वाचनकट्टा -28 - स्नेहतरंग - ले. रवींद्र पिंगे

 




स्नेहतरंग -  ले. रवींद्र पिंगे 

हा एक व्यक्तीचित्रांचा संग्रह .  यातील  - १) अमृता प्रीतम  - निरंतन साहित्यसेवेचा कित्ता , श्रीमती चंद्रा कर्नाटकी - १००  (३)  आशा भोसले - मधुरतम स्वरांचं कारंज  (४) गजानन वाटवे - कविता गायनाचा जरीपटका  (५) अरविंद गजेंद्रगडकर  यांचे लेख वाचनीय.  आशा भोसले लेखातील काही भाग 

आशाताई कमालीच्या साधेपणाने वागल्या, बोलल्या, काही तरी सुरुवात करायची म्हणून मी विचारलं, "आपलं गाणं कायम टवटवीत राहावं ह्यासाठी तुम्हा काही पथ्यपाणी करता?"   त्यावर आशाताई म्हणाल्या,

पाहा, मी गायिका आहे. परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे. रोजच्या रोज गाणारी गायिका आहे. म्हणजे मला माझा आवाज ऐवजासारखा जपलाच पाहिजे. माझ्या आवाजावर माझं नि माझ्या कुट्बाच चालत. म्हणून माझा आवाज खराब होणार नाही ह्यासाठी डोळ्यांत तेल घालून असते. पाहा, माझ्या उभ्या हयातीत मी आईस्क्रीमला स्पर्शही केलेला नाही. मी जन्मात कधी थंड पाणी प्यायलेली नाही. माझ्या नातेवाइकांना मी फ्रीज घेऊन दिले, पण माझ्या पोटात फ्रिजमधल्या पाण्याचा एक थेंबही गेलेला नाही. मी कधीही मद्य घेतलेलं नाही, कारण मद्य घ्यायचं म्हणजे पार्टीला जाणं आलं. पार्त्या रात्रीच्यावेळी असतात. म्हणजे जागरण आलीच. जागरण केलं की सकाळी उठल्यावर आवाज घोगरा होतो. मग सांगा, घोगरा आवाज घेऊन मी ध्वनिमुद्रण कसं करू ? दिवसाच्या सकाळी सकाळी पाच हजार रुपयांचा फटका मी नाही बाई सहन करू शकत. त्यापेक्षा ती पार्थ्यांची जागरणंही नकोत नि ते पिणंही नको. देवाने दिलंय ते आपण टिकवलं पाहिजे.












Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा