Posts

वाचनकट्टा -15 - या जीवनाचे काय करू ... आणि काही निवडक " ले. अभय बंग

Image
  या जीवनाचे काय करू ... आणि काही निवडक "  ले. अभय बंग  या पुस्तकात विविध विषयवार दिलेली भाषणे आणि लेख यापैकी निवडक १४ लेख आणि भाषणे यांचा संग्रह.  माणसाने "कसे जगावे" यावर आपण शोध घेत असतो. पण "कसे जगावे" यापेक्षा "कश्यासाठी जगावे " हे महत्वाचे आहे.  या पुस्तकातून या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. तरुणांना, वयस्करांना, वृद्धांना यातील कुठलातरी  भाग आपलासा वाटेल. महात्मा गांधी आणि विनोबा यांच्या विचाराचा प्रभाव डॉ. अभय बंग यांच्यावर दिसतो.  लेखक एक ठिकाणी विनोबा यांच्याबाबत नमूद करतात ते असे - "असा हा ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्त आणि संन्यासी सर्व एका पुरुषाच्या देहामध्ये आपल्याला साक्षात बघायला मिळाला. अजिबात अतिशयोक्ती न करता मी असं म्हणणार आहे की, दधिची, शंकराचार्य, ख्रिस्त, ज्ञानेश्वर आणि गांधी या पाचही महापुरुषांचा संगम विनोबा या एका माणसात होता "   आजच्या तरुण पिढीस महात्मा गांधी आणि विनोबा यांची जीवनशैली आणि विचार कितपत पटतील याबाबत थोडे साशंक असो. हे पुस्तक जरूर वाचावे. पुस्तक मी २३ एप्रिल - पुस्तक दिनी वाचून संपवले...

वाचनकट्टा -१4 - शकुनाचं पान - ले. रवींद्र पिंगे

Image
  शकुनाचं पान  - ले. रवींद्र पिंगे  ललितलेखनाचा संग्रह पुस्तक.  या लेखातील जगणं हेच महत्वाचे, हिरकमहोत्सवी गीताप्रवचने, माझा बहुगुणी ग्रंथसंग्रह, अभेद्य चक्रव्यूह, शकुनाचं पान ही लेख आवडले. यातील "आई, ती आईच " - हा लेख मनास भावून गेला.  "सुटका"  या लेखातून  आपल्या वडिलांचा निवृत्तीनंतर नोकरीचा विचार याबाबतच्या आठवणी आणि घटना लेखकांनी उत्तम व्यक्त केली आहे. पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवण्याजोगे आहे.

वाचनकट्टा -१3 - " व्यासांचा वारसा " - ले. आनंद विनायक जातेगावकर

Image
  " व्यासांचा वारसा " - ले. आनंद विनायक जातेगावकर  हे पुस्तक म्हणजे महाभारतावरील विवेचन.  महाभारतातील अनेक नात्यांतील भावना, कुंती-पांडू, कर्ण, द्रौपदी, कृष्ण, युधिष्ठर, भीष्म, द्रोण, दुर्योधन.. या प्रमुख व्यक्तीरेखा यांचे विवेचन.. व्यास यांचा स्थितप्रज्ञ भाव यांचे सुंदर चित्रण या पुस्तकात लेखकांनी केले आहे. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबतच्या स्वभावाबाबत लेखक म्हणतात - "स्वभाव हेच तुमचे नशीब"  ... मानवी स्वभावाबाबत उत्तम विवेचन लेखकांनी केले आहे.  महाभारतातील इतर नाजूक आणि सुप्त गोष्टी पुस्तक वाचल्यावर समजले. कौरव पांडव यांच्यातील युद्ध - युद्धनीती काही अनीती, नियमभंग, कारस्थान आणि इतर कृत्ये  हे वाचल्यावर मनात संभ्रम निर्माण होतो..हे असेच का, असे का नाही यावर विचार करायला भाग पाडतात  आणि अश्या प्रश्नांना उत्तर  नसतात. प्रत्येकाने आपल्या कुवतीनुसार उत्तरे शोधायची...हे बरोबर हे चूक असे शेवटी काही नसते ...यावर विदुरांचे विचार महत्वाचे.."जग हे असं आहे जसं आहे तसे जाणून समजून घेऊ या"  हे लेखकाचे काव्य आवडले.  या पुस्तकास डॉ. मंगला आठलेकर या...

