर करीत आहे. त्या मंजूर करतीलच अशी खात्री आहेच ,, क्षमस्व..
मला दोघींच्या घरी भेटी देण्याचा योग आला. दोघींच्या घराभोवती सुंदर बागा आहेत. त्यांची कल्पना इतरांना असेलच.. या बागकाम त्यांच्या सहभागाबाबत मला कल्पना नाही.. (टोमणा नव्हे ह ) पण बागेतील फुले, झाडे वेली पाहून मनास आनंद झाला. त्या दोघींच्या व्यक्तीगत आणि कौटुंबिक जीवनाची बगसुद्धा भविष्यात अशीच सदैव सुंदर फुललेली बहरत राहो.. त्या बागेत त्यांच्यातील आणि माझ्यातील मैत्रीची स्नेहरुपी वेलीची वाढ बहरत कायम राहो हीच सदिच्छा व्यक्त करून माझा चित्रपट आटोपता घेतो. आठवणी कराव्या तितक्या कमीच, दोघींचे जीवन आनंदमयी, सुखकारक जावो हीच हार्दिक सदिच्छा.. धन्यवाद.. आपला सी एम
Comments
Post a Comment