विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे
विराट हिंदू संमेलना अंतर्गत श्री शरद पोंक्षे यांचे हिंदुत्वावर भाषण आयोजित करण्यात आले होते. मुसलमान आणि ख्रिश्चन धर्म पाहता हिंदूंना संमेलन घ्यावे लागते हे पाहता शरमेची बाब आहे. मनुस्मृति न वाचता काही लोक ती जाळण्याची भाषा करतात. हे अतिशय वाईट आहे. कित्येक लोकांनी उपनिषद, वेद, भगवतगीता, रामायण हे वाचले नाही आणि तरी हिंदू धर्मावर टीका करतात हे एक प्रकारचे अज्ञानच आहे. आपल्या राष्ट्रांनी योग, पंचांग, शून्य, आयुर्वेद अशा आणि इतर काही गोष्टी सर्वप्रथम जगाला दिल्या त्याचा विसर आपल्याला पडलेला आहे. इंग्रजांनी आपली शिक्षणसंस्था, भाषा अशा यावर घाला घालून हिंदू कुटुंबसंस्था, शिक्षण पद्धती त्याचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर मताचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून खोटा निधर्मीवाद पसरवला हिंदू मध्ये मतभेद आणि दुफळी माजावली. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व बाबत विचार स्वतः मांडले आता सर्व हिंदूंनी एकत्र येण्याची गरज आहे. हलाल सर्टिफिकेट बाबत माहिती देत अशा वस्तू अजिबात खरेदी करू नका. स्वदेशी वस्तू वापरत हिंदू व्यापाऱ्याकडूनच आपले सामान आणि इतर खरेदी करा. कार्यक्रमाचे सांगता संगीता कट्टी यांनी गायलेल्या वंदे मातरम या गीताने झाली. श्री पोंक्षे यांचे भाषण जोशपूर्ण आणि चैतन्यमय होते.

Comments
Post a Comment