कर्नल क्यूब - "मूर्तीमंत वात्सल्य अहिल्यादेवी होळकर"

Image
  कर्मयोगीनी, तत्त्वज्ञानी, न्यायप्रिय, प्रशासकी सैन्यरचना पारंगत, पुण्यशील, धर्मपरायण, कल्याणकारी, राज्यकर्ती  आणि वात्सल्यमूर्ती म्हणजे अहिल्याबाई होळकर...असे उद्गार उषाताई कुलकर्णी यांनी कर्नल क्यूब संस्थेने आयोजित केलेले  "मूर्तीमंत वात्सल्य अहिल्यादेवी होळकर"  या कार्यक्रमात व्यक्त केले. अहिल्याबाईंचे जीवन आणि प्रसाशनशैली, साधी  राहणी, धर्मनिष्ठ, न्याय कल्याणकारी आणि संवेदनशील होते.  लग्नानंतर प्रथम  रामायण महाभारत युद्धशास्त्र शिक्षण यांचे धडे त्यांनी घेतले. लग्नानंतर आपल्या फौजीची बांधणी करणे, सरकारी हिशोब ठेवणे  यांची जबाबदारी सांभाळली. आपले पती खंडेराव आणि त्यांच्या स्वतः स्वभावात कमालीचे अंतर होते. आपल्या पतीच्या मृत्यूनंतर राज्यकारभार सांभाळला. आपले सासरे मल्हारराव यांनी माणूस कसा घडवायचा याचे धडे अहिल्याबाईना दिले. त्या आपली राजधानी इंदोर येथून पवित्र नर्मदा नदीच्या काठीवर असलेल्या  महेश्वर येथे हलवली. राज्य कारभार करताना त्यांनी शेतीसंबंधी अनेक सोयी आणि हिताचे निर्णय घेऊन शेतकरी वर्गात वर्गास दिलासा दिला.  चोर आणि दरोडेखोर य...

पुणे आकाशवाणी - चिंतन

  07.04.2026 आज सकाळी ६.२५ वाजता  पुणे आकाशवाणी केंद्रावर चिंतन या कार्यक्रमात सुजाता लेले यांचे चिंतन श्रवणीय होते.  आपण नेहमी सकाळी चिंतन हे ऐकतो तेव्हा आपल्यामधे काय बदल करू शकतो याचे चिंतन करू या. हे आत्मचिंतन वरिष्ठानी जास्त करावे.  मुले आपल्यास वेळ देऊ शकत नाही अशी तक्रार न  नोकरीतील ताणतणाव, व्यस्त जीवन याचा विचार करून त्यांना समजून घेऊ या. आजची पिढी स्मार्ट आहे त्यांच्या संसारात लुडबुड करायची नाही. बालपणी नातवंडांना आजी-आजोबा यांची गरज असते. ते मोठी झाल्यावर त्यांना मित्र आवडू लागतात.त्यावेळीस आपण स्मार्ट फोन शिकून आपल्या मित्र-मैत्रिणीशी व्हात्साप्प ग्रुपमार्फत संवाद साधू या. उद्याला काय प्राधान्य द्यायचे याचा विचार याला आत्मचिंतन म्हणू या - याने आपणास आत्मबोध होईल.. चांगल्या गोष्टींचे आत्मचिंतन नेहमी करायला हवे.  आजचे चिंतन मनास खूप भावले म्हणून आपणाशी शेयर केले. वेळ आणि सवड काढून चला तर दररोज पुणे आकाशवाणी केंद्रावर सकाळी ६.२५ वाजता चिंतन ऐकू या..🙏 08.04.2026 आज सकाळी ६.२५ वाजता  पुणे आकाशवाणी केंद्रावर चिंतन या कार्यक्रमात सुजाता लेले यांच...

