विराट हिंदू संमेलन - डॉ.संजय उपाध्ये
विराट हिंदू संमेलना डॉक्टर संजय उपाध्ये यांचे हिंदुत्वावर भाषण आयोजित करण्यात आले होते. उपनिषदामध्ये विराट याचा अर्थ महान आत्मा असा आहे असे उद्गार डॉ. संजय उपाध्ये यांनी काढले. अस्वच्छता, अतिरेकीपणा, पाशवी अत्याचार, स्त्रियांची अवहेलना, इतर जातीचा अपमान, द्वेष अशासारख्या हीन गोष्टी जिथे नाहीत तो हिंदू. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर हिंदूंची स्थिती कशी होती. हिंदू बहुसंख्य असून सुद्धा आम्हाला हिंदू म्हणून घेणे कमीपणाचे वाटते याबद्दल खेद व्यक्त केला. डाव्या लोकांनी आणि बुद्धीवादी लोकांनी हिंदू धर्मातील प्रथा व टीका करून हिंदू धर्माची टीका केली. आपण निधर्मी आहोत हे दाखवत इतर धर्माच्या बाबत मौन पाळले. आता मात्र सर्व हिंदूनी एकत्र येऊन आपली ताकद दाखवली पाहिजे. धर्मातील सण एकत्र येऊन साजरे करावेत. आपली वसुधैयव कुटुंबकम याबाबत विचार व्यक्त केले. आपली भाषा आणि राष्ट्र प्रेम याचा सन्मान आणि गौरव केला पाहिजे. हिंदू धर्मातील लग्न कुटुंब मुला मुलींचे संगोपन याबाबत आपले आचरण कसे असावे हे सांगितले. काही वाईट प्रथा किंवा चुकीचा आचार यावर शाब्दिक चिमटे काढून सत्य परिस्थिती यावर प्रकाश टाकला. "एकदा तरी म्हणा हिंदूंनो - हिंदुस्तान आहे आमचा " ही स्वरचित कविता सादर केली आणि श्रोत्यांना ही कविता कवितेचे प्रत दिली. कार्यक्रमाची सांगता सावरकरांनी लिहिलेली श्री शिवाजी महाराज यांची आरती आणि श्री वंदना शिववंदना याने झाली. कार्यक्रम छान झाला.

Comments
Post a Comment