CBROA पुणे युनिट यांची वार्षिक सर्वसाधारण सभा - मुक्त छंद दिवाळी अंक
आज CBROA पुणे युनिट यांची वार्षिक सर्वसाधारण सभा सकाळी दहा ते बारा दरम्यान स्वामी कृपा हॉल कोथरूड येथे संपन्न झाली. सबंध वर्षातील CBROA च्या कार्यक्रमाचा आढावा घेतला गेला. वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी वेळात वेळ काढून पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपमहाप्रबंधक श्री सेंथिल कुमार यांनी हजेरी लावत कॅनरा बँकेच्या व्यावसायिक भरगोस प्रगतीचा आढावा घेतला आणि साऱ्या निवृत्ती अधिक अधिकारी सभासदांना धन्यवाद दिले.आदरणीय श्री जगदीशजी जनरल सेक्रेटरी सीबीआरओ यांनी आपल्या प्रमुख भाषणात संघटनेबाबत माहिती, पेन्शन, इन्शुरन्स योजना, न्यायालीन केसेस, आणि संस्थेच्या नवीन संकल्पना याबाबत विस्तृत माहिती सभासदांना सांगितली . आपल्या पुणे युनिटी यांनी घेतलेले उपक्रम, समाजसेवा, दिवाळी अंक प्रकाशन या सर्व कामा बाबत कौतुकाचे उद्गार काढले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि सभासदांच्या सभा याबाबत CBROA पुणे युनिट सर्वात प्रथम आघाडीवर आहे अशी कबुली श्री जगदीशजी यांनी देत असेच उपक्रम भविष्यात चालू ठेवण्याबाबत सभासदांना विनंती
मध्यंतरानंतर दुपारी बारा वाजता मुक्त छंद दिवाळी अंक प्रकाशनाचा कार्यक्रम सुरू झाला. सातवा दिवाळी अंक प्रकाशन याबाबतची संकल्पना याबाबत संपादक यांनी आपले विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विजय कुवळेकर ज्येष्ठ साहित्यिक आणि माझे संपादक सकाळ यांचा कार्याचा आढावा आणि परिचय माहिती सभासदांना सांगितली. माणसांना छंद हे जोपासले पाहिजे. निवृत्तीनंतरही प्रत्येकाने आपले छंद जोपासत आनंदाने जीवन जगले पाहिजे असे उद्गार श्री विजय कुवळेकर, साहित्यिक आणि पत्रकार यांनी "मुक्तछंद" दिवाळी अंक प्रकाशना वेळी व्यक्त केले. मुक्त छंद दिवाळी अंक अंकातील लेख, कविता, आठवणी, माहिती या याबाबत श्री कोळेकर यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांनी दिवाळी अंक, माणसांचे छंद, काही लेखक यांचे लेख यावरच्या मजेशीर किस्से यांच्या आठवणी जागवल्या. निवृत्तीनंतर आपले छंद जोपासत सभासदांच्या लेख कविता आणि इतर माहिती मासिकातील लेख यांचे कौतुक केले. श्री विजय कोळेकर यांचे भाषण उत्तम झाले. उपस्थित सभासदांनी भरभरून दाद दिली. प्रकाशक श्री भालचंद्र कुलकर्णी यांनी मासिकाच्या प्रकाशन बाबत आपले विचार मांडले. कार्यक्रमाची सांगता चविष्ट स्नेह भोजनाने झाली. या कार्यक्रमास जवळजवळ 100 सभासद मंडळींनी हजेरी लावत कार्यक्रमाची शोभा वाढवत खरी दिवाळी साजरी केली. वार्षिक सर्वसाधारण सभा आणि दिवाळी अंक प्रकाशन या कार्यक्रमासाठी CBROA पुणे युनिटच्या साऱ्या पदाधिकारी, संपादन मंडळ आणि कार्यकर्ते यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.🙏 असेच सांस्कृतिक आणि समाजसेवक उपक्रम आपण करूया आणि यासाठी CBROA पुणे संस्थेस सहकार्य करूया. चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी






Comments
Post a Comment