वाचनकट्टा -१२ - "बकुळगंध" - संपादक राजन लाखे.

Image
  "बकुळगंध"  - संपादक राजन लाखे.  कवियत्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्ष 2022 यानिमित्त शंभर लेखकांच्या आठवणी आणि त्यांना आवडलेली शांताबाई यांची कविता यांचा संग्रह म्हणजे बकुळगंध. पुस्तकातील १०० लेखक आणि त्यांना आवडलेल्या कविता यांची मी नोंद ठेवली आहे. या पुस्तकातील डॉ. यशवंत पाटणे यांचा लेख मला आवडला. त्या लेखातील काही टिपणी - माणसाचे जिवंतपण कसे ओळखायचे? माणसाचे वय कसे मोजायचे या प्रश्नावर श्री म. माटे यांनी असे उत्तर दिले होते की व्यक्तीच्या मृत्यूनंतर तुम्ही किती वर्ष त्याची आठवण कृतज्ञतेने काढता हे त्या व्यक्तीचे जिवंतपणा असते. आजही शांताबाई आपल्या डोळ्यासमोर दिसतात. "तुम्ही नेहमी ग्रंथांच्या संगतीमध्ये राहा ग्रंथ तुमचे उत्तम अन्न असते"  असे शांताबाई नेहमी म्हणत. "माणसाचे एकाकी पण जर दूर करायचे असेल तर माणसाने मोडायचे नाही माणसाने ग्रंथाचे नाते जोडायचे साहित्याचे नाते जोडायचे आपल्याला ग्रंथ ही भावनिक सोबत देतात." असे शांताबाई म्हणतात. " वेलीवरची एक कळी" या कवितेत देव यावर शांताबाई म्हणतात -  "हा देव म्हणजे चांगला विचार, हा देव...

श्री रवी हुल्याळकर - ओशोंची ग्रंथसंपदा भेट

Image
  अर्थ आणि व्यवस्थापन विषयातील तज्ञ्, शेयर मार्केट सल्लागार, उत्तम दर्दी वाचक, दानशूर, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, समाधानीवृत्ती  अश्या गुणांनी श्रीमंत असणारे श्री रवी हुल्याळकर यांनी आमच्या घरी भेट दिली. त्यांच्या घरातील ग्रंथालयातील काही अध्यात्मिक पुस्तके त्यांनी मला भेट दिली.  या पुस्तकात ओशो यांची जवळजवळ २५ पुस्तके आमच्या घरी आली. एक ओशो प्रेमींकडून दुसऱ्या ओशो प्रेमीकडे ओशो पुस्तकाची संपदा सुपूर्त करताना त्यांना विशेष आनंद झाला.  जबलपूर येथे गेले असताना त्यांनी ओशोंची ग्रंथसंपदा जमा केली. आपण समाजाचे काही देणे लागतो या विचाराने त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक संस्था यांनी भरपूर देणगी दिली आहे. आपली सोसायटीतील अनेक घरकाम कामगार महिलांना अयोध्यावारी, बनारस/गंगा  दर्शन घडवून आणले आहे.  ही त्यांची दानीवृत्ती आणि मनाचा मोठेपणा खरंच कौतुकास्पद आणि अभिमानस्पद आहे. त्यांच्या कर्तृत्वाबाबत मी काही दिवसापूर्वी ऐकले होते.  त्यांना प्रत्यक्ष भेटून नमस्कार करावा असे मनास वाटले होते. काय योगायोग तेच प्रत्यक्ष आमच्या घरी आले.  साधुसंत येति घरा....आम्ही धन्...