माझा वाढदिवस - 24.09.2026

 



२४ सप्टेंबर २०२६ - प्रथम श्री दत्तगुरु, श्री चतुःश्रींगी देवी दर्शन आणि नंतर  गणेशखिंडी येथील श्री गणपतीचे दर्शन घेतले.  वाढदिवसानिमित्य देवीकडे /  देवाकडे कृतज्ञता  व्यक्त करून आशीर्वाद मागितले.  देवदर्शनानंतर  सौ वर्षा आणि श्रेयससह पॅव्हिलिओन मॉल येथे फेरफटका मारला. मॉल येथे प्रथम टाइम्स झोन येथे विडिओ गेम्सचा आनंद लुटला. आजबाजूचे नुसते विंडो शॉपिंग करत रमत गमत फूड कोर्ट येथे पेट पूजा केली. PVR  सिनेमागृहात "हनुमान अंश" हा सध्या गाजत असलेला  हिंदी सिनेमा पाहिला. बऱ्याच दिवसांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहिला. सिनेमा आवडला. संध्याकाळी डेक्कन, FC  रोड येथे विंडो शॉपिंग आणि चालणे झाले.  श्रेयसच्या जुन्या कंपनीमधील तिघी मैत्रिणीच्या कंपनीमध्ये "शिवसागर" हॉटेल मध्ये भोजनाचा गप्पा मारत आस्वाद घेतला.  त्याच्या तिघी मैत्रिणींपैकी दोघींच्या नावात "शिव"  असल्यामुळे त्याने बहुतेक "शिवसागर" हॉटेलची निवड केली असावी.  तिघी अगदी घरच्यासारख्या आहेत. तिघीनी हॉटेलमध्येच दहा मिनटात मला एक सुंदर भेट दिली (thanks to digital world  ) तिघीनी दिलेले  प्रेम, आदर, आपुलकी कायम स्मरणात राहील..  असो एकंदर माझा वाढदिवस आपल्या कुटुंबियांसमवेत आनंदात साजरा झाला. मनास बरे वाटले.  ही देवाची कृपा...🙏


श्री विशाल चतुर्वेदी यांनी दिग्दर्शित, लेखन - हनुमान अंश हा हिंदी सिनेमा पाहिला.  नीम करोली बाबा यांच्या जीवनावर आधारित हा भक्तिप्रधान चित्रपट.  वयाच्या तेराव्या वर्षी लक्ष्मणदास आईच्या निधनानंतर आपले घर सोडून भगवान रामाच्या यांच्या साधनेत  हनुमान द्वारे  रममाण होतात.   पुढे साधनेनंतर त्यांचे अद्भुत चमत्कार आणि गरीब आणि आजारी लोकांना  भोजन सेवा .. वगैरे यांचे चित्रण सिनेमात उत्तमप्रकारे दाखवले आहे. पुढे लक्ष्मणदास  नीम करोली बाबा म्हणून प्रसिद्ध होतात.  आध्यत्मिक क्षेत्रात ज्यांना आवड आहे त्यांनी हा गाजलेला सिनेमा जरूर पाहावा






Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा