जिव्हाळा जेष्ठ नागरिक - सुनीताबाई पुरुषोत्तम देशपांडे यांच्या जीवनपटावर
सुनीताबाई या पु. ल. च्या backbone होत्या असे मत श्री अमोल जोशी यांनी - सुनीताबाई पुरुषोत्तम देशपांडे यांच्या जीवनपटावर आधारित अभिवाचनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. १० सप्टेंबर २०२६ रोजी जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघानी आयोजित कार्यक्रमात श्री अमोल जोशी यांनी - १) ६० वा वाढदिवस - सुनीताबाई मला कोठे भेटली. २) सुभाष अवचट सुनीताबाई लेख, ३) सुनीताबाई - प्रिय भाई पत्र असे तीन लेखांचे अभिवाचन केले. शेवटी - सुनीताबाई आणि पु ल यांनी सादर केलेली - बा. भ. बोरकर यांची - माझ्या गोवाच्या भूमीत - या कवितेचा ऑडिओ सादर केला. साऱ्या सभासदांनी या श्रवणीय कार्यक्रमाचा आनंद लुटला. विशेषतः प्रिय भाई या पत्राच्या वाचनावेळी शांतता होती. अभिवाचनानंतर रसिक श्रोते विन्मुख झाले. श्री अमोल जोशी यांचे अभिवाचन उत्तम झाले. सर्वाना आवडले. या सुंदर कार्यक्रमाबत जिव्हाळा जेष्ठ नागरिक संघाचे मनापासून धन्यवाद आणि आभार
Comments
Post a Comment