माझे वाचन - 7 -"गांधींचे गारुड " - संजीवनी खेर

 





"गांधींचे गारुड " -  संजीवनी खेर 


या पुस्तकात लेखिकेने गांधींच्या सहवासात आलेल्या २० स्त्रियाबाबत विस्तृत लेख लिहिले आहेत काही स्त्रिया या उच्च श्रीमंत कुटुंबातील काही परदेशी आपल्या सुखवस्तू कुटुंबाचा त्याग करून अत्यंत साधी राहणी पत्करून गांधींच्या आश्रमात वास्तवास आल्या  काही समाजसेवा रोमा रोला यांनी गांधींच्या जीवनावरील पुस्तक वाचून भारतात गांधींना भेटायला आणि त्यांचे शिष्यत्व पत्करण्यासाठी आल्या आणि आश्रमात मुक्काम केला गांधींनी या सर्वाना आपल्या कुटुंबातील सदस्य काहींना सखी मानून आपलेसे केले  सर्वांची काळजी घेतली सगळ्यांना वेळोवेळी शेकडो पत्रे पाठवून खुशाली विचारून समाजसेवेबाबत मार्गदर्शन केले 


हे सर्व करताना आपल्या सहवासात संवाद साधला आणि कोठेही मनाचा ताल जाऊन पाय घसरू दिला नाही असे लेखिकेने नमूद केले याबाबत गांधींचे कौतुक करावे तेव्हडे कमीच  पुढे काहींच्याबाबत मतभेद झाले तरी गांधींनी कटुता व्यक्त केली नाही   गांधीप्रेमी लोकांनी हे पुस्तक जरूर वाचावे. "गांधी" नावाचे गारुड.. हे एक अजब रसायन ..







Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा