वास्तुशांत व गृहप्रवेश कार्यक्रम

 






२६.०३.२०२६ - श्री रामनवमी - डॉ. आशुतोष आणि डॉ. गायत्री यांच्या नव्या वास्तूची - वास्तुशांत व गृहप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  नवी वास्तू कोथरूड भागातील - "एलीटस"  इमारतीत १७ व्या मजल्यावर आहे.  वास्तू जवळ वेदभवन, शृंगेरी मठ, पुणे मुंबई हायवेलगत - चांदणी चौक येथील निसर्गरम्य परिसरात - आजूबाजूस गणपती मंदिर -  वास्तूमध्ये भरपूर हवेशीर, उजेड - बाल्कनीतून निसर्गदर्शन -  वास्तूमधील प्रत्येक खोलीतील सुंदर आकर्षक फर्निचर आणि जागेचा उत्तम वापर आणि सुंदर कलात्मक सजावट केली आहे.  दारासमोरील सुंदर रांगोळी ... हे सर्व पाहून मनास आनंद झाला.  अश्या भव्य आणि दिव्य वास्तुशांत  कार्यक्रमास हजर राहणे आणि तेसुद्धा श्री रामनवमी दिनी .. हे म्हणजे दुग्ध शर्करा योग...माझ्या आयुष्यात हा प्रथमच योग ...खरच मी भाग्यवान.. जय श्रीराम ..श्री सत्यनारायण पूजा, प्रसाद आणि भोजन सारे उत्तम आणि चविष्ट होते. सतराव्या मजल्यावरील वास्तूत राहण्याऱ्या डॉ. आशुतोष, डॉ. गायत्री आणि त्यांच्या कुटुंबियांचे पाय मात्र नेहमी जमिनीवरच असतात.. दोघे डॉक्टर अत्यंत नम्र, कमालीचा साधेपणा, सदैव्य सेवाव्रती असतात.  ही अभिमानस्पद आणि कौतुकास्पद बाब.. नूतन वास्तूमध्ये साऱ्या कुटुंबीयास सुखशांती, समाधान आणि उत्तम आरोग्य लाभो ही मनोभावे प्रार्थना आपल्या साऱ्या नातलगांच्यावतीने श्री गणपतीस आणि वास्तुदेवतेस.. शुभम भवतु.. श्री राम जय राम जय जय राम ...वास्तुशांतीनिमित्य छोटीशी भेट...

Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा