माझ्या धाकट्या बहिणीचा स्वीडन परदेशवारी

 



माझ्या धाकट्या बहिणीचा मुलगा स्वीडन देशात नोकरीस आहे.  आपल्या पतीच्या नोकरी आणि रजा आणि घरगुती कारणाने गेली ९ वर्षात स्वीडन देशात मुलाकडे घरी भेट देता आले नव्हते. ३१ जुलै २०२६  रोजी यजमान नोकरीतून निवृत्त झाले. तेव्हा मुलानेच स्वीडन देशास भेट देण्यासाठी २१ ऑगस्ट २०२६ चे मुंबईहुन विमान तिकिटाचे बुकिंग केले.   बहिणीची परदेशवारी तयारी (उबदार कपडे, खाण्याचे पदार्थ... आणि इतर गृहउपयोगी  वस्तू )..सामान  सुरु झाली.  आपल्या मुलाचा संसार पाहण्यासाठी उत्कंठा आणि कुतूहल... 

मुंबईस जाताना वाटेत पुण्यास उतरून काही नातेवाईकांना भेटून जावे यामुळे १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८ वाजता बेळगाव ते पुणे खाजगी गाडी बुक केली.  पुण्यातून मुंबईस जाण्यासाठी २० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता गाडी बुक केली होती.  १९ ऑगस्ट -  सकाळी माझ्या बहिणीस ताप आला. उठवत नव्हते म्हणून बेळगावहून पुण्यास  सकाळी ११ वाजता प्रयाण सुरु केले. प्रवासात तापाची गोळी देत दोघे पुण्यास संध्याकाळी ६ वाजता सुखरूप पोचले.  बहिणीस बरे नसल्याचे आणि गोळी घेतली की ताप उतरतो पण परत ताप येतो त्यामुळे आम्ही आमचे जाणे दोन दिवस पुढे ढकलत आहे आणि आम्ही दोन दिवस तुमच्याकडे राहायला येतो. असा फोन बहिणीच्या यजमानांचा आला. तुम्ही जरूर या आपण येथे आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवू असे  मी फोनवरून सांगितले  बरीच वर्षांनी प्रथमच आपल्या मुलाची घरी जाणार ..आम्ही सगळे काळजीत होते आता प्रवास - विमानतिकिट याचे काय होणार या चिंतेत होतो. 

२० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता बहीण आमच्याकडे आली.  आल्याआल्या तिला बसवत नव्हते तेव्ही ती थोडी आराम केला. तिला ताप होता, अंगदुखी होतीच. प्रवासाबाबत काळजी  सर्वाना वाटली. नंतर आम्ही लगेच आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो.  डॉक्टरांनी तिला तपासले, चेहरा सुजला होता. BP नॉर्मल होते. तपासणीनंतर गोळ्या लिहून दिल्या. सध्या डेंग्यूची साथ असल्याने रक्त तपासणी करण्यास सांगितले. रक्त तपासणीस जाऊन गोळ्या आणल्या. एक डोस घेऊन तिने आराम केला.


मी दत्त मंदिरात जाऊन दत्त गुरूंचे दर्शन घेऊन आलो. रक्त तपासणीचे रिपोर्ट नॉर्मल येऊ दे.. बहीणाचा नियोजित प्रवास आपल्या मुलाच्या घरी सुखरूप पार पडो आणि यांची पूर्ण जबाबदारी तुमचीच आहे .. अशी कळकळीची प्रार्थना मंदिरात श्री दत्तगुरूंना केली.   थोड्या विश्रान्तीनंतर,गोळीचा परिणाम जाणवला आणि तिला बरे वाटू लागले .. ताप कमी होउन तिला थोडे अन्न खावे असे वाटू लागले. अर्थात माझ्या सौ. ने तोंडाला चव येण्यासारखे पदार्थ बनवून सेवा केली

संध्याकाळी चार वाजता रक्त चाचणी रिपोर्ट आले. डेंगू  रिपोर्ट निगेटिव्ह आला. रिपोर्ट पाहून मनास आनंद झाला. .. रिपोर्ट डॉक्टरांना दाखवले आणि त्यांनी पाहून विमानप्रवास करण्यास परवानगी दिली.  तिला गोळ्यामुळे थोडी तरतरी आली आणि ताप पूर्ण उतरला.  आम्ही सर्वानी तिला प्रवास सुखरूप होणार काळजी करू  नकोस याबाबत धीर दिला.  शेवटी रात्री ११ वाजता मुंबईस विमानप्रवास साठी प्रयाण केले. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सात वाजता स्वीडनकडे प्रयाण साठी विमानाने उड्डाण केले. २१ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १० वाजता दोघेजण आपल्या मुलाच्या घरी स्वीडन येथे व्हाया इस्तंबूल मार्गे सुखरूप पोचले.  त्यांचा निरोप आल्यावर आम्ही सारे निर्धास्त झालो. 

मनस्वी आनंद झाला. याचे सारे श्रेय श्री दत्त गुरूंना आहे यात शंका नाही. त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद देत कृतज्ञता व्यक्त केली.  दुपारी ताप उतरणे, तिला  दोन घास खाण्याची इच्छा, रिपोर्ट नॉर्मल, अंगात शक्ती येणे.. हे सारी श्री दत्तगुरूंचीच कृपा नव्हे काय.. अर्थात डॉक्टरांच्या गोळीची साथ होतीच म्हणा. डॉक्टरांचे पण आभार आणि धन्यवाद...डॉक्टर हे दुसरे देवच असतात नाही का ...मनापासून केलीली प्रार्थना याचे फळ मिळतचे.. श्रद्धा हवी..श्री दत्त गुरूंना मनापासून साष्टांग नमस्कार आणि सारे श्रेय त्यांची चरणी अर्पण करून नतमस्तक.. आपल्या मनातील दत्त कृपा -  भावना व्यक्त करण्यासाठी हे लेखन.. श्री गुरुदेव दत्त.. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा...



Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा