वाचनकट्टा - 29 बुकमार्क - ले. प्रज्ञा ओक
बुकमार्क - ले. प्रज्ञा ओक
लेखिकेच्या जीवनात भेटलेली माणसे - त्यांचा स्वभाव, भावलेले विशेष गुण, आठवणी यांचा सुंदर संग्रह. हे पुस्तक वाचनीय आहे. यातील सर्वच लेख आवडले. पुस्तकाच्या शेवटचा लेख - माणसं - भावून गेला.
जयश्री फडणवीस यांच्या लेखातील काही भाग -
एक माणूस म्हणून एक कणखर आणि आनंदी स्त्री म्हणून तिची ओळख करून द्यावीशी वाटते. मार्केटिंगसारख्या विषयात तिनं एमबीए केलं असल्यानं अनेक वेळा विद्यार्थिनी तिला विचारतात, "मॅडम, मार्केटिंगसारख्या पुरुषांच्या क्षेत्रात काम करताना तुम्हाला अडचणी येत नाहीत का?" त्यावर जयश्रीचं उत्तर असं असतं - "तुम्ही पुरुषांमधले कोणते गुण अॅक्टिवेट करता, यावर बरंचसं अवलंबून आहे. तुमचा पेहराव, बोलण्यातली सभ्यता आणि परिपक्वता तसंच तुमचा 'सवंग'पणाचा लवलेशही नसणारा वावर यात फार महत्त्वाची भूमिका बजावतो." जयश्री म्हणते,











Comments
Post a Comment