"प्रथमेश" - सौ. मेधाताई

 



बेळगाव दौऱ्यात आमचा मुक्काम ४ दिवस प्रदीपकडे होता. "प्रथमेश" या वास्तूमध्ये प्रदीप भाड्याने राहत आहे. बंगल्यात हॉल प्रशस्त मोठा, ३ बेडरूम, स्वयंपाकघर मोठे, प्रत्येक खोलीत खिडकीतून प्रकाश, हवा खेळते.  चारीबाजूने कुंपणांजवळ फुलं फळांची झाडे,  दारासमोर कार आणि दुचाकीसाठी पार्किंग जागा, बंद विहीर आहे. हा बंगल्याचे मालक डॉ. साठे आणि सौ. मेधा साठे.  हे दोघे वरच्या मजल्यावर राहतात. आम्ही जवळजवळ पंधरा लोक येथे मुक्कामास होतो. आमच्या मुक्कामात दररोज आम्हा सर्वांची भेटीतून चौकशी करत.  एकदिवस चहासाठी डॉ. आणि सौ. मेधाताई आले असताना आम्हा साऱ्या भावंडांची व्यक्तिशः प्रत्येकाची  चौकशी केली.  आमच्या गप्पा आणि चेष्ठा.. आवाज .. यामुळे आपणास त्रास होत असेल नाही का ? असे विचारल्यावर - आम्हास तुम्ही सगळे एकत्र जमला आणि वाढदिवस, निवृत्ती दिन साजरे केलात हे पाहून आम्हास आनंद झाला आणि बरे वाटले अशी कबुली उभयतांनी आम्हास दिली.   सौ. मेधाताई डॉ. अदितीस आपली मुलगी याप्रमाणे आपुलकी दाखवत प्रेम करतात.. माझी मैत्रीणप्रमाणे आमचे नाते आहे असे सौ. संपदा वाहिनीनी आवर्जून सांगितले.  अत्यंत नम्र आणि प्रेमळ असे डॉ. आणि सौ. मेधाताई यांच्याबरोबर गप्पा - आपुलकी हे पाहता आपली बऱ्याच वर्षांपासून ओळख आहे असे आम्हास वाटले.  "भाग्यनगर" दुसरा क्रॉस, हरीमंदिर बेळगाव  येथे "प्रथमेश" वास्तूत  राहणाऱ्या प्रदीप आणि सौ. संपदा हे खरंच "भाग्यवान"  ही सारी हरीचीच कृपा .. शेवटी चांगल्या माणसांना चांगली माणसे भेटतात हे खरे ..नाही का ...?  जे अनुभवले ते सादर केले.  धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा