14 मार्च - दादा कोंडके यांचा स्मृतिदिन.
14 मार्च - आज दादा कोंडके यांचा स्मृतिदिन.. यानिमित्त पुणे आकाशवाणी केंद्राने सकाळी ९ वाजता चित्रपट संगीत कार्यक्रमामध्ये दादा कोंडके यांची गाणी ऐकवली. चिकोडी येथे बालपणी दादा कोंडके यांचे - सोंगाड्या, तुमचं आमचं जमलं, पांडू हवालदार, एकटा जीव सदाशिव.. असे बरेच चित्रपट पाहिले होते.
शाळेत गायन स्पर्धा असताना एक मुलाने - "ढगाला लागली कळ ... हे गाणे म्हटले होते. दुर्दैवाने स्टेजवर परीक्षक म्हणून एक बाई आसनस्थ होत्या. आम्हाला हसावे पंचायत...आम्हा मुलांची परिस्थिती लई अवघड झाली होती. शेवटी हे गाणे अर्ध्यावर बंद करायला सांगितले गेले. हा शालेय जीवनातील गंमतशीर प्रसंग आठवला. मुले खरंच वात्रट आणि आगाऊ नाही का .. ? (मी सोडून बरं का ....) दादांची बरीच गाणी गुदगुल्या करणारी, रोमँटिक,चटकदार असली तरी "तुमचं आमचं जमलं" या सिनेमातील - चल रे वाघ्या रडू नको .. या गाण्यावेळी मी रडलो होतो.
"दादा" हे ग्रामीण भागातील रसिकांचे हिरो होते. दादा कोंडके यांचे ९ सिनेमे प्रत्येकी सलग २५ आठवडे चालले होते म्हणून त्यांचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे. हे लई भारीच नाही का ... दादा कोंडके यांना विनम्र अभिवादन…गत स्मृतींना उजाळा.
Comments
Post a Comment