वाचनकट्टा -26 - रवींद्रयान - ले. रवींद्र पिंगे

 




 रवींद्रयान   - ले. रवींद्र पिंगे  

ललितलेख यांचा संग्रह -  यातील आर के नारायणाची अखेरची मुलाखत, पुरस्कारांचं महत्व किती ?, एका  शतायूचा सुखसोहळा , कोण कश्यासाठी लिहितात? , लेखनकला इतकी सोपी आहे ?  माझा लेखनप्रवास - हे ललितलेख वाचनीय 

पुरस्कारांचं महत्व किती ? या लेखातील काही भाग 

तेव्हा मला इतरांच्या यशाचा हेवा वगैरे कधीच वाटत नाही. माझे बाब मला नेहमी बजावायचे, 'रवी, लक्षात ठेव. बक्षिसं नि पारितोषिक मिळतात किंवा न मिळतात. त्यावर आयुष्यातलं काहीही अवलंबून नसतं. माणसाला देवाचा अनुग्रह लाभावा लागतो.' तेच खरं आहे नि ते एकदा उमगलं की शांत वाटतं. गौतम बुद्धांचा उपदेश आहे की यशस्वी होऊ नका; कारण यश चिकटलं की सभोवार मत्सरी माणसांची भिंत उभी राहते. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ होता. अयशस्वीही होऊ नका, कारण अपयशानं तुम्ही आतून खचून जाता. यश आणि अपयश यांच्या पलीकडे एक निवांत पैस आहे, तिथे पोहोचा

आशयसंपन्न, घाटदार, सोपं लेखन लेखकाला चार पावलं पुढे नेतं.

अनेकजण विचारतात, धावपट्टीवर धावणाऱ्या इतर लेखकांचं डोंगराएवढं यश पाहून तुम्हांला निराशेचे झटके येत नाहीत काय? पु.ल., रणजित देसाई, वसंत कानेटकर, मंगेश पाडगावकर, यांनी खोऱ्यांनी पैसा ओढला; पोतं भरून मानसन्मान मिळवले. त्यांच्या तुलनेत तुम्ही कुठेच नाही, याची तुम्हांला हळहळ वाटते काय? ते साक्षात ताठ वृक्ष, तर तुम्ही जेमतेम एक झुकलेली फांदी !

त्याचं खरं तर उत्तर असं आहे की दुसऱ्याच्या भाग्याचा मी कधीही हेवा करीत नाही. केशवराव कोठावळे मला एकदा म्हणाले होते, 'जो तो आपल्या भाग्यानं मिळवतो नि आपल्या भुकेच्या प्रमाणात खातो. आपण त्याचा नाहक हेवा कशासाठी करायचा? मत्सर करून काय मिळतं? आपण आपल्या कुवतीनुसार दोन्ही हातांनी मिळवावं नि एका हातानं खावं. पिंगे, दुसऱ्याच्या भाग्याचा कधीही मत्सर करू नका.'








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा