कर्नल्स क्यूब - "स्व-व्यवस्थापन" - डॉ. कल्पना देशपांडे
ताण तणाव मुक्त वृद्धत्वासाठी "स्व-व्यवस्थापन" अत्यंत महत्त्वाचे असे मत डॉ. कल्पना देशपांडे यांनी "ताणतणाव मुक्त वृद्धत्व" या कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. स्व व्यवस्थापनामध्ये वेळ, विचार, भावना, आरोग्य, सवयी आणि अपेक्षा यावर भर दिला जातो. स्व व्यवस्थापन म्हणजे फांद्या छाटण्यापेक्षा झाडाच्या मुळाकडे लक्ष देणे. नोकरी, संसार, मुलं, नातवंड आपण सर्व मॅनेज करतो पण आपले मन आपल्या ताब्यात आहे का? दुसऱ्याला बदलायच्या भानगडीत पडायचे नाही. निवृत्तीनंतर आपली भूमिका आणि रुटीन बदलते. आयुष्याचे घड्याळ बंद झाले असे होत नाही. निवृत्ती नंतर आपण मार्गदर्शन आणि समाजासाठी काही योगदान देऊ शकतो का याचा विचार करावा. संयुक्त कुटुंबामध्ये नातवंडांच्या प्रेमापोटी आपल्या आरोग्याकडे, विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नये. आपल्या अपेक्षा बोलून दाखवा आणि संवाद वाढवा. प्रेम आणि जबाबदारी यातील फरक ओळखा आपल्या मर्यादा ओळखा नकार देण्याची कला महत्त्वाची. काळजीपोटी कुटुंबात आपला जास्त हस्तक्षेप वाढत नाही ना याचा जरूर विचार करावा. सोडून द्यायला शिकावे. आपल्या मताप्रमाणे इतरांनी वागावे हा अट्टाहास नको. कुटुंबात नाते महत्त्वाचे. कुटुंबातील माणसाच्या मनात योग्य ती जागा महत्त्वाची. विभक्त कुटुंबामध्ये जुन्या आठवणी कुरवाळत बसू नये. नकारात्मक विचार बाजूला सारून प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया देणे बंद करावे. आपली स्वतंत्र ओळख महत्त्वाची - योग, वाचन, संगीत, नवीन कौशल्य शिकणे इतर छंद बाळगणे. स्वतःच्या सहवासाचा आनंद घेणे. नातवंडा बरोबर सहवासात पसारा शांतता चिडचिडपणा याचा बॅलन्स राखणे. सोसायटी मीटिंग मध्ये आपले मत व्यक्त करणे ते न ग्राह्य धरल्यास सोडून देणे आणि मिटींगचे गाठोडे घरी घेऊन येऊ नये. डिजिटल युगात व्हाट्सअप संयम बाळगणे. इतर नवीन ॲप्स शिकून घेणे you tube वर व्हिडिओ पाहण्यात जास्त वेळ का घालू नये. स्टेटस चेक करून तुलना सोडून द्यावी. प्रत्येक व्हाट्सअप मेसेजला प्रतिक्रिया देणे बंधनकारक नाही. आनंदी आणि ताण मुक्त जगण्यासाठी मेंदूचे व्यवस्थापन जरूर आहे. सकारात्मक गोष्टींचा विचार नेहमी चांगले हार्मोन्स निर्माण करतो. छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद मिळवा छोटी ध्येय ठेवून प्रगतीची नोंद ठेवा स्वतःची पाठ थोपटायला शिका. वेळेवर उठणे, झोपणे आणि निसर्गात वेळ घालवणे, निरपेक्षपणे लोकांसाठी काहीतरी करा. आनंदी जीवनासाठी कृतज्ञताभाव हा महत्त्वाचा. कुटुंबातील व्यक्तीशी प्रेमळ संवाद, प्रेम व्यक्त करा. नियमित व्यायाम हास्य, नृत्य, कला जोपासा. जे बदलता येणे शक्य आहे ते बदला, जे बदलता येत नाही त्याचा स्वीकार करा. जीवनात तीन गोष्टी महत्वाच्या - शांतता, प्रसन्नता आणि चेहऱ्यावरील हास्य. नेहमी वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करा. डॉ. कल्पना देशपांडे यांनी आपल्या भाषणात उपस्थित श्रोत्यांना विविध विषयावर आपापले मत आणि विचार जाणून घेत भाषण खूपच संवादात्मक केले. स्व व्यवस्थापन या विषयावरील भाषण ऐकल्यावर साऱ्या श्रोत्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि आनंद दिसला यात शंका नाही. शेवटी संस्थेचे कर्नल फुले यांनी सुंदर भाषणाबाबत आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाबाबत संस्थेचे मनापासून आभार आणि धन्यवाद



Comments
Post a Comment