वेबिनार - "पालकांचा मुलांच्या वैवाहिक आयुष्यातील सहभाग: जवळीकही, मोकळीकही! "

 



दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेणे फार महत्त्वाचे असे उद्गार डॉ. अरुणा कुलकर्णी यांनी  "पालकांचा मुलांच्या वैवाहिक आयुष्यातील सहभाग:  जवळीकही, मोकळीकही! " या वेबिनार कार्यक्रमात व्यक्त केले. नात्यांमध्ये स्पर्धा नको. " Catch them good  "  या म्हणीप्रमाणे आपल्या पाल्यातील चांगले काय आहे हे बघा.  त्याचे कौतुक करा. प्रत्येकाने एकमेकांना व्यवस्थित ऐकून घेणे गरजेचे आहे. ऍक्टिव्ह लिसनिंग फार महत्त्वाचे. सध्या पेशन्स कमी होत चालला आहे. आपणास  जन्मापासून नकारात्मक गोष्टीचा  विचाराची सवय लागली आहे. नात्यामधील "इगो" बाजूला ठेवून पहिले पाऊल पुढे आपण ठेवूया.  Focus on  co-operation and not कंट्रोल.  वय वाढल्यावर Impatience  वाढतो. लेट गो करायला शिका. Learning to let go leads to let us go . पाल्याशी  उत्तम सुसंवाद साधा. आजकाल कम्युनिकेशन चॅनेल ओपन ठेवणे हे आव्हानात्मक  झाले आहे.  ओपन अटीट्युड ठेवा. आजकाल मुलं मुली ओपन होत नाहीत. "मुल"  होण्याबाबत हा मुद्दा आपल्याला का महत्वाचा वाटतो त्यावर चर्चा करा आजकाल काळ बदलेला आहे.  मुलांना आधार देताना त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर कसा करावा हे पहा. मुलाशी जवळकी  जपत त्यांच्या वैयक्तिक अवकाशाचा  आदर करायला शिका.  डॉ. अरुणा  कुलकर्णी यांनी नात्यांमध्ये  जवळीक आणि मोकळीक यांपैकी एक निवडायचा नसतो  दोन्हींचा सुंदर समतोल साधायचा असतो  याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी संवादमध्ये  सहभागी झालेल्या मंडळींच्या शंकांचे निरसन डॉ. अरुण कुलकर्णी यांनी केले.दीड तास चाललेला  पावर पॉइंटचा वापर वेबिनार कार्यक्रम उत्तम झाला.  या कार्यक्रमाबाबत डॉ. अरुण कुलकर्णी यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद.


पालकांचा मुलांच्या वैवाहिक आयुष्यातील सहभाग:

✨ जवळीकही, मोकळीकही! ✨

तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न लवकरच होणार आहे का? की तुम्ही नुकतेच सासू-सासरे झाला आहात?

मुलांच्या संसारात पालकांनी किती सहभागी व्हावे? आपला आधार त्यांच्या नात्याला बळ कधी देतो आणि कधी थोडी मोकळीक देणे गरजेचे असते?

मुलांशी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते जपत, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आणि निर्णयांचा आदर कसा करावा, याविषयीच्या एका समंजस आणि मार्गदर्शक संवादात सहभागी व्हा.

🌸 या वेबिनारमध्ये आपण जाणून घेणार आहोत:

* मुलांशी जवळीक जपत त्यांच्या वैयक्तिक अवकाशाचा आदर कसा करावा

* नात्यांमधील योग्य मर्यादा कशा ओळखाव्यात

* मुलांना आधार देताना त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर कसा करावा

* कुटुंबात विश्वास, समजूतदारपणा आणि भावनिक सुरक्षितता कशी निर्माण करावी

🗓️ दिनांक: बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६

⏰ वेळ: रात्री ८:३० ते १०:००

👩‍⚕️ मार्गदर्शन: डॉ. अरुणा कुलकर्णी 

My Mind Matters

कारण नात्यांमध्ये जवळीक आणि मोकळीक यांपैकी एक निवडायचा नसतो; दोन्हींचा सुंदर समतोल साधायचा असतो. ❤️




Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा