कर्नल्स क्यूब - "निरोगी वृद्धत्व - आनंदी आणि सक्रिय जीवनाची गुरुकिल्ली"

 





माणसाच्या मानसिक आणि शारीरिक क्षमता कमी होणे म्हणजे वृद्धत्व - Ageing  असे मत न्यूरोसायकॅस्ट्रिक व उपचार तज्ञ डॉ. सुमित चांडक यांनी "निरोगी  वृद्धत्व -  आनंदी आणि सक्रिय जीवनाची गुरुकिल्ली"  या कर्नल्स क्यूब संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.निरोगी वृद्धत्व म्हणजे काय .. वृद्धत्वात मानसिक आणि शारीरिक बाबी याबाबत उपाययोजना, वृद्ध लोकांच्या साठी सरकारने सुरू केलेल्या योजना, हेल्थ इन्शुरन्स, वृद्धांचे उत्पन्न आणि औषधावरील खर्च, वृद्धांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान या आणि अनेक विषयावर डॉ. चांडक यांनी पावर पॉइंट द्वारे उपस्थित सभासदांना माहिती दिली. शारीरिक हालचाल, व्यायाम  मित आहार, धुम्रपान आणि मद्यपान यांचा मज्जाव, नवीन भाषा शिकणे, आपले छंद जोपासणे, वाचन, शांत झोप..मित्रमंडळी संवाद,  वृद्धत्वाचा स्वीकार या गोष्टी आचरणात आणल्यास आपले वृद्धत्व आनंदी होईल.वरिष्ठ नागरिक यांच्यासाठी सरकारने योजना सुरू केल्या आहेत. त्या योजना तळागाळात सर्वत्र पोचवण्यासाठी आपण वृद्ध लोकांनी हातभार लावला पाहिजे. सगळ्या गोष्टी सरकारने कराव्यात असे न म्हणता आपण वृद्ध मंडळींनी सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करू या... डॉ. चांडक यांनी उपस्थित सभासदांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर देत शंका निरसन केले. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन या निमित्त डॉ. चांडक यांनी निरोगी वृद्धत्व याबाबत उत्तम विचार मांडले. प्रत्येकाने  डॉक्टरांनी सांगितलेल्या टिप्स  आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणावे आणि आनंदी राहावे असे मत कर्नल फुले यांनी आभार प्रदर्शनात व्यक्त केले.  या उपयुक्त कार्यक्रमाबाबत  कर्नल्स क्यूब संस्थेचे मनापासून आभार आणि धन्यवाद.🙏  चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी कोथरूड पुणे.

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा