वाचनकट्टा -15 - या जीवनाचे काय करू ... आणि काही निवडक " ले. अभय बंग
या जीवनाचे काय करू ... आणि काही निवडक " ले. अभय बंग
या पुस्तकात विविध विषयवार दिलेली भाषणे आणि लेख यापैकी निवडक १४ लेख आणि भाषणे यांचा संग्रह. माणसाने "कसे जगावे" यावर आपण शोध घेत असतो. पण "कसे जगावे" यापेक्षा "कश्यासाठी जगावे " हे महत्वाचे आहे. या पुस्तकातून या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न लेखकांनी केला आहे. तरुणांना, वयस्करांना, वृद्धांना यातील कुठलातरी भाग आपलासा वाटेल. महात्मा गांधी आणि विनोबा यांच्या विचाराचा प्रभाव डॉ. अभय बंग यांच्यावर दिसतो. लेखक एक ठिकाणी विनोबा यांच्याबाबत नमूद करतात ते असे - "असा हा ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्त आणि संन्यासी सर्व एका पुरुषाच्या देहामध्ये आपल्याला साक्षात बघायला मिळाला. अजिबात अतिशयोक्ती न करता मी असं म्हणणार आहे की, दधिची, शंकराचार्य, ख्रिस्त, ज्ञानेश्वर आणि गांधी या पाचही महापुरुषांचा संगम विनोबा या एका माणसात होता " आजच्या तरुण पिढीस महात्मा गांधी आणि विनोबा यांची जीवनशैली आणि विचार कितपत पटतील याबाबत थोडे साशंक असो. हे पुस्तक जरूर वाचावे. पुस्तक मी २३ एप्रिल - पुस्तक दिनी वाचून संपवले. माझा पुस्तक दिन जोरात साजरा झाला म्हणायचे. जीवनात पुस्तके बरेच काही शिकवतात नाही का .....? पुस्तक संग्रही ठेवण्याजोगे आहे.
Comments
Post a Comment