कर्नल्स क्यूब संस्थेचा वर्धापन दिन

 


कर्नल्स क्यूब संस्थेचा आज वर्धापन दिन .. संस्थेस हार्दिक शुभेच्छा...


चार पाच वर्षांपूर्वी साधना डांगी यांनी एक कार्यक्रमास आम्हा दोघांना हजर राहण्याबाबत फोनवरून आमंत्रण दिले. त्याप्रमाणे आम्ही सर्व प्रथम संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमास हजर राहिलो. कार्यक्रम आवडला. नंतर माझ्या सवयीनुसार मी त्या कार्यक्रमाबत थोडक्यात तपशील लिहून पाठवला.  तो आवडला.  नंतर संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाबत व्हाट्सअप वरून आमंत्रण येऊ लागले. कार्यक्रमानंतर तपशील निमित्य थोडेफार वृत्तांत लिखाण घडले. याबाबत साधना डांगी आणि विनिता फुले यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले. 

Bedside care taking याचे प्रशिक्षण संस्था देते.  तुरुंगात कैद्यांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम कौतुकास्पद होता. याला संस्थेस चांगला प्रतिसाद मिळाला आणि महाराष्ट्र  शासनाने दखल घेतली. वाचनालय सुरु केले. सभासदांना मोबाईल,संगणक प्रशिक्षण दिले. गरजू महिला आणि मुलींना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याबाबत काही उपक्रम राबवले.

संस्थेने अनेक करमणूक, आहारशास्त्र, आजार, संगीत, वरिष्ठांचे जीवनमान आणि समस्या, अध्यात्म, व्यायाम, आनंदी जीवनशैली.. या विविध विषयावर तज्ज्ञांची भाषणे, विचार ऐकण्याची संधी दिली.  या कार्यक्रमातून श्रोत्यांचे  करमणूक तर झाले आणि नवीन माहिती, ज्ञान मिळाले.  याबाबत संस्थेचे मनापासून धन्यवाद आणि आभार..

कोणतीही संस्था व्यवस्थित चालण्यासाठी निःस्वार्थी आणि कष्टाळू सभासदांची गरज असते.  संस्थेच्या विविध समाजउपयोगी आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करणे, आर्थिक बाबी सांभाळणे, इतर नियमांचे पालन करणे  याकामी कार्यकारणी मंडळांचे सर्वेसर्व कर्नल फुले आणि अन्य सभासदांचे मनापासून आभार..

संस्थेची अशीच प्रगती होऊन उत्तोरोत्तर भरभराट हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. शुभम भवतु... 

ऑफिस काम आणि रजेअभावी मला या कार्यक्रमास मनात असूनसुद्धा हजर राहणे जमत नाही म्हणून ह्या शुभेच्छा... धन्यवाद 

वर्षा आणि चंद्रशेखर कुलकर्णी  - 09.03.2024









Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा