कर्नल्स क्यूब - "भाग्यरंग" - पाडवा पहाट कार्यक्रम

 




भारती सांस्कृतिक मंडळ व कर्नल्स क्यूब यांच्या संयुक्त विद्यमाने पाडवा पहाट कार्यक्रम भारती  निवास सहकार सदन पुणे  येथे आयोजित करण्यात आला होता. "भाग्यरंग"  या कार्यक्रमाअंतर्गत भाग्यश्री गोडबोले यांनी आपले गायनकला सादर केली, कार्यक्रमाची सुरुवात राग ललत या बंदिशीने झाली. स्वर, शब्द आणि चित्र कॅनव्हास.. रंग देणारी म्हणजे.. भाग्यश्री. रामायणातील खारुताईचे वर्णन यावर बंदिश रामायण रचून ती सादर केली. भावना मनातून.. शब्द आपोआप सुचतात आणि शब्दावर सूर जमतात कल्पना मनातून येतात.. अशी कबुली भाग्यश्री गोडबोले यांनी दिली. नवदुर्गा शैलपुत्री आणि सुर दीपावली मध्ये वसुबारस गाईचे वर्णनावर बंदिशी रचून गायल्या, रघुवंशीचा राम तसाच यदुवंशीचा शाम या गाण्यास चाल लावून दुर्मिळ गाणे गायले. भाग्यश्री गोडबोले यांना गायनाबरोबर चित्रकलेचीपण आवड आहे. त्यांनी काढलेल्या सुरेख चित्रांचं प्रदर्शन कार्यक्रमास्थळी प्रदर्शित करण्यात आले. बालगणेश या दोन चित्रावर  वेगवेगळी गंमतशीर स्वरचित बंदिशी रचून श्रोत्यांसमोर सादर केली. श्रोत्यांनी स्वरचित बंदिशींना उत्तम दाद दिली.  तबल्यावर अमित जोशी, संवादिनीवर अथर्व कुलकर्णी आणि निवेदन धनश्री करंबळेकर यांची साथ संगत भाग्यश्री गोडबोले यांना लाभली. पाडवा पहाट आणि नूतन वर्षाची सुरुवात "भाग्यरंग" सारखा अत्यंत श्रवणीय कार्यक्रमाने झाली  हे आमचे भाग्यच ! असे भारती सांस्कृतिक मंडळाचे सचिव यांनी आपले मत आभारप्रदर्शनात व्यक्त केले. बाल गणेश यावर सुरेख चित्र आणि स्वर आणि संगीत सादर करून भाग्यश्री यांनी आपले शैशत्व  जपले याचे कौतुक वाटते अशी कबुली माजी नगरसेविका सौ माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी दिली. पाडवा पहाट आणि नववर्षानिमित्त एक चांगला उत्तम कार्यक्रमाबाबत भारती सांस्कृतिक मंडळ आणि कर्नल्स क्यूब संस्थेचे आभार आणि धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता चविष्ट अल्पोपहाराने झाली. गुडी पाडवा आणि नूतन वर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा...






Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा