डॉ. दिलीप देवधर लिखित - दैनंदिन जीवन व गीता या पुस्तकाचे प्रकाशन

 





१०.०३.२०२४ - डॉ. दिलीप देवधर लिखित - दैनंदिन जीवन व गीता या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम केशव सभागृह पुणे मराठी ग्रंथालय पुणे येथे संप्पन झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री मकरंद वझे आणि सौ. विनय मेहेंदळे होत्या.


लेखक डॉ.दिलीप देवधर यांनी पुस्तक लिहिण्यामागची पूर्वपीठिका सांगितली. विनोबा भावे यांचे "गीता प्रवचने'" हे पुस्तक वाचनानंतर लेखक भारावून गेले.  करोना काळात "भगवदगीता" खूप कामाची आली. आपण शिकलेला - ज्ञान योग आणि कर्म योग हे दोन्ही खूप कामी आले. करोना दिवसात डॉक्टरांनी प्रत्येक करोना रुग्णास हात लावून तपासले असे श्रोत्यांपुढे सांगितले.  रुग्णांना बरे करण्यात समाधान - फळ मिळाले. पण गीतेने सांगितल्याप्रमाणे हे फळ ईश्वरास अर्पण केले.  डॉक्टरांनी प्रत्येकानी आपला स्वधर्म आचरून कर्म केले पाहिजे आणि फळ ईश्वरासमपर्ण करावे. जीवनात मोजकेपणा हवा. कोणाविषयी पूर्वदूषित दृष्टिकोन नसावा.  माणसास मृत्यूची भीती असते. याबाबत आपल्या वैयक्तिक जीवनातले मृत्यूबाबतचे अनुभव श्रोत्यांना कथन केले.  आपल्या आई आणि भावाच्या मृत्यूनंतर लगेच रुग्ण सेवा दिली. शेवटी गीतेत सांगितल्यानुसार प्रत्येकाने स्वतःचा उद्धार करावा.  मन हे आपला मित्र आणि शत्रू आहे. 


मकरन्दनाथ वझे यांनी आपल्या आईच्या वृद्धापकाळातील आणि करोना दिवसातील डॉक्टरांचे अनुभव सांगितले. डॉक्टरांना "विझिटिंग डॉक्टर" आणि "कर्मानंद" असे संबोधले. पुस्तकातील - डॉक्टरांचे सद्गुरू कोण ? याबाबतचे विचार यावर प्रकाश टाकला.श्री वझे यांनीपण " गीता प्रवचने " या विनोबांच्या पुस्तकाची पारायणे केल्याचे सांगितले.


विनया मेहेंदळे गीताधर्म मंडळाच्या सचिव आणि पुणे आकाशवाणी केंद्रावर बरीच वर्षे नोकरी केली आहे.  त्यांनी आपली भगवदगीता समुद्रासारखी आहे.  आपल्याला पचेल, रुचेल तसे त्यांनी समुद्रातून मिळवावे.  भगवदगीता परदेशी पाहुण्यांना गीतेची अनुवादित प्रत भेट म्हणून देणे आपल्या पंतप्रधान श्री मोदी यांच्या योजनेचे  कौतुक केले.


आपले वडील हे आपल्या क्लीनिकमधील रुग्ण तपासणे, वृद्धाश्रमात जाऊन तेथील रुग्ण तपासणे, घरात घरकामास मदत, नियतकालिक सांभाळणे, पुस्तक लिखाण .. हें सर्व कामे आनंदाने पार पडतात. आपले बाबा हें जणू दिवसात २५-२६ तासाचे काम करतात.  असे उदगार डॉ.दिलीप देवधर यांच्याबाबत त्यांचे चिरंजीव डॉ.आमोद यांनी काढले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आमोद देवधर यांनी उत्तमप्रकारे पार पाडले.  हा पुस्तक प्रकाशन सोहळा उत्तमप्रकारे पार पडला.










Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा