चिंतन - श्री चंद्रशेखर फणसाळक - 01.11.2026
आज सकाळी पुणे आकाशवाणी केंद्रावर श्री चंद्रशेखर फणसाळकर यांचे चिंतन ऐकले. विपश्यना योग शिबिरास गेलो होतो. श्वास सोडणे श्वास घेणे यावर लक्ष केंद्रित करायचे होते. डोळे मिटल्यावर माझ्या मांडीवर एक मांजर येऊन बसले. एक कुत्रा चालला असता पण मांजर नको मांजर मला आवडत नाही. मी त्याला बाहेर हाकलले. परत थोड्या वेळाने ते माझ्या मांडीवर येऊन बसले. परत मी माझ्या तंबूबाहेर त्याला सोडून आलो. परत ते माझ्या मांडीवर येऊन बसले. असे तीन-चार वेळा घडले. नंतर मी मांजरास सांगितले तू पण बस आपण दोघे ध्यान करू. असे म्हटल्यावर ते उडी मारून बाहेर निघून गेले परत आले नाही. गौतम बुद्ध म्हणतात "आवडत्या गोष्टी मनात राहत नाही पण नावडत्या गोष्टी मनात ठाण मांडून बसतात." मांजराचा अडथळा नव्हता पण मांजराविषयी नावड ही मनात ठाण मांडून होती. ती नावड स्वीकारल्यावर अडथळा दूर झाला. आवडत्या गोष्टीचा स्वीकार करणे शिकायला पाहिजे. आजचे चिंतन चिंतनशील होते. मला आवडले म्हणून आपणास शेअर केले. धन्यवाद
Comments
Post a Comment