सिल्व्हरक्रेस्ट सोसायटीमध्ये महिला दिन
आज सिल्व्हरक्रेस्ट सोसायटीमध्ये महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि भाग्यदा लक्ष्मी .. या गीताने झाली. सोसायटीच्या योगशिक्षिका सौ. पल्लवी गुरव हिने फेसिअल योग बाबत माहिती देऊन तो कसा करायचा या योगामुळे आपण नेहमी ताजेतवाने आणि तरुण दिसतो याबाबत अधिक माहिती सगळ्या महिलांना सांगितली. प्राणायाम योगबाबत पण माहिती सांगितली. सौ. सुवर्णा हरदास हिने "पिरॅमिड ध्यान" या ध्यानाच्या बाबत माहिती दिली. पिरॅमिड ध्यान कसे करावे दिवस कधी करावे, त्याचे दैनिंदिन जीवनात फायदे याबाबत विस्तृत माहिती दिली.
आपल्या सोसायटीमध्ये राहणारी कु. शमिका यतीन जोशी हीने राष्ट्रीय तालबद्ध जिम्नॅस्टिकस वयोगट १२ वर्ष स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. अभिनव विद्यालय इंग्लिश शाळा पुणे येथे शिकणाऱ्या कु. शमिका यतीन जोशी हीने १ रौप्य, १ रजत आणि ४ सुवर्ण पदके महाराष्ट्र राज्यकरीता पटकावून पहिला क्रमांक मिळवला. कु. शमिकाचा सत्कार करण्यात आला. शमिकाची नेत्रदीपक कामगिरी आणि यश याचे कौतुक तितके थोडकेच. " शमिका" म्हणजे सिल्व्हरक्रेस्ट सोसायटीची "२४ कॅरेट सोनेच" नाही का... महिलांना सोन्याबाबत अधिक सांगणे न लगे....
कार्यक्रमाची सांगता चविष्ट अल्पोपहार यांनी झाली. सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये जवळजवळ ४० महिलांनी हजेरी लावून छान प्रतिसाद देऊन महिला दिनाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम राजाध्यक्ष यांनी उत्तम प्रकारे पार पाडले आणि सौ नयना पाटील हीने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाबाबत सिल्व्हरक्रेस्ट उत्सव आणि व्यवस्थापन समितीचे आभार
वर्षा चंद्रशेखर कुलकर्णी
Comments
Post a Comment