बेळगाव, बदामी, अलमट्टी - १० ऑगस्ट २०२६

 


१० ऑगस्ट २०२६ - सकाळी सात वाजता बेळगाव हुन बदामीकडे प्रयाण - नेसरगी येथे नाश्ता केला. श्री करियम्मा देवी मंदिर - बुद्धिगोप  (ता. सवदत्ती )   - बेळगावहून बदामीस जाताना नेसरगी पासून दोन किलोमीटर वर  वाटेवर मुख्य रस्त्याबाजूला हे मंदिर आहे. या देवीची शक्ती अलौकिक आहे.  आपल्या प्रवासाचे संरक्षण असे या देवीस संबोधले जाते. प्रत्येक वाहन चालक (बस, ट्रक, कार ..) येथे मुद्दाम थांबून देवीचे दर्शन आणि नमस्कार करूनच पुढचा प्रवास करतात. या देवीचे दर्शन घेतले तर पुढचा प्रवास हा सुखकर आणि सुलभ होतो.  गाडी चालवताना कोणतेही अडथळे येत नाहीत. आम्ही उतरून या देवीचे दर्शन घेतले आणि सर्वांचा जीवनाचा प्रवास सुखकर हो हीच प्रार्थना केली. 

सकाळी आम्ही अकरा वाजता बदामीस पोचलो. श्री शाकंभरी देवीचे दर्शन, कुंकुमार्चन, इतर पूजा करून यलगुर मारुती कडे प्रयाण केले. श्री शाकंभरी देवीचे दर्शन घेतल्यावर मन प्रसन्न झले. देवीच्या मूर्तीमध्ये विशेष divinity  जाणवते. 

बदामीहून आलमट्टी धरण कडे प्रवास करताना वाटेत यलगुर या गावी भेट दिली.  येलगूर येथे येलगुरेश्वर हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे. नजीकच्या सात गावातील हे एकमेव हनुमान जागृत मंदिर आहे. साती गावातील  लोक या मंदिरातील हनुमानाची पूजा करतात.  श्री रामाच्या आज्ञेनेनुसार सात गावे वसवल्यावर श्री यलगुरेश यलगुर गावात विराजमान झाले (एलु उरेश = यलगुरेश -सात गावांचा स्वामी ). श्री हनुमानाची मूर्ती गोविंदराज केरे (तलाव) येथे सापडली होती (आता याला गोंडी केरे म्हणतात).  या मंदिरात आम्हाला सौ. श्रुती मॅडमच्या कृपेने गाभाऱ्यात विशेष पूजा योग लाभला आणि मंदिराचा पुजारी यांनी मंदिराचा पूर्वपीठिका सांगून हनुमानाचा फोटो भेट आणि प्रसाद दिला. हे मंदिर बघण्यासारखे आहे. 

सौ श्रुती समीर कोल्लि यांच्या कृपेने आम्ही दुपारी दोन वाजता अलमट्टी येथे सरकारी विश्रामगृह  येथे पोचलो.  सर्वांच्या पोटात कावळे ओरडत होते. रूमवर लगेच फ्रेश होऊन आम्ही जेवणाच्या ठिकाणी हजर झालो.  भोजनात हुलगांची उसळ, गवार भाजी, झुणका वडी, शेंगा चटणी दही, सलाड, शेवग्याची शेंग्यांची आमटी, गरमागरम पोळी आणि भाकरी असा मेनू होता.  सारे पदार्थ चविस्ट झाले होते. सर्वानी भोजनाचा दोन घास जास्त घेत आस्वाद घेतला आणि समाधानाची ढेकर दिली. अन्नदाता सुखी भव ..सरकारी विश्रामगृह  येथील आलिशान व्यवस्था, खानपान सोय, आजूबाजूस उत्तम निसर्ग सौंदर्य, हे पाहून मनास आनंद झाला आणि किमान दोन दिवस मुक्काम करावा असे वाटले. 


जवळच असलेल्या "sliver lake " येथे बोटींग केले.  बोटिंग नंतर आजूबाजूच्या बागेत फेरफटका मारला. वेगवेगळ्या प्रकारची झाडे, फुले, वेली आणि इतर सुंदर देखावे, कारंजे .. हे पाहून मन आल्हाददायी होते.  नंतर आम्ही अलमट्टी धरण पाहण्यास गेलो. श्री समीर राव याच्यामुळे धरणाच्या भितीवर आम्हाला जाते आले. कर्नाटकातील सर्वात हे मोठे धरण आहे. याला लाल बहादूर शास्त्री धरण असे म्हटले जाते.  विजापूर - बागलकोट सीमेवरील कृष्णा नदीवरील हे धरण - २६ दरवाजे, ५२४ फूट उंचीवर  ३.५ किलोमीटर लांबी..आम्ही निम्मे अंतरावर चालत जाऊन पाण्याची पातळी आणि आजूबाजूच्या बाग - परिसर पाहत, काही अंतरावरून झुक झुक गाडी धावत जात होती,  धरणाची मजा लुटली.  या धरणाचा पायाभरणी श्री लाल बहादूर शास्त्री यांच्या वेली १९६४ साली झाली आणि  श्री APJ अब्दुल कलाम यांच्या कारकिर्दीत २००५ साली पुरे झाले.  अलमट्टी गेस्ट सरकारी विश्रामगृह  भोजन, धरण परिसर, बागेतील फेरफटका... हे सारे म्हणजे वाढदिवसाची अमूल्य भेटच .. असे उद्गार श्री धनंजयराव आणि प्रदीप यांनी काढले.  हे खरे आहे यात शंका नाही.  .. याबाबत श्री समीर कोल्लि आणि सौ. श्रुतीचे मनापासून आभार आणि धन्यवाद.  अलमट्टीचा जड अंतःकरणे निरोप घेऊन आम्ही रात्री दहा वाजता बेळगावला घरी सुखरूप येऊन पोचलो.  दुसरे दिवशी कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन पुण्यास १२ ऑगस्ट रोजी घरी पोचलो. आमचा बेळगाव, बदामी, अलमट्टी कोल्हापूर .. प्रवास दौरा समाप्तः 


























Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा