विराट हिंदू संमेलन पेठकर साम्राज्य - 21.03.2026

 


विराट हिंदू संमेलन पेठकर साम्राज्य मैदान बळवंतपुरम कोथरूड पुणे  येथे आयोजित करण्यात आले होते. हिंदू जागरण ऊर्जा आणि चेतना आपली सनातन संस्कृती धर्म आणि सामाजिक एकतेचे प्रतीक म्हणून हिंदू संमेलन आयोजित केले होते. मारुती मंदिर येथून पालखी, लेजीम समवेत प्रभात फेरी काढण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवातीस श्री हांडे  महाराज यांनी हिंदू मी एकत्र येणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या पंचसूत्रीबाबत अश्विनी प्रयाग यांनी आपले विचार व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत - हिंदू धर्माच्या प्रत्येक महिन्यातील सणाची माहिती, भारतातील विविध प्रदेशातील हिंदू संत मंडळी,  - एकात्मता स्तोत्र, असे विविध कार्यक्रम  प्रत्यक्ष आणि मोठ्या पडद्यावर सादर करण्यात आला. RSS संस्थेस १०० वर्ष पूर्ण झाली. RSS संघटना, संस्थापक डॉ, केशव हेडगेवार यांची विचारसरणी आणि श्री गोलविलकर गुरुजी यांचे कार्य, पहिले महायुद्ध, स्वातंत्रपूर्व आणि  स्वातंत्रनंतर देशातील राजकीय आणि सामाजिक  स्थिती, रामजन्मभूमी वाद, याबाबत विस्तृत माहिती श्री सुनील देवधर यांनी आपल्या भाषणात श्रोत्यांसमोर मांडली.  आपल्या जोषपूर्ण भाषणात "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" हा मुद्दा मांडत प्रत्येक हिंदू कुटुंबीयांनी आपली संस्कृती टिकवण्यासाठी काय करावयास हवे याबाबत काही नियमावली, आपल्या जीवनात काही गोष्टी -शिस्त  महत्वाची,  आचार आणि विचार यांचे काटेकोर पालन .. सर्वप्रथम राष्ट्र हा विचार .. याबाबत उत्तम मार्गदर्शन केले... लहान मुलामुलींच्या चित्रकला स्पर्धा पारितोषिक यांचे वितरण  श्री सुनील देवधर यांचे हस्ते पार पडले.  कार्यक्रमाची सांगता  चविष्ट महाप्रसाद यांनी झाली.  जवळजवळ दीड हजार लोकांनी या हिंदू संमेलनात हजेरी लावली.  श्री उदय सोमण यांनी या संमेलनाचे उत्तम सुत्रसंचलन केले. त्यांना श्री यतीन जोशी यांनी साथ दिली. सिल्व्हरक्रेस्ट आणि पेठकर साम्राज्य सोसायटीतील कुटुंबीयांनी आणि अनेक कार्यकर्त्यांनी  यात आनंदाने सहभाग घेऊन संमेलन यशस्वी पार पाडले.







